यशायाह 41:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 “पूर्वेकडून कोणी एकाला चिथविले, नीतिमत्वात त्यांची सेवा करण्यासाठी त्याला बोलाविले? राष्ट्रांना ते त्याच्या स्वाधीन करतात आणि राजांना त्याच्या अधीन करतात. ते त्याच्या तलवारीने त्यांची धूळधाण करतात, त्याच्या धनुष्याने वार्याने उडणारा भुसा करतात. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 ज्याच्या पावलांना नीतिमत्ता अनुसरते, अशाची उठावणी उगवतीकडून कोणी केली? राष्ट्रे त्याला वश होतील असे तो करतो; राजांवर त्याची सत्ता बसवतो, तो त्यांना धुळीसारखे त्याच्या तलवारीच्या स्वाधीन करतो, व उडणार्या धसकटाप्रमाणे त्यांना त्याच्या धनुष्याच्या स्वाधीन करतो. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 पूर्वेकडून येणाऱ्याला कोणी उठविले? त्यास त्याच्या क्रमाने चांगल्यासेवेसाठी कोणी बोलावले आहे? त्याने राष्ट्रे त्याच्यापुढे दिली आणि तो राजावर अधिकार चालवीन असे केले; त्याने त्यांना धुळीसारखे त्याच्या तलवारीच्या आणि उडवलेल्या धसकटासारखे त्याच्या धनुष्याला दिले. Faic an caibideil |
“पर्शियाचा राजा कोरेश, असे जाहीर करतो की: “ ‘याहवेह, जे स्वर्गाचे परमेश्वर आहेत, त्यांनी पृथ्वीवरील सर्व राज्ये माझ्याकडे दिली आहेत आणि यहूदीयातील यरुशलेमात त्यांचे मंदिर बांधण्यास माझी नियुक्ती केली आहे. तुमच्यातील जे याहवेहचे लोक आहात तुम्ही तिथे वर जाऊ शकता आणि त्यांचे परमेश्वर त्यांच्याबरोबर असोत.’ ”