Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 42:5 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 परमेश्वर याहवेह हे असे म्हणतात— आकाश निर्माण करून ते विस्तारणारे, पृथ्वीवर सर्वकाही उगविणारे व ते पसरविणारे, ते तिच्यावरील लोकांना श्र्वास प्रदान करतात, आणि जे तिच्यावरून चालतात, त्यांना जीवन प्रदान करतात:

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 आकाश निर्माण करून विस्तारणारा, पृथ्वीचा व तिच्या उपजाचा फैलाव करणारा, तिच्यावरील लोकांत प्राण घालणारा व तिच्यावर संचार करणार्‍यांना जीवित देणारा देव परमेश्वर असे म्हणतो;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 परमेश्वर देव हे म्हणत आहे, ज्याने आकाश निर्माण केले आणि त्यास विस्तारीले; ज्याने पृथ्वी पसरली आणि ज्यामध्ये जीवन दिले आहे; तो त्यावरील लोकांस श्वास देतो आणि त्यावर राहणाऱ्यांना जिवन देतो;

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 42:5
36 Iomraidhean Croise  

परमेश्वराने प्रथम आकाश व पृथ्वी निर्माण केली.


मग याहवेह परमेश्वराने जमिनीवरील धूळ घेऊन तिचा मनुष्य घडविला व त्याच्या नाकपुड्यांत त्यांनी जीवन देणारा श्वास फुंकला; तेव्हा मनुष्य सजीव प्राणी झाला.


कारण प्रत्येक प्राण्याचा जीव, आणि सर्व मानवजातीचा श्वास त्यांच्याच हातात आहे.


की जोपर्यंत मी जिवंत आहे, आणि परमेश्वराचा श्वास माझ्या नाकपुड्यांत आहे,


परमेश्वराच्या आत्म्याने मला घडविले आहे; आणि सर्वसमर्थाचा श्वास मला जीवन देतो.


जर त्यांच्या मनास आले आणि आपला आत्मा व श्वास काढून घेतला,


त्यांनी जलावर पृथ्वीचा विस्तार केला, त्यांची करुणा सनातन आहे.


याहवेहच्या शब्दाने स्वर्ग अस्तित्वात आला; त्यांच्या मुख श्वासाने सर्व नक्षत्रे निर्माण झाली.


इतर देशांची दैवते केवळ मूर्ती आहेत. परंतु याहवेहनी आकाशमंडलांची रचना केली आहे.


“अहो सर्वसमर्थ याहवेह इस्राएलांचे परमेश्वरा, करुबांच्या सिंहासनावर आरूढ असलेल्या परमेश्वरा, पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांचे तुम्ही एकमेव परमेश्वर आहात. स्वर्ग व पृथ्वी तुम्हीच उत्पन्न केली आहे.


त्यांच्या ओंजळीत असलेले पाणी कोणी मोजले आहे, किंवा त्यांच्या हाताच्या रुंदीने आकाशात चिन्हे मापली आहेत? पृथ्वीवरील धूळ टोपलीत कोणी ठेवली आहे, किंवा पर्वतांचे वजन तराजूवर कोणी केले आहे आणि कोणी टेकड्या तोलल्या आहेत?


जे पृथ्वीवरील मंडलावर विराजमान होतात, त्यावरील लोक त्यांना टोळांप्रमाणे दिसतात. ते आकाशे एखाद्या आच्छादनाप्रमाणे पसरवितात, आणि तंबूप्रमाणे त्याला फैलावून आपला डेरा तयार करतात.


तुमची दृष्टी वर करा व आकाशाकडे पाहा: हे सर्व कोणी निर्माण केले आहे? एकामागून एक असे हे तारांगण कोणी अस्तित्वात आणले आहे, आणि त्यातील प्रत्येकाला ते नावाने हाक मारतात. त्यांच्या थोर सामर्थ्यामुळे व त्यांच्या अमर्याद शक्तीमुळे त्यातील एकही कधी हरवत नाही.


तुम्हाला माहीत नाही काय? तुम्ही ते कधी ऐकले नाही काय? याहवेहच सनातन परमेश्वर आहेत, पृथ्वीच्या दिगंताचे उत्पन्नकर्ता तेच आहेत. ते कधी थकणार वा कंटाळणार नाहीत, त्यांची आकलन शक्ती अगम्य आहे.


“याहवेह असे म्हणतात; तुमचे उद्धारकर्ता, ज्यांनी तुमची गर्भाशयात घडण केली: मी याहवेह आहे, संपूर्ण आकाश मी एकट्याने पसरले, मीच सर्व गोष्टींचा निर्माणकर्ता, ज्याने आकाश ताणले, ज्याने स्वतः पृथ्वी पसरविली,


ज्याने पृथ्वी अस्तित्वात आणली व तिच्यावर मानवजात निर्माण केली, तो मीच आहे. माझ्या हातांनी मी अंतराळ पसरले त्यांच्या तारकागण माझ्याच आज्ञेत आहेत.


याहवेह असे म्हणतात— ज्यांनी आकाशे निर्माण केली तेच परमेश्वर आहेत; ज्यांनी पृथ्वीची निर्मिती केली व घडण केली, ती प्रस्थापित केली; ती ओसाड व निर्जन घडविली नाही, परंतु त्यावर वसतिस्थान व्हावे म्हणून निर्माण केली— ते म्हणतात: “मीच याहवेह आहे. माझ्या व्यतिरिक्त दुसरा कोणीही नाही.


मी माझ्या स्वतःच्या हाताने पृथ्वीचा पाया घातला, आणि माझ्या उजव्या हाताने आकाश आच्छादले; मी जेव्हा त्यांना हजर होण्याची आज्ञा देतो, ते सर्व एकत्र उभे राहतात.


मी त्यांना कायमचे दोषी ठरविणार नाही, नेहमीच क्रोध प्रकट करणार नाही, नाहीतर मी प्रत्यक्ष माझ्या हातांनी घडवले लोक माझ्यामुळे मूर्छित होतील.


परंतु परमेश्वराने त्यांच्या सामर्थ्याने पृथ्वीची निर्मिती केली; संपूर्ण विश्वाची प्रस्थापना त्यांच्या सुज्ञतेने केली आणि त्यांच्या बुद्धीने आकाश विस्तीर्ण केले.


माझ्या महान शक्तीने व उगारलेल्या भुजेने मी पृथ्वी, सर्व मानवजात, व प्राणिमात्रेस निर्माण केले आणि या सर्वगोष्टी मी माझ्या इच्छेस येईल त्याला देतो.


“हे सार्वभौम याहवेह, तुमच्या महान शक्तीने व विस्तारलेल्या भुजेने तुम्ही स्वर्ग व पृथ्वी निर्माण केली आहे. तुम्हाला अवघड असे काहीच नाही.


तेव्हा सिद्कीयाह राजाने यिर्मयाहला त्याचे उत्पन्नकर्ता, सर्वसमर्थ याहवेह, यांची गुप्तपणे शपथ वाहिली: “मी तुला ठार मारणार नाही किंवा तुझा जीव घेऊ पाहणार्‍यांच्या हाती तुला देणार नाही.”


कारण सर्वजण माझे आहेत, आईवडील व लेकरे; दोघेही एकसारखे माझेच आहेत. जे पाप करतील तेच मरतील.


त्याऐवजी तुम्ही स्वर्गाच्या प्रभूच्या विरोधात उभे राहिले. त्यांच्या मंदिरातील पात्रे तुम्ही आपल्याकडे आणली. आपण स्वतः आणि आपले अधिकारी, राण्या, उपपत्नीसह द्राक्षारस प्याले. चांदी आणि सोने, कास्य, लोखंड, लाकूड आणि दगड या दैवतांची, ज्यांना पाहता येत नाही की ऐकता येत नाही की समजत नाही, त्यांची स्तुती केली. पण ज्यांच्या हातात तुमचे जीवन आणि तुमचे संपूर्ण मार्ग आहे त्या परमेश्वराचा तुम्ही आदर केला नाही.


ते आकाशात आपले भव्य राजवाडे बांधतात आणि त्याचा पाया पृथ्वीवर ठेवतात; ते समुद्राच्या पाण्याला बोलवितात आणि ते पृथ्वीच्या पृष्ठभागावर ओततात; याहवेह हे त्यांचे नाव आहे.


एक भविष्यवाणी: इस्राएलच्या बाबत याहवेहचे वचन. याहवेह, ज्यांनी आकाश विस्तारले, पृथ्वीचा पाया घातला आणि मनुष्यांच्या अंतर्यामी आत्मा घातला, ते जाहीर करतात:


“ज्या परमेश्वराने जग व त्यातील सर्वकाही निर्माण केले ते आकाशाचे व पृथ्वीचे प्रभू आहेत, म्हणून ते हातांनी बांधलेल्या मंदिरात राहत नाहीत;


मानवी हात त्यांच्या गरजा भागवू शकत नाहीत, कारण त्यांना कशाचीही गरज नाही. ते प्रत्येकाला जीव आणि श्वास व लागणारे सर्वकाही पुरवितात.


पण आता या शेवटच्या दिवसांमध्ये, ते त्यांच्या पुत्राद्वारे आपल्याशी बोलले आहेत व त्यांना सर्व गोष्टींचे वारस केले आहे आणि त्यांच्या द्वारेच जग निर्माण केले आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan