Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 4:6 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

6 दिवसाच्या उष्णतेपासून ते एक आश्रय व सावली आणि वादळ व पावसापासून ते एक आश्रयस्थान आणि लपण्याचे ठिकाण असेल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

6 आणि दिवसा ऊन लागू नये, सावली व्हावी; आणि वादळ व पाऊस ह्यांपासून रक्षण होण्यासाठी निवारा व आश्रय असावा म्हणून मंडप घालण्यात येईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 दिवसा उष्णतेपासून आश्रयासाठी सावली व आसरा, आणि वादळ व पाऊस यापासून आच्छादन असे ते होईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 4:6
17 Iomraidhean Croise  

कारण संकटाच्या दिवसात ते मला त्यांच्या वसतिस्थानात सुरक्षित ठेवतील; तेच मला आपल्या निवासमंडपात लपवून ठेवतील; उंच खडकावर मला सुरक्षा देतील.


या तुफानी वारा आणि वादळापासून मी माझ्या आश्रयस्थानी उडून गेलो असतो.


जो परमोच्चाच्या आश्रयाखाली राहतो, तो सर्वसमर्थाच्या सावलीत राहील.


याहवेहचे नाव बळकट दुर्ग आहे; नीतिमान तिकडे धाव घेतात आणि सुरक्षित राहतात.


आता राष्ट्रांच्या राजदूतांना काय उत्तर देण्यात यावे? “याहवेहने सीयोन स्थापिले आहे, आणि त्यांच्या पीडितांना तिच्यात आश्रय मिळेल.”


तुम्ही गरिबांसाठी आश्रयस्थान असे आहात, गरजवंतासाठी त्यांच्या संकटातील आश्रयस्थान आहात, वादळामध्ये निवारा आहात आणि उष्णतेमध्ये सावली आहात. कारण निर्दयी लोकांचा श्वास हा भिंतीवर चालून येणाऱ्या वादळासारखा आहे,


याहवेह त्यांची उदात्त वाणी लोकांना ऐकवतील आणि घोर संतापाने आणि भस्मसात करणाऱ्या अग्नीने, ढगफुटी, वादळ आणि गारा यांच्याबरोबर त्यांची भुजा खाली येत असताना लोक पहातील.


पाहा, एक राजा धार्मिकतेने राज्य करेल आणि राज्यकर्ते न्यायाने सत्ता चालवितील.


प्रत्येकजण वाऱ्यापासून आश्रयस्थान आणि वादळापासून आश्रयस्थान, वाळवंटामध्ये असलेल्या पाण्याच्या प्रवाहासारखा आणि तहानलेल्या भूमीमध्ये मोठ्या खडकाच्या सावलीसारखा असेल.


इस्राएल आणि यहूदीया या दोघांसाठी; ते एक पवित्रस्थान असतील, लोकांना ठेच लागण्याचा एक दगड व अडखळण्याचा एक खडक, ज्यामुळे ते पडतील. आणि यरुशलेमच्या लोकांसाठी तो एक सापळा आणि पाश होईल.


“म्हणून असे म्हण: ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: जरी मी त्यांना राष्ट्रामध्ये दूर पाठवले आणि त्यांना देशांमध्ये पांगविले, तरीही ज्या देशांमध्ये ते गेले आहेत तिथे काही काळासाठी मी त्यांचे पवित्रस्थान होतो.’


विश्वासाद्वारे नोआहने कोणी कधीही पाहिले नाही अशा गोष्टीबद्दल परमेश्वराने दिलेला इशारा ऐकला आणि आपल्या कुटुंबाच्या रक्षणासाठी आदरयुक्त भीतीने तारू बांधले. नोआहने विश्वासामुळेच जगाचा धिक्कार केला आणि त्याला नीतिमत्वाचे वतन प्राप्त झाले.


परमेश्वराने हे यासाठी केले की ज्या दोन न बदलणार्‍या गोष्टी ज्याविषयी खोटे बोलणे परमेश्वराला अशक्य आहे व आम्ही स्वतःपुढे ठेवण्यात आलेली आशा प्राप्त करण्याकरिता धावलो, त्या आम्हास मोठे उत्तेजन मिळावे.


त्यांना पुन्हा कधी भूक, किंवा तहान लागणार नाही; त्यांना सूर्याचा ताप, किंवा दाहक उष्णता बाधणार नाही.


Lean sinn:

Sanasan


Sanasan