Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 43:1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 परंतु आता, याहवेह असे म्हणतात— याकोबा, ज्यांनी तुला निर्माण केले, इस्राएला, ज्यांनी तुझी रचना केली: “भिऊ नको, कारण खंडणी भरून मी तुझी सुटका केली आहे. मी तुला नावाने हाक मारली आहे; तू माझीच आहेस.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 तरी आता हे याकोबा, तुझा उत्पन्नकर्ता, आणि हे इस्राएला, तुझा निर्माणकर्ता परमेश्वर, असे म्हणतो, “भिऊ नको; कारण मी तुला सोडवले आहे; मी तुला तुझ्या नावाने हाक मारली आहे; तू माझा आहेस.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 तर आता हे याकोबा, ज्या कोणी तुला उत्पन्न केले आणि हे इस्राएला, ज्या कोणी तुला घडवले, तो परमेश्वर असे म्हणतो, भिऊ नकोस, कारण मी तुला खंडणी भरून सोडवले आहे; मी तुला नाव घेऊन बोलावले आहे, तू माझा आहेस.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 43:1
49 Iomraidhean Croise  

यावर तो मनुष्य म्हणाला, “आता तुझे नाव याकोब राहणार नाही, तर ‘इस्राएल’ असे पडेल; कारण तू परमेश्वराशी व मनुष्याशीही संघर्ष करून यशस्वी झाला.”


याहवेह हेच परमेश्वर आहेत, हे जाणून घ्या. ते आपले निर्माणकर्ते आहेत व तेच आपले स्वामी आहेत; आपण त्यांचे लोक, त्यांच्या कुरणातील मेंढराप्रमाणे आहोत.


भावी पिढ्यांच्या हितासाठी हे सर्व नमूद करून ठेवले जावो, जे आजपर्यंत अस्तित्वात नाहीत, तेही याहवेहची स्तुती करतील:


तुम्ही उद्धारलेल्या लोकांना आपल्या प्रेमदयेने चालविणार. आपल्या सामर्थ्याने तुम्ही त्यांना तुमच्या पवित्र निवासस्थानाकडे घेऊन जाणार.


तुमच्या बाहूच्या पराक्रमामुळे भीती व दहशत त्यांच्यावर येऊन पडेल. तुमचे लोक पार करेपर्यंत, हे याहवेह, जे लोक तुम्ही खंडून घेतले आहेत, ते पार होईपर्यंत ते दगडाप्रमाणे स्तब्ध राहतील.


यावर याहवेहने मोशेला म्हटले, “जी गोष्ट तू माझ्याकडे मागितली आहे तीच मी करेन, कारण तुझ्यावर मी संतुष्ट आहे आणि मी तुला नावाने ओळखतो.”


जेव्हा झाडाच्या फांद्या वाळून शुष्क होतात व मोडतात आणि स्त्रिया येतात व ते सरपण म्हणून जाळतात. तसे हे लोक असमंजस आहेत; म्हणून त्यांना घडविणाऱ्याला त्यांची दया येत नाही आणि त्यांचा निर्माणकर्ता त्यांच्यावर कृपा करीत नाही.


हे कीटका याकोबा, भयभीत होऊ नको, हे लहानग्या इस्राएला, घाबरू नकोस, कारण मी स्वतः तुम्हाला मदत करेन,” असे याहवेह, तुमचे उद्धारकर्ता, इस्राएलचे पवित्र परमेश्वर घोषित करतात,


“मी, याहवेहने, नीतिमत्वात तुम्हाला पाचारण केले आहे; मी तुमचा हात धरून तुम्हाला पाठिंबा देईन, मी तुमचे संगोपन करेन आणि तुम्हाला कराराच्या पूर्ततेचे लोक बनवेन आणि इतर राष्ट्रांना प्रकाश देणारे,


ज्या लोकांना मी माझ्यासाठी निर्माण केले ते माझ्या प्रशंसेची घोषणा करतील.


भिऊ नको, कारण मी तुझ्याबरोबर आहे; मीच तुझ्या संततीला पूर्वेकडून आणि पश्चिमेकडून एकत्र करेन,


जो कोणी माझ्या नावाने ओळखला जातो, ज्यांना मी माझ्या गौरवासाठी निर्माण केले, ज्यांना मी घडविले आहे, त्यांना घेऊन या.”


याहवेह असे म्हणतात— ज्यांनी तुला निर्माण केले व तुला गर्भाशयात घडविले, आणि जे तुला साहाय्य करतील: याकोबा, माझ्या सेवका, भिऊ नको, हे यशुरून, ज्याला मी निवडले आहे, घाबरू नको.


“इस्राएलचे पवित्र परमेश्वर आणि तिचे निर्माणकर्ता, याहवेह हे असे म्हणतात: जे पुढे घडणार आहे त्याविषयी, माझ्या लेकरांबद्धल तुम्ही मला प्रश्न विचारता काय, किंवा माझ्या हस्तकृतीसाठी मला आज्ञा देता काय?


याहवेह हे असे म्हणतात— जे तुमचे उद्धारकर्ता, इस्राएलचे पवित्र परमेश्वर आहेत: “मी याहवेह, तुमचा परमेश्वर आहे, जो तुमच्या हितासाठीच तुम्हाला शिक्षण देतो, जे मार्ग तुम्ही अनुसरावे, त्यांनीच तुम्हाला मार्गस्थ करतो.


बाबेलमधून निघा, खास्द्यांपासून पलायन करा! हे हर्षगर्जना करून जाहीर करा व घोषित करा, “याहवेहने आपला सेवक याकोबाचा उद्धार केला आहे.” अशी घोषणा पृथ्वीच्या दिगंतापर्यंत पोहचू द्या.


हे द्वीपांनो, माझे ऐका; हे दूरवरील देशांनो, माझ्या बोलण्याकडे कान द्या: माझा जन्म होण्यापूर्वीच याहवेहने मला बोलाविले; गर्भाशयात असतानाच त्यांनी माझे नाव उच्चारले.


तुम्हाला पिडणाऱ्यांना मी त्यांचेच मांस खाऊ घालेन; आणि त्यांच्याच रक्ताच्या नद्यांचे रक्त पिऊन ते मद्य पिल्यासारखे धुंद होतील. मग हे सर्व मानवजातीला समजेल कि मी, याहवेह, तुझा त्राता, तुझा उद्धारकर्ता व याकोबाचा सर्वसमर्थ परमेश्वर आहे.”


तुम्ही जे तुमच्या निर्माणकर्त्याला, याहवेहला विसरता, ज्यांनी आकाश ताणून पसरले आणि ज्यांनी पृथ्वीचा पाया घातला, तुम्ही सतत दहशतीखाली का जगता दिवसभर विरोधकांच्या क्रोधाच्या भीतीत का राहता? कारण त्यांनी तुमचा नाश करण्याचा निर्धार केला आहे? विरोधकांचा क्रोध कुठे आहे?


यरुशलेमच्या उद्ध्वस्त स्थळांनो, सर्वांनी एकत्र उसळून हर्षगीतांनी जयघोष करा, कारण याहवेहने आपल्या लोकांचे सांत्वन केले आहे, त्यांनी यरुशलेमास सोडविले आहे.


त्यांना पवित्र लोक, याहवेहने खंडणी भरून सोडविलेले, असे म्हणण्यात येईल, आणि तुला खूप मागणी असलेला देश, कधीही न टाकलेले नगर असे म्हणतील.


परंतु तुम्हीच आमचे पिता आहात, जरी अब्राहाम आम्हाला ओळखत नाही इस्राएलने आम्हाला नाकारले आहे; तरी तुम्ही, हे याहवेह, आमचे पिता आहात, आमचे युगायुगांचे उद्धारकर्ता, हेच तुमचे नाव आहे.


त्यांना होणार्‍या सर्व क्लेशांनी तेही व्यथित झाले, आणि त्यांच्या समक्षतेच्या स्वर्गदूताने इस्राएलचा उद्धार केला. याहवेहच्या प्रीती व करुणेमुळेच त्यांनी त्यांचा उद्धार केला; व त्यांना उचलून प्राचीन कालापासून त्यांचा भार वाहिला.


कारण पूर्वी याहवेहने आम्हाला दर्शन दिले व म्हटले: “मी सार्वकालिक प्रीतीने तुमच्यावर प्रीती केली आहे; मी अविनाशी प्रेमदयेने तुम्हाला माझ्याकडे ओढून घेतले आहे.


“लोक काय म्हणतात ते तुझ्या लक्षात आले आहे काय, ते म्हणतात, ‘याहवेहने निवडलेल्या यहूदीया व इस्राएल राज्यांचा त्याग केला’? म्हणून ते माझ्या लोकांची घृणा करतात आणि त्यांना एक राष्ट्र म्हणून ओळखत नाहीत.


तर मी अब्राहाम, इसहाक व याकोब यांच्या या वंशजांवर राज्य करण्यास याकोबाचे व माझा सेवक दावीदाचे वंशज नाकारले असते व दावीदाच्या पुत्राला निवडले नसते. पण मी त्यांची पूर्वीची समृद्धी त्यांना परत देईन व त्यांच्यावर दया करेन.’ ”


परंतु त्यांचे उद्धारकर्ता सामर्थ्यशाली आहेत; सर्वसमर्थ याहवेह असे त्यांचे नाव आहे. ते जोमाने त्यांचा बचाव करतील आणि इस्राएली देशात त्यांना शांतीने राहता यावे, म्हणून ते त्यांच्या भूमीला शांती प्रदान करतील, परंतु, बाबेलच्या लोकांना अशांती मिळेल.


मी धावा करताच तुम्ही मजजवळ आले आणि म्हणाले, “भिऊ नकोस.”


“ ‘नंतर मी तिथून गेलो आणि जेव्हा मी तुला पाहिले आणि मला दिसले की तू प्रीती करण्याच्या वयात आली होतीस, तेव्हा मी आपल्या वस्त्राचा कोपरा तुझ्यावर पसरून तुझे नग्न शरीर झाकले. तुला मी आपली पवित्र शपथ देऊन तुझ्याशी करार केला आणि तू माझी झालीस, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.


“भिऊ नको, तू फार परमप्रिय आहेस,” तो म्हणाला. “तुला शांती लाभो! आता बलवान हो; बलवान हो!” जेव्हा त्याने हे म्हटले तेव्हा मला सामर्थ्य आले आणि मी त्याला म्हटले, “माझ्या प्रभू बोला, कारण तुम्ही मला सामर्थ्य दिले आहे.”


हा तिसरा भाग अग्नीत घालून चांदी शुद्ध करतात तसा मी शुद्ध करेन. आणि सोन्यासारखी त्यांची परीक्षा करेन. ते मला माझ्या नावाने हाक मारतील आणि मी त्यांच्या हाकेला उत्तर देईन; मी म्हणेन, ‘ते माझे लोक आहेत,’ आणि ते म्हणतील, ‘याहवेह आमचे परमेश्वर आहेत.’ ”


सर्वसमर्थ याहवेह म्हणतात, “त्या दिवशी मी कृती करेन, ते लोक माझी मौल्यवान संपत्ती होतील; आणि ज्याप्रमाणे एखादा पिता आपली सेवा करणाऱ्या पुत्राची गय करतो, त्याप्रमाणे मी त्यांची गय करेन.


त्या तुफानी वादळाचा भयंकर जोर होता आणि अनेक दिवस सूर्याचे व तार्‍यांचे दर्शनही आम्हास घडले नाही. शेवटी आता आमचा जीव वाचेल अशी सर्व आशा आम्ही सोडून दिली.


यासाठी माणसांनो, धीर धरा, कारण माझा परमेश्वरावर विश्वास आहे आणि त्यांनी म्हटल्याप्रमाणे अगदी तसेच घडणार.


कारण परमेश्वराने पूर्वीच आमच्यासाठी नेमून ठेवलेली चांगली कृत्ये करण्याकरिता आम्ही ख्रिस्त येशूंमध्ये घडविलेली परमेश्वराची हस्तकृती आहोत.


लवकरच यशुरून स्वस्थ झाला आणि लाथा झाडू लागला; खाऊन पिऊन धष्टपुष्ट व आकर्षक झाला. उन्मत्त होऊन त्याने त्याच्या निर्माणकर्त्या परमेश्वराचा तिरस्कार केला, आणि आपल्या तारणदुर्गाचा त्याग केला.


अहो मूर्ख आणि मतिमंद लोकांनो, याहवेहची परतफेड करण्याची ही रीत आहे काय? ते तुमचे जनक, तुमचे पिता नाहीत काय? त्यांनीच तुम्हाला बनविले व घडविले नाही काय?


कारण याहवेहची प्रजाच त्यांची संपत्ती होती, याकोब हे त्यांचे वैयक्तिक वतन आहे.


परंतु परमेश्वराने घातलेला पाया स्थिर आहे, त्यास शिक्का हा आहे: “जे प्रभूचे आहेत, त्यांना ते ओळखतात,” आणि “प्रभूचे नाव घेणार्‍यांनी अधर्मापासून दूर राहावे.”


त्यांनीच स्वतःचे बलिदान देऊन आपल्याला प्रत्येक अधर्मापासून मुक्त केले, त्यांनी स्वतःसाठी शुद्ध करून त्यांच्या चांगल्या कार्यासाठी आपल्याला उत्साही प्रजा बनविले.


ते नवे गीत गाऊ लागले. गीताचे शब्द असे: “ती गुंडाळी घ्यावयास व त्याचे शिक्के फोडून तो उघडण्यास तुम्ही पात्र आहात, कारण तुमचा वध करण्यात आला होता आणि तुम्ही आपल्या रक्ताने परमेश्वरासाठी प्रत्येक वंश, भाषा, लोक व राष्ट्रे विकत घेतले आहे,


Lean sinn:

Sanasan


Sanasan