Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 4:5 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 त्यानंतर याहवेह संपूर्ण सीयोन पर्वतावर आणि तिथे जमलेल्या सर्वांवर दिवसा धुराचा ढग आणि रात्रीच्या वेळेस प्रखर अग्नी प्रज्वलित करतील; या सर्व गोष्टींवर गौरवाचे एक छत असेल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 आणि परमेश्वर सीयोन डोंगराच्या प्रत्येक स्थानावर व त्याच्या सणामेळ्यांवर दिवसा धूम्रमय मेघ व रात्री प्रज्वलित अग्नीचा प्रकाश निर्माण करील; कारण त्याच्या सर्व वैभवावर छत्र होईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 नंतर परमेश्वर सियोन पर्वताच्या संपूर्ण जागेवर व तिच्या मेळ्यांच्या जागेवर दिवसा ढग व धूर, आणि रात्री जळत्या अग्नीच्या ज्वालेचा प्रकाश, परमेश्वराच्या वैभवाचे छत, निर्माण करील.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 4:5
25 Iomraidhean Croise  

आमच्या पूर्वजांचे दिवसा मेघस्तंभाद्वारे व रात्री त्यांना आपल्या मार्गाने जाता यावे म्हणून अग्निस्तंभाद्वारे मार्गदर्शन केले.


याहवेहनी इस्राएलावर मेघाचे छत्र पसरले, आणि रात्री प्रकाशासाठी अग्निस्तंभ दिला.


याहवेहचे स्तवन होवो. जिथे नीतिमान एकत्र येऊन सभा आयोजित करतात, तिथे मी संपूर्ण अंतःकरणापासून याहवेहचे स्तवन करेन.


दिवसा ते त्यांना मेघाच्या साहाय्याने आणि रात्री अग्निस्तंभाच्या प्रकाशाच्या साहाय्याने वाट दाखवित नेत असत.


याहवेहचे भय बाळगणारे खरोखरच त्यांच्या तारणाच्या समीप असतात; मग आपला देश त्यांच्या गौरवाने भरून जाईल.


सात्विकांच्या सभेत एकत्र पवित्र परमेश्वराचे भय दिसून येते. त्यांच्याभोवती असणार्‍या सर्वांपेक्षा ते अधिक भयावह आहेत.


पण पहाटेच्या वेळी अग्निस्तंभामधून व मेघस्तंभामधून याहवेहने इजिप्तच्या सेनेकडे पाहिले आणि त्यांचा गोंधळ उडविला.


आणि याहवेहचे वैभव सीनाय पर्वतावर येऊन राहिले. सहा दिवस मेघांनी सीनाय पर्वत झाकलेला होता आणि सातव्या दिवशी परमेश्वराने मेघांतून मोशेला आवाज दिला.


“निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगांच्या तागाच्या व रेशमी तागाच्या दहा पडद्यांनी निवासमंडप तयार करावा, त्यावर कुशल कारागिरांकडून करूब विणून घ्यावे.


“निवासमंडपावर आच्छादन करण्यासाठी बोकडाच्या केसाचे पडदे तयार करावेत; ते अकरा पडदे असावेत.


माझ्या लोकांची घरे शांतीने भरलेली आणि सुरक्षित असतील, त्यांची शांतिभंग न होता ते विश्रांती घेतील.


आमच्या सणांचे शहर, सीयोनाकडे पहा; तुमची दृष्टी यरुशलेम पाहतील, शांत असलेले निवासस्थान, हालविल्या न जाणारा तंबू; त्याच्या खुंट्या कधीही उपटल्या जाणार नाहीत, किंवा त्याच्या कोणत्याही दोऱ्या तोडल्या जाणार नाहीत.


“माझ्याकरिता आणि माझा सेवक दावीद याच्या स्मरणार्थ, मी या यरुशलेम नगराचे रक्षण करेन!”


मी माझे नीतिमत्व तुमच्याजवळ आणत आहे, ते फार दूर नाही; आणि माझ्या तारणास विलंब लागणार नाही. मी माझे तारण सीयोनाला माझे वैभव इस्राएलला बहाल करेन.


“ऊठ, प्रकाशमान हो, कारण तुझा प्रकाश आला आहे, आणि याहवेहचे गौरव तुझ्यावर उदय पावले आहे.


पाहा, काळोख पृथ्वीला आच्छादित आहे, आणि गडद अंधकार लोकांवर येत आहे, परंतु याहवेहचा तुझ्यावर उदय होत आहे, आणि त्यांचे गौरव तुझ्यावर प्रकट होत आहे.


कारण जिथे दोघे किंवा तिघे माझ्या नावाने एकत्र येतात, तिथे मी उपस्थित आहे.”


आणि मी तुम्हाला आज्ञा केल्याप्रमाणे त्यांना सर्वकाही पाळावयास शिकवा आणि मी सदैव, युगाच्या अंतापर्यंत तुमच्याबरोबर आहे.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan