Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 39:8 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 हिज्कीयाहने यशायाहास उत्तर दिले, “तुम्ही बोललेले याहवेह यांचे वचन चांगले आहे,” कारण त्याने असा विचार केला, “माझ्या आयुष्यभर शांती आणि सुरक्षितता असेल.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 तेव्हा हिज्कीया यशयाला म्हणाला, “तू सांगितलेले परमेश्वराचे वचन यथायोग्य आहे.” तो आणखी म्हणाला, “माझ्या काळात तरी शांतता व स्थिरता राहील.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 मग हिज्कीया यशयाला म्हणाला, “परमेश्वराचे वचन तू बोललास ते विश्वासयोग्य आहे.” कारण त्याने विचार केला, माझ्या दिवसात तेथे शांतता आणि स्थिरता राहील.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 39:8
12 Iomraidhean Croise  

परंतु जर याहवेहने म्हटले, ‘मी तुझ्यावर प्रसन्न नाही,’ तर मी तयार आहे; त्यांना जे बरे वाटते तसे याहवेह माझे करो.”


तेव्हा हिज्कीयाहने त्याच्या अंतःकरणातील गर्वाबद्दल पश्चात्ताप केला; तसेच यरुशलेमच्या लोकांनीसुद्धा केले; त्यामुळेच हिज्कीयाहच्या कार्यकालामध्ये याहवेहचा क्रोध त्यांच्यावर आला नाही.


आता मी तुला तुझ्या पूर्वजांबरोबर मिळवेन आणि तुला शांतीने पुरले जाईल. या ठिकाणावर आणि येथे राहणाऱ्यांवर मी जे संकट आणणार आहे, ते तुझ्या डोळ्यांना दिसणार नाही.’ ” तेव्हा त्यांनी तिचे उत्तर परत राजाला जाऊन सांगितले.


आणि म्हणाला: “आईच्या उदरातून मी नग्न आलो, आणि नग्नच मी परत जाईन, याहवेहने दिले आणि याहवेहने परत घेतले; त्या याहवेहचे नाव धन्यवादित असो.”


मी शांत राहिलो; मी माझे तोंड उघडले नाही, कारण तुम्हीच हे केले आहे.


याहवेहच्या महान प्रीतीमुळे आम्ही पूर्णपणे भस्म झालेलो नाही कारण त्यांच्या कृपेचा कधीही ऱ्हास होत नाही.


आमच्या पापांबद्दल आम्हाला शिक्षा होते, तेव्हा आम्ही जिवंत मानवांनी तक्रार का करावी?


तेव्हा मोशे अहरोनास म्हणाला, “याहवेहने जे सांगितले ते असे: “ ‘जे माझ्याजवळ येतात त्यांना मी दाखवेन की मी पवित्र आहे; सर्व लोकांसमक्ष माझे गौरव होईल.’ ” यावर अहरोन शांत राहिला.


आता तुम्ही या गोष्टी करावयाच्या आहेत: एकमेकांशी सत्य बोला, सत्यता व शांततेने तुमच्या न्यायलयात योग्य निर्णय द्या;


सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात: “चवथ्या, पाचव्या, सातव्या आणि दहाव्या महिन्यातील उपवास आता यहूदीयाच्या घराण्यास आनंदाचा व उल्हासाचा काळ व हर्षोत्सव म्हणून पाळले जातील. म्हणून सत्य व शांती यावर प्रीती करा.”


परमेश्वराच्या पराक्रमी हाताखाली स्वतःला नम्र करा, म्हणजे ते तुम्हाला योग्य वेळी उंच करतील.


तेव्हा शमुवेलाने त्याला सर्वकाही सांगितले, त्याच्यापासून काहीही लपवून ठेवले नाही. तेव्हा एली म्हणाला, “ते याहवेह आहेत; त्यांच्या दृष्टीने जे बरे ते करो.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan