Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 42:8 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 “मीच याहवेह आहे; हेच माझे नाव आहे! मी माझे गौरव दुसर्‍या कोणालाही किंवा माझे गौरव मूर्तींना देणार नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 मी परमेश्वर आहे; हे माझे नाम आहे; मी आपले गौरव दुसर्‍यास देऊ देणार नाही; मी आपली प्रशंसा मूर्तींना प्राप्त होऊ देणार नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 “मी परमेश्वर आहे, हे माझे नाव आहे; आणि मी आपले गौरव दुसऱ्यांबरोबर किंवा कोरीव मूर्तीबरोबर आपली स्तुती वाटून घेणार नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 42:8
16 Iomraidhean Croise  

त्यांच्या गौरवशाली नावाचा महिमा गा; ते किती अद्भुत आहेत, हे जगाला सांगा.


त्यांना समजू द्या की, ज्यांचे नाव याहवेह आहे— तेच या समस्त पृथ्वीचे एकमेव परमश्रेष्ठ स्वामी आहेत.


इतर कोणत्याही दैवतांची उपासना करू नका, कारण याहवेह, ज्यांचे नाव ईर्ष्यावान आहे, ते ईर्ष्यावान परमेश्वर आहेत.


याहवेहने मोशेला सांगितले “हे अशासाठी की याहवेह त्यांच्या पूर्वजांचे परमेश्वर—अब्राहामाचे परमेश्वर, इसहाकाचे परमेश्वर आणि याकोबाचे परमेश्वर—यांचे तुला निश्चितच दर्शन झाले आहे.”


मी, केवळ मीच याहवेह आहे, माझ्याशिवाय दुसरा कोणीही तारणकर्ता नाही.


कारण मी याहवेह, तुझा परमेश्वर आहे, इस्राएलचा पवित्र परमेश्वर, तुझा तारणकर्ता; तुझ्या खंडणीसाठी मी इजिप्तला दिले, तुझा मोबदला म्हणून कूश आणि सबा दिले,


तरीही माझ्या प्रीत्यर्थ, होय, माझ्याच प्रीत्यर्थ मी हे करेन. मी स्वतःची अपकीर्ती कशी होऊ देईन? माझे गौरव मी इतरांना घेऊ देणार नाही.


याकारणास्तव या गोष्टी फार पूर्वीच सांगितल्या; प्रत्यक्ष वेळ येण्यापूर्वीच त्या मी तुम्हाला जाहीर केल्या, जेणेकरून तुम्ही असे म्हणू शकणार नाही, ‘आमच्या कोरीव मूर्तीने हे घडवून आणले; आमच्या लाकडी मूर्तीने व धातूच्या दैवतांनी ती आज्ञा दिली होती.’


ही भविष्ये तुम्ही ऐकलेली आहेत; त्या सर्वांकडे बघा. ती तुम्ही स्वीकारीत नाही का? “यापुढे मी तुमच्यापासून लपवून ठेवलेल्या नव्या गोष्टी सांगतो.


“याहवेह असे म्हणतात, आकाश व पृथ्वी ज्यांनी निर्माण केली व स्थापित केली—ज्यांचे नाव याहवेह आहे, ते म्हणतात:


द्राक्षारस पिऊन त्यांनी सोने, चांदी, कास्य, लोखंड, लाकूड, दगड यापासून बनविलेल्या दैवतांचे स्तवन केले.


यासाठी की जसा पित्याचा तसा सर्वांनी पुत्राचाही सन्मान करावा, जो पुत्राचा सन्मान करीत नाही तो, ज्याने पुत्राला पाठविले त्या पित्याचाही सन्मान करीत नाही.


येशूंनी उत्तर दिले, “मी तुम्हाला निश्चित सांगतो की अब्राहाम जन्मला नव्हता, त्यापूर्वी मी आहे!”


या पुस्तकात नमूद केलेली नियमशास्त्राची वचने तुम्ही प्रामाणिकपणे आचरणात आणली नाही आणि याहवेह तुमच्या परमेश्वराच्या अद्भुत आणि भयावह नावाचा मान तुम्ही राखला नाही,


Lean sinn:

Sanasan


Sanasan