Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 32:9 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 आळसात लोळत पडणार्‍या स्त्रियांनो, उठा व माझे ऐका; हे निश्चिंत असणाऱ्या कन्यांनो, मी काय सांगतो याकडे लक्ष द्या!

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 अहो सुखात राहणार्‍या स्त्रियांनो, उठा, माझी वाणी ऐका; अहो निश्‍चिंत कन्यांनो, माझ्या बोलण्याकडे कान द्या.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 तुम्ही ज्या निर्धास्तपणे राहणाऱ्या स्त्रियांनो उठा, आणि माझी वाणी ऐका; अहो निश्चिंत कन्यांनो, माझे ऐका.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 32:9
15 Iomraidhean Croise  

उन्मत्त लोकांचा घोर उपहास आम्ही सहन केला आणि गर्विष्ठांच्या घोर घृणेचे पात्र ठरलो आहे.


ऐका व माझ्या म्हणण्याकडे कान द्या; मी तुम्हाला जे सांगतो त्याकडे नीट लक्ष द्या.


याहवेह म्हणतात, “सीयोनातील स्त्रिया गर्विष्ठ आहेत, त्या मान उडवीत चालतात, चंचल नेत्रकटाक्षांनी मन वेधतात, पायातल्या पैजणांचा छुमछुम आवाज करीत, कंबर मटकत छोटी छोटी पावले टाकून चालतात.


सीयोनातून आक्रंदन ऐकू येत आहे: ‘आमचा किती सत्यानाश झाला आहे! आमच्यावर घोर लज्जा आली आहे! आम्ही आमचा देश सोडून गेले पाहिजे कारण आमच्या घरांची पडझड झाली आहे.’ ”


आता स्त्रियांनो, याहवेहचे शब्द ऐका! त्यांच्या मुखातील शब्द ऐकण्यासाठी तुमचे कान उघडा. तुमच्या कन्यांना विलाप करण्यास शिकवा; एकमेकींना आकांत करण्यास शिकवा.


उत्तम पक्वान्ने खाणारे आता रस्तोरस्ती निराधार असे फिरत आहेत. जांभळी शाही वस्त्रे परिधान केलेले आता राखेत लोळत आहेत.


ही नगरी चैनबाजी करणारी, सुरक्षितेत वसणारी होती. ती स्वतःशी म्हणत असे, “मी एकटीच आहे, माझ्यासारखी नगरी जगात दुसरी नाही.” पण आता तिची कशी भग्नावस्था झाली आहे, जंगली श्वापदे राहण्याचे ठिकाण! तिच्याजवळून जाणारे सर्वजण तिचा उपहास करून त्यांचे डोके हलवितात.


ज्याला ऐकावयास कान आहेत त्यांनी ऐकावे.”


ऐश्वर्यसंपन्न असल्यामुळे जिने आपला तळवाही कधी जमिनीला लावला नाही अशी घरंदाज व कोमलहृदयी पत्नी इतकी कठोरहृदयी बनेल की आपला प्राणप्रिय पती, पुत्र किंवा कन्या यांना ती आपल्या अन्नाचे वाटेकरी होऊ देणार नाही,


जेव्हा योथामाला हे सांगण्यात आले, तेव्हा तो गरिज्जीम डोंगराच्या शिखरावर उभा राहिला व त्यांना उंच वाणीने ओरडून म्हणाला, “शेखेमातील नागरिकांनो माझे ऐका, म्हणजे परमेश्वर तुमचे ऐकतील.


Lean sinn:

Sanasan


Sanasan