Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 43:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 जेव्हा तू खोल जलातून जाशील, मी तुझ्याबरोबर असेन, जेव्हा तू नद्या ओलांडून पुढे जाशील, त्या तुला बुडविणार नाही! जेव्हा तू अग्नीतून चालत जाशील, तू भाजली जाणार नाही. त्या ज्वाला तुला भस्म करणार नाहीत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 तू जलांतून चालशील तेव्हा मी तुझ्याबरोबर असेन; नद्यांतून जाशील तेव्हा त्या तुला बुडवणार नाहीत; अग्नीतून चालशील तेव्हा तू भाजणार नाहीस; ज्वाला तुला पोळणार नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 जेव्हा तू पाण्यातून जाशील, मी तुझ्या बरोबर असेल; आणि नद्यातून जाशील त्या तुला पूर्ण झाकणार नाहीत. जेव्हा तू अग्नीतून चालत जाशील, तू जळणार नाहीस किंवा ज्वाला तुला इजा करणार नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 43:2
40 Iomraidhean Croise  

सहा संकटातून ते तुला वाचवतील; आणि सातव्यात तुम्हाला कोणतेही अनिष्ट स्पर्श करणार नाही.


मृत्युछायेच्या दरीतूनही मी जात असलो, तरी कोणत्याही अरिष्टाला भिणार नाही, कारण तुम्ही माझ्याबरोबर आहात; तुमची आकडी व तुमची काठी मला धीर देतात.


यासाठी प्रत्येक विश्वासणाऱ्याने तुम्हाला पावण्याची संधी आहे तोपर्यंत तुमची प्रार्थना करावी; संकटे जलाच्या महापूरासारखी आली तरी त्यांना त्याचा स्पर्श होणार नाही.


हे परमेश्वरा, तुम्ही आमची परीक्षा घेतली; चांदी शुद्ध करतात, तसे तुम्ही आम्हाला शुद्ध केले आहे.


तुम्ही लोकांना आमची डोकी तुडवून जाऊ दिले; आम्ही अग्नी आणि प्रलय यामधून गेलो, परंतु तुम्ही आम्हाला बाहेर काढून समृद्ध भूमीवर आणले आहे.


तो माझा धावा करेल, तेव्हा मी त्याला उत्तर देईन; त्याच्या संकटकाळी मी त्याच्याबरोबर असेन; मी त्याला सोडवेन आणि त्याचा सन्मान करेन.


पण इस्राएली लोक कोरड्या जमिनीवरून समुद्र पार करून गेले आणि त्यांच्या उजवीकडे व डावीकडे पाणी भिंतीप्रमाणे उभे राहिले.


परमेश्वराने म्हटले, “मी तुझ्याबरोबर असेन आणि मी तुला पाठविले आहे याचे चिन्ह हेच असणार: जेव्हा तू इस्राएली लोकांना इजिप्त देशातून बाहेर आणशील, तेव्हा याच डोंगरावर तुम्ही परमेश्वराची उपासना कराल.”


सर्वसमर्थ याहवेह येतील मेघगर्जना आणि भूकंप आणि प्रचंड गर्जनेसह, सोसाट्याच्या वाऱ्याची वावटळ, वादळ आणि गिळंकृत करणाऱ्या अग्निज्वालांसह येतील.


पहा, धगधगत्या क्रोधाने आणि धुराच्या दाट ढगांबरोबर, याहवेहचे नाव फार लांबून येत आहे; त्यांचे ओठ क्रोधाने भरलेले आहेत, आणि त्यांची जीभ भस्म करणारा अग्नी आहे.


भिऊ नका, कारण मी तुम्हाबरोबर आहे; हिंमत खचू देऊ नका, कारण मी तुमचा परमेश्वर आहे. मी तुम्हाला समर्थ करेन व तुम्हाला मदत करेन; मी माझ्या नीतिमत्तेच्या उजव्या हाताने तुम्हाला उचलून धरेन.


हे कीटका याकोबा, भयभीत होऊ नको, हे लहानग्या इस्राएला, घाबरू नकोस, कारण मी स्वतः तुम्हाला मदत करेन,” असे याहवेह, तुमचे उद्धारकर्ता, इस्राएलचे पवित्र परमेश्वर घोषित करतात,


भिऊ नको, कारण मी तुझ्याबरोबर आहे; मीच तुझ्या संततीला पूर्वेकडून आणि पश्चिमेकडून एकत्र करेन,


आता ज्याला तुम्ही घाबरता त्या बाबेलच्या राजाचे मुळीच भय बाळगू नका. त्याला भयभीत होऊ नका, याहवेह असे जाहीर करतात, कारण मी तुम्हासह असेन व तुम्हाला त्याच्या हातातून सोडवेन.


याकोबा, माझ्या सेवका, भिऊ नको, कारण मी तुझ्याबरोबर आहे.” असे याहवेह जाहीर करतात. “मी तुला ज्या राष्ट्रांमध्ये विखरून दिले होते, त्या राष्ट्रांचा जरी नाश केला, परंतु तुझा संपूर्ण नाश करणार नाही. मी तुला शिस्त लावण्यासाठी एका मर्यादेत शिक्षा करेन. तुला पूर्णपणे विना शिक्षेचे मी सोडणार नाही.”


आणि हे तीन पुरुष शद्रख, मेशख व अबेदनगो घट्ट बांधलेले असे धगधगत्या भट्टीत फेकण्यात आले.


मग याहवेहचा संदेष्टा हाग्गयद्वारे याहवेहने लोकांना संदेश पाठविला: “मी तुम्हाबरोबर आहे,” याहवेह जाहीर करतात.


हा तिसरा भाग अग्नीत घालून चांदी शुद्ध करतात तसा मी शुद्ध करेन. आणि सोन्यासारखी त्यांची परीक्षा करेन. ते मला माझ्या नावाने हाक मारतील आणि मी त्यांच्या हाकेला उत्तर देईन; मी म्हणेन, ‘ते माझे लोक आहेत,’ आणि ते म्हणतील, ‘याहवेह आमचे परमेश्वर आहेत.’ ”


सर्वसमर्थ याहवेह म्हणतात, “निश्चितच तो दिवस येत आहे, जो धगधगत्या भट्टीसारखा ज्वलंत असेल. त्या भट्टीत गर्विष्ठ आणि दुष्ट लोक गवताच्या काडीप्रमाणे जळून जातील. तो दिवस येत आहे, जो त्यांना अग्नीत भस्मसात करेल. त्यांचे एकही मूळ अथवा फांदी त्यावर उरणार नाही.


“कुमारी गर्भवती होईल आणि ती एक पुत्र प्रसवेल आणि त्याला इम्मानुएल हे नाव देतील” (इम्मानुएलचा अर्थ “परमेश्वर आम्हाबरोबर”).


परंतु प्रभू माझ्याजवळ उभे राहिले आणि धैर्याने माझ्या संपूर्ण संदेशाची घोषणा व्हावी व ती सर्व गैरयहूदीयांनी ऐकावी म्हणून त्यांनी मला संधी दिली. सिंहापुढे टाकले जाण्यापासून मला सोडविले.


प्रभू येशू ख्रिस्त तुझ्या आत्म्याबरोबर असो. तुम्हा सर्वांवर कृपा असो.


विश्वासाद्वारे इस्राएली लोक तांबड्या समुद्रातून कोरड्या जमिनीवरून चालत गेले. त्यांचा पाठलाग करणार्‍या इजिप्तच्या लोकांनी तसेच करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा ते सर्व बुडून मेले.


तुमच्या आयुष्यातील सर्व दिवस तुम्हाला कोणीही विरोध करू शकणार नाही, कारण मी जसा मोशेबरोबर होतो तसाच तुझ्याबरोबरही असेन; मी तुला कधीही सोडणार नाही किंवा टाकणार नाही.


मी तुला आज्ञापिले नाही का? खंबीर हो आणि धैर्यवान हो. भिऊ नको; निराश होऊ नको, कारण तू जिथे जाशील तिथे याहवेह तुझे परमेश्वर तुझ्याबरोबर असतील.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan