यशायाह 48:7 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 त्या आताच घडविण्यात आल्या आहेत, फार पूर्वी नव्हे; आजच्या आधी त्या तुम्ही ऐकलेल्या नाहीत. तुम्ही असे म्हणू शकणार नाही, ‘होय, त्या आम्हाला माहीत होत्या.’ Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 त्या आताच उद्भवल्या, फार मागे नाहीत; त्या तुला आजपर्यंत ठाऊक नव्हत्या, नाही तर तू म्हणतास, ‘पाहा, त्या मला आधीच ठाऊक होत्या.’ Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 या गोष्टी पूर्वी घडून गेलेल्या नाहीत, त्या आत्ताच अस्तित्वांत आणल्या या आता घडत असणाऱ्या गोष्टी आहेत, आणि आधी तू त्यांच्याबद्दल कधीच ऐकले नाहीस. त्यामुळे आम्हांला हे अगोदरच माहीत होते असे तू म्हणू शकणार नाही. Faic an caibideil |
ज्याला राष्ट्रांनी तुच्छ व घृणास्पद मानलेले आहे, जो शासनकर्त्यांचा सेवक आहे, त्याला: उद्धारकर्ता आणि इस्राएलचे पवित्र परमेश्वर, याहवेह असे म्हणतात— “जेव्हा राजे तुला बघतील तेव्हा ते उठून उभे राहतील, अधिपती तुला लवून मुजरा करतील, कारण याहवेहने, जे विश्वसनीय आहेत, जे इस्राएलचे पवित्र परमेश्वर आहेत, त्यांनी तुला निवडले आहे.”