Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 42:9 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 पाहा, गतकाळातील गोष्टी झालेल्या आहेत, आता मी नवीन गोष्टी घोषित करतो; भावी काळातील घटना प्रत्यक्ष घडण्यापूर्वीच मी ते तुमच्याकडे जाहीर करतो.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 पहिल्या गोष्टी घडून चुकल्या आहेत; नव्या गोष्टी मी विदित करतो; त्यांना आरंभ होण्यापूर्वी त्या तुम्हांला ऐकवतो.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 पाहा, पूर्वीच्या गोष्टी घडून चुकल्या आहेत, आता मी नवीन घटनेबद्दल जाहीर करतो. त्या होण्यापूर्वी मी त्याबद्दल तुम्हास सांगत आहे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 42:9
16 Iomraidhean Croise  

मी शलोमोनच्या पुत्राला एक गोत्र देईन, यासाठी की ज्या यरुशलेम नगरास मी माझ्या नावासाठी निवडले आहे त्यात माझा सेवक दावीद याचा दीप सदा माझ्यासमोर पेटलेला असेल.


पाहा, मी एक नवी गोष्ट करणार आहे! ती आता उभारत आहे; तुम्हाला ते आकलन होत नाही का? मी अरण्यातून रस्ता तयार करत आहे ओसाड भूमीत झरे बनवित आहे.


भावी काळात काय घडणार याबद्दल भविष्यवाणी मी फार पूर्वी केलेली आहे मी माझ्या मुखाने ते घोषित करून जाहीर केले; मग अकस्मात मी ते प्रत्यक्ष केले व तसे घडले.


याकारणास्तव या गोष्टी फार पूर्वीच सांगितल्या; प्रत्यक्ष वेळ येण्यापूर्वीच त्या मी तुम्हाला जाहीर केल्या, जेणेकरून तुम्ही असे म्हणू शकणार नाही, ‘आमच्या कोरीव मूर्तीने हे घडवून आणले; आमच्या लाकडी मूर्तीने व धातूच्या दैवतांनी ती आज्ञा दिली होती.’


ही भविष्ये तुम्ही ऐकलेली आहेत; त्या सर्वांकडे बघा. ती तुम्ही स्वीकारीत नाही का? “यापुढे मी तुमच्यापासून लपवून ठेवलेल्या नव्या गोष्टी सांगतो.


“मी तुम्हाला हे आताच, घडून येण्यापूर्वी सांगत आहे, ते यासाठी की जेव्हा तसे घडून येईल, तेव्हा तुम्ही विश्वास ठेवावा की मी तो आहे.


प्रारंभीच्या काळापासून या गोष्टी प्रकट करणारे परमेश्वर असे म्हणतात.


याहवेहने इस्राएली लोकांना दिलेली जी चांगली अभिवचने होती त्यातील एकही निष्फळ झाले नाही; त्यातील प्रत्येक अभिवचन पूर्ण झाले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan