Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 47:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 जाते घेऊन धान्य दळीत बस; तुझा बुरखा काढून टाक. तुझ्या घागर्‍याचा घोळ उचल आणि पाय उघडे करून ओढ्यातून पायपीट करत जा.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 जाते घेऊन धान्य दळ, आपला बुरखा मागे सार, वस्त्राचा घोळ उचलून धर, मांड्या उघड्या करून नदीनाल्यांतून पार चालत जा.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 जाते घे आणि पीठ दळ; तुझा बुरखा काढ, तुझ्या झग्याचा घोळ काढून टाक, तुझे पाय उघडे कर, नद्या ओलांडून जा.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 47:2
22 Iomraidhean Croise  

आणि सेवकाला विचारले, “शेतातून आपल्याला भेटावयास येत असलेला तो पुरुष कोण आहे?” “ते माझे स्वामी आहेत.” सेवकाने उत्तर दिले. तेव्हा तिने आपले मुख बुरख्याने झाकून घेतले.


तेव्हा हानूनने दावीदाच्या राजदूतांना ताब्यात घेऊन, प्रत्येकाचे मुंडण केले व त्यांची वस्त्रे मधोमध नितंबापर्यंत फाडून त्यांना परत पाठवून दिले.


तर माझी पत्नी परपुरुषाच्‍या घरातील धान्य दळो, आणि इतर माणसे तिच्या अंथरुणात निजो.


इजिप्त देशातील प्रत्येक प्रथम जन्मलेला पुत्र मरण पावेल, फारोह जो राजासनावर बसतो त्याच्या प्रथम पुत्रापासून त्याच्या जात्यावर दळत बसणार्‍या गुलाम स्त्रीच्या प्रथम पुत्रापर्यंत आणि जनावरातील प्रथम जन्मलेले प्रत्येक वत्स मरेल.


जेव्हा रस्त्याच्या वेशी बंद असतील आणि जात्याचा आवाज मंद होईल; जेव्हा लोक पक्ष्यांच्या आवाजाने उठतील, परंतु त्यांची सर्व गीते शांत होतील;


म्हणून अश्शूरचा राजा इजिप्तच्या बंदिवानांना आणि कूशच्या बंदिवानांना, तरुणांना आणि वृद्धांना उघडे ठेवलेले नितंब आणि अनवाणी असे—इजिप्तला लज्जित म्हणून चालवेल.


म्हणून प्रभू सीयोनी स्त्रियांच्या डोक्यांना खवडे आणणार; याहवेह त्यांचे टाळू टकले करणार.”


त्यांचे आरसे, त्यांची मलमलची वस्त्रे, मुकुट व शाली.


आत्मसंतुष्ट स्त्रियांनो, थरथर कापा; निश्चिंत असलेल्या कन्यांनो, तुमचा थरकाप होऊ द्या! आपली सुंदर वस्त्रे काढून शोक करण्यासाठी गोणपाट गुंडाळा.


“हे सर्व माझ्यावर का ओढवले?” असा प्रश्न तू जर स्वतःला विचारलास— तर तुझ्या घोर पापांमुळे हे घडत आहे तुझी वस्त्रे फाडण्यात आली तुझ्या शरीरास दुष्टतेने वागविले आहे.


म्हणून मी तुझी वस्त्रे वर ओढून तुझ्या चेहऱ्यावर टाकेन जेणेकरून तुझी लाज उघडी पडेल—


“त्यांचे हर्ष व त्यांच्या आनंदोत्सवाचे स्वर, वर आणि वधूंचे स्वर, त्यांच्या जात्यांचे आवाज व त्यांच्या दिव्यांचा प्रकाश मी नाहीसा करेन.


सर्व राष्ट्रे, त्या देशाची वेळ येईपर्यंत, त्याच्या पुत्राची व त्याच्या नातवाची सेवा करतील, आणि नंतर अनेक राष्ट्रे व मोठमोठे राजे बाबिलोन जिंकून घेतील आणि त्याला आपला गुलाम करतील.


तरुण गिरणीवर काबाडकष्ट करतात; तर किशोर लाकडाच्या भारी ओझ्यांखाली डळमळतात.


नाही तर मी तिचे वस्त्र काढून तिला नग्न करेन, जशी तिच्या जन्माच्या दिवशी ती नग्न होती; तिला मी वैराण प्रदेशासारखी करेन, निर्जल भूमीसारखी ठेवेन व तिला तहानेने जिवे मारीन.


शाफीर मध्ये राहणारे तुम्ही वस्त्रहीन आणि निर्लज्जपणे निघून जा. जे झानन मध्ये राहतात ते बाहेर जाणार नाहीत. बेथ‑एसल विलाप करीत आहे; ते तुम्हाला यापुढे संरक्षण देऊ शकत नाही.


जात्यावर दळीत बसलेल्या दोन स्त्रियांपैकी एकीला घेतले जाईल व दुसरीला ठेवले जाईल.


जात्यावर एकत्र धान्य दळीत बसलेल्या दोन स्त्रियांपैकी एकीला घेतले जाईल व दुसरीला ठेवले जाईल.


तसेच जी स्त्री डोक्यावर आच्छादन न घेता प्रार्थना करते किंवा संदेश सांगते, ती आपल्या पतीचा अनादर करते. तसे करणे म्हणजे जणू काय तिने आपल्या डोक्याचे मुंडण केल्यासारखे आहे.


तेव्हा पलिष्टी लोकांनी त्याला पकडून त्याचे डोळे फोडून टाकले. नंतर ते त्याला खाली गाझा येथे घेऊन गेले. त्याला कास्याच्या साखळ्यांनी जखडून कारागृहात त्याला धान्य दळावयाला लावले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan