Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 48:11 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 तरीही माझ्या प्रीत्यर्थ, होय, माझ्याच प्रीत्यर्थ मी हे करेन. मी स्वतःची अपकीर्ती कशी होऊ देईन? माझे गौरव मी इतरांना घेऊ देणार नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 माझ्या, केवळ माझ्याचप्रीत्यर्थ हे मी करतो; माझ्या नामाची अप्रतिष्ठा का व्हावी? माझा गौरव मी इतरांना देत नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 माझ्यासाठी, माझ्यासाठीच, मी हे करेन, कारण मी माझ्या नावाचा अनादर कसा होऊ देऊ? मी माझे वैभव दुसऱ्याला देणार नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 48:11
23 Iomraidhean Croise  

तरीसुद्धा आपल्या नामासाठी, आपले सामर्थ्य प्रगट करण्यासाठी परमेश्वराने त्यांचे तारण केले.


आमचे नको, हे याहवेह, आमचे नको, तुमची प्रेमदया आणि तुमच्या विश्वसनीयते निमित्त, तुमचेच नाव गौरवित होवो.


याहवेह, आपल्या नावाच्या गौरवासाठी माझे अपराध क्षमा करा, कारण ते घोर आहेत.


माझी तारुण्यातील पातके आणि बंडखोर वृत्ती आठवू नका; तुमच्या प्रीतीनुसार माझे स्मरण करा, कारण याहवेह, तुम्ही चांगले आहात.


“माझ्याकरिता आणि माझा सेवक दावीद याच्या स्मरणार्थ, मी या यरुशलेम नगराचे रक्षण करेन!”


“मीच याहवेह आहे; हेच माझे नाव आहे! मी माझे गौरव दुसर्‍या कोणालाही किंवा माझे गौरव मूर्तींना देणार नाही.


“मी, खरोखर केवळ माझ्याकरिताच मी तुमचे अपराध पुसेन आणि पुन्हा त्यांची आठवणही करणार नाही.


याकारणास्तव या गोष्टी फार पूर्वीच सांगितल्या; प्रत्यक्ष वेळ येण्यापूर्वीच त्या मी तुम्हाला जाहीर केल्या, जेणेकरून तुम्ही असे म्हणू शकणार नाही, ‘आमच्या कोरीव मूर्तीने हे घडवून आणले; आमच्या लाकडी मूर्तीने व धातूच्या दैवतांनी ती आज्ञा दिली होती.’


तरी माझ्या नावाकरिता मी माझ्या प्रकोपास विलंब करेन, आणि माझ्या प्रशंसेकरिता तुमच्यावरून आवरून धरेन आणि तुमचा सर्वस्वी नाश करणार नाही.


याहवेह घोषणा करतात, “आणि आता माझ्याकडे काय राहिले आहे? माझ्या लोकांना विनामूल्य नेण्यात आले आहे, आणि जे त्यांच्यावर सत्ता गाजवितात ते त्यांचा उपहास करतात,” याहवेह घोषणा करतात, “संपूर्ण दिवसभर माझ्या नावाची सतत निंदा करण्यात येते.


जरी आमची पापे आमच्याविरुद्ध साक्ष देतात, तरी हे याहवेह, तुमच्या नामाखातर तुम्ही काहीतरी करा. आम्ही तुमच्याविरुद्ध नेहमी बंडखोरी केली आहे; आम्ही तुमच्याविरुद्ध घोर पातक केले आहे!


परंतु ज्या राष्ट्रांदेखत मी त्यांना बाहेर आणले त्यांच्या दृष्टीत माझ्या नावाचा अनादर होऊ नये म्हणून मी माझ्या नावासाठी असे केले.


तरीही मी माझा हात आवरला आणि ज्या राष्ट्रांदेखत मी त्यांना बाहेर आणले त्यांच्या दृष्टीत माझ्या नावाचा अनादर होऊ नये म्हणून मी माझ्या नावासाठी असे केले.


“ ‘अहो इस्राएली लोकहो, तुमच्याविषयी म्हटले तर, सार्वभौम याहवेह असे म्हणतात: जा तुम्ही प्रत्येकजण तुमच्या मूर्तींची सेवा करा! परंतु त्यानंतर तुम्ही खचितच माझे ऐकाल आणि तुमच्या भेटींनी व मूर्तींनी माझे नाव आणखी अपवित्र करणार नाही.


इस्राएलाच्या घराण्या तुमचे वाईट मार्ग आणि दुष्कर्मांनुसार नाही तर माझ्या नामाकरिता मी तुमच्याशी वागेन, तेव्हा तुम्ही जाणाल मीच याहवेह आहे, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.’ ”


परंतु माझ्या नावासाठी मी त्यांना इजिप्तमधून बाहेर आणले. ज्या लोकांमध्ये ते राहिले आणि ज्यांच्यासमोर मी इस्राएली लोकांना प्रकट झालो, त्यांच्या दृष्टीत माझ्या नावाचा अनादर होऊ नये म्हणून मी असे केले


“म्हणून इस्राएली लोकांना सांग, ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: इस्राएली लोकांनो या गोष्टी मी तुमच्यासाठी नाही, तर जे नाव तुम्ही ज्या राष्ट्रांमध्ये गेला तिथे अपवित्र केले होते त्या माझ्या पवित्र नावासाठी करणार आहे.


“आता हे आमच्या परमेश्वरा, आपल्या दासाची प्रार्थना आणि विनवणी ऐका. याहवेह, उजाड झालेल्या तुमच्या पवित्रस्थानावर तुमचे मुखतेज पडू द्या.


यासाठी की जसा पित्याचा तसा सर्वांनी पुत्राचाही सन्मान करावा, जो पुत्राचा सन्मान करीत नाही तो, ज्याने पुत्राला पाठविले त्या पित्याचाही सन्मान करीत नाही.


मग नियमशास्त्र म्हणते: “तुमच्यामुळेच गैरयहूदी लोकांमध्ये परमेश्वराच्या नावाची निंदा होत आहे.”


आपल्या महान नामाकरिता याहवेह आपल्या लोकांचा धिक्कार करणार नाहीत, कारण तुम्हाला आपले स्वतःचे लोक बनविणे हे याहवेहला बरे वाटले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan