Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 38:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 “हे याहवेह, मी तुमच्यापुढे कसा विश्वासूपणाने आणि पूर्ण मनोभावे समर्पित होऊन चाललो व नेहमी तुमच्या दृष्टीने योग्य तेच केले, याचे स्मरण करा.” आणि हिज्कीयाह अतिदुःखाने रडू लागला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 तो म्हणाला, “हे परमेश्वरा, मी तुझ्यासमोर सत्यतेने व सात्त्विक मनाने वागलो आहे व तुझ्या दृष्टीने जे योग्य तेच करीत आलो आहे हे स्मर, अशी मी तुला विनंती करतो.” असे म्हणून हिज्कीया मनस्वी रडला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 तो म्हणाला, “परमेश्वरा, मी आपल्या पूर्ण अंतःकरणाने आणि प्रामाणिकपणाने तुझ्यासमोरच चाललो, याची कृपया आठवण कर आणि तुझ्या दृष्टीने जे चांगले ते मी करत आलो.” आणि हिज्कीया मोठ्याने रडला.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 38:3
40 Iomraidhean Croise  

अब्राम नव्याण्णव वर्षांचा झाला तेव्हा याहवेहने त्याला दर्शन देऊन म्हटले, “मी सर्वसमर्थ परमेश्वर आहे. माझ्यापुढे विश्वासयोग्य आणि निर्दोष राहा.


नोआह आणि त्याच्या कुटुंबाचा वृतांत असा. नोआह आपल्या काळाच्या पिढीत एक नीतिमान आणि निर्दोष मनुष्य होता आणि तो परमेश्वरासोबत विश्वासूपणे चालला.


जरी त्याने पूजास्थाने मोडून टाकली नाही, तरीही आसाचे हृदय त्याच्या जीवनभरात याहवेहशी समर्पित होते.


आणि मला दिलेले हे अभिवचन याहवेह पूर्ण करतील: ‘जर तुझे वंशज आपले जीवन यथायोग्य ठेवतील, आणि त्यांच्या सर्व हृदयाने आणि जिवाने माझ्यासमोर विश्वासूपणे चालतील, इस्राएलच्या राजासनावर बसण्यासाठी तुझा वंश खुंटणार नाही.’


त्याने आपला पिता दावीदाप्रमाणे याहवेहच्या दृष्टीने जे योग्य ते केले.


“आणि तू, माझ्या पुत्रा शलोमोना, आपल्या पित्याच्या परमेश्वराचा अंगीकार कर, त्यांची सेवा पूर्ण अंतःकरणाने व स्वखुशीने कर, कारण याहवेह प्रत्येकाचे अंतःकरण पाहतात आणि त्यातील प्रत्येक इच्छा व विचार त्यांना कळतो. जर तू त्यांना शोधशील, तर ते तुला सापडतील; पण जर तू त्यांचा त्याग करशील, तर ते तुझा कायमचा त्याग करतील.


माझा पुत्र शलोमोनाने एकचित्त हृदयाने तुमच्या सर्व आज्ञा, आदेश व नियम पाळावे, व हे भव्यदिव्य बांधकाम पूर्ण करण्यास सर्वतोपरी प्रयत्न करावा, ज्याच्यासाठी मी संपूर्ण तयारी करून ठेवली आहे.”


पुढाऱ्यांच्या या स्वेच्छेने दिलेल्या प्रतिसादाने सर्व लोक आनंदित झाले, कारण त्यांनी स्वयंस्फुर्तीने व पूर्ण अंतःकरणाने, आनंदाने याहवेहच्या सेवेला दिले, दावीद राजालाही मोठा आनंद झाला.


कारण ज्यांची अंतःकरणे याहवेह यांच्याबरोबर पूर्णपणे वचनबद्ध आहेत, त्यांना बळ देण्यासाठी त्यांची दृष्टी संपूर्ण पृथ्वीवर व्याप्त आहे. तुम्ही मूर्खपणा केला आहे आणि आतापासून तुम्ही युद्धात असाल.”


त्याने याहवेहच्या दृष्टीने जे योग्य होते ते केले, परंतु संपूर्ण अंतःकरणापासून नाही.


परमेश्वराच्या भवनासमोर जमिनीवर पडून एज्रा रडत प्रार्थना करीत व पापांगिकार करीत असताना, इस्राएली पुरुष, स्त्रिया व मुले यांचा एक फार मोठा समुदाय त्याच्याभोवती जमा झाला. तेही अत्यंत दुःखाने रडू लागले.


हे ऐकताच मी खाली बसलो व रडू लागलो. त्यानंतर काही दिवस मी अन्नपाणी वर्ज्य केले व मी स्वर्गाच्या परमेश्वरासमोर मोठ्या शोकाने प्रार्थना करीत राहिलो.


हे माझ्या परमेश्वरा, या चांगल्या कृत्यांबद्दल माझी आठवण ठेवा आणि परमेश्वराच्या भवनासाठी मी जे सर्व अत्यंत विश्वासूपणाने केले आहे ते पुसून टाकू नका.


नंतर मी लेव्यांना आज्ञा दिली की त्यांनी स्वतःला शुद्ध करून घ्यावे आणि शब्बाथ दिवसाचे पावित्र्य राखण्यासाठी वेशींवर पहारा ठेवावा. हे माझ्या परमेश्वरा, या चांगल्या कृत्यांबद्दल माझी आठवण ठेवा आणि आपल्या विपुल प्रीतीनुसार मजवर दया करा.


वेदीसाठी वेळच्या वेळी लाकडे आणि अर्पणांची आणि हंगामातील प्रथम उपजाची अर्पणे पुरविली. हे माझ्या परमेश्वरा, मजवर प्रसन्न होऊन माझी आठवण ठेवा.


हे माझ्या परमेश्वरा, मी जे काही या लोकांसाठी केले आहे, त्याबद्दल प्रसन्न होऊन माझी आठवण ठेवा.


सुज्ञपणाने जीवन जगणे हे माझे लक्ष्य आहे— तुम्ही माझ्याकडे कधी येणार? माझ्या घरातील माझा व्यवहार मी निष्कलंक तर्‍हेने करेन.


मी अन्न म्हणून राख खात आहे; आणि माझे अश्रू माझ्या पेयात मिश्रित होतात,


मी निर्दोष अंतःकरणाने तुमच्या विधींचे पालन करेन, म्हणजे मी कधीच लज्जित होणार नाही.


मी आपली दृष्टी सतत याहवेहवर ठेवली आहे; ते माझ्या उजवीकडे आहेत, मी डळमळणार नाही.


कारण मी नेहमीच तुमच्या अतुलनीय करुणेची आठवण ठेवतो आणि तुमच्या विश्वासूपणावर अवलंबून राहिलो.


धन्य ती व्यक्ती, ज्याच्या हिशेबी याहवेह पापाचा दोष लावत नाही, आणि ज्याच्या आत्म्यात कपट नाही.


माझ्या कण्हण्याने मी खंगून गेलो आहे. रात्रभर रडण्याने मी माझे अंथरूण भिजून ओलेचिंब करतो. माझ्या अश्रूंनी माझा बिछाना भिजून जातो.


दुष्टाई करणार्‍यांनो, येथून चालते व्हा, कारण याहवेहनी माझे रडणे ऐकले आहे.


हे ऐकताच हिज्कीयाहने आपले तोंड भिंतीकडे वळविले आणि याहवेहकडे प्रार्थना केली,


तेव्हा याहवेहचे वचन यशायाहकडे आले:


तो स्वर्गदूताशी झगडला आणि त्याच्यावर विजयी झाला; तो रडला आणि त्याची मेहेरबानी व्हावी म्हणून त्याने भीक मागितली. बेथेलला ते त्याला भेटले आणि तिथे तो त्यांच्याशी बोलला—


आपल्याकडे नाथानाएल येताना पाहून, येशू म्हणाले, “हा खरा इस्राएली असून याच्यामध्ये फसवणूक आढळत नाही.”


हे आम्हाला गर्वाचे कारण आहे: आमच्या सर्व व्यवहारात आमच्या विवेकबुद्धीची साक्ष ही आहे की या जगात आणि तुमच्या संबंधात, आम्ही पवित्र आणि ईश्वरी प्रामाणिकपणाने भरलेले होतो. हे ऐहिक ज्ञानावर नव्हे तर परमेश्वराच्या कृपेवर अवलंबून राहिल्यामुळे आम्ही करू शकलो.


याहवेहच्या दृष्टीने जे योग्य व चांगले आहे तेच करा, तर तुमचे सर्व बाबतीत कल्याण होईल आणि याहवेहने तुमच्या पूर्वजांना शपथपूर्वक देऊ केलेल्या देशात तुम्ही जाल व तो देश तुम्ही ताब्यात घ्याल.


येशू त्या दिवसात पृथ्वीवर देहामध्ये असताना, स्वतःला मृत्यूपासून वाचविण्यास जे समर्थ आहेत, त्यांच्याजवळ त्यांनी अश्रू गाळीत आणि आत्म्यात मोठ्या आक्रोशाने विनवणी करीत प्रार्थना केली आणि त्यांची प्रार्थना त्याच्या आदरयुक्त अधीनतेमुळे ऐकण्यात आली.


कारण परमेश्वर अन्यायी नाहीत. तुमची कृत्ये आणि त्यांच्या नावावर जी प्रीती तुम्ही त्यांच्या लोकांची मदत करून आणि अजूनही मदत करून दाखविता ती ते विसरणार नाहीत.


Lean sinn:

Sanasan


Sanasan