Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 32:10 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 एका वर्षाहून अधिक कालावधीत तुम्हाला जे सुरक्षित वाटते ते थरथर कापतील; कारण द्राक्षाचा उपज बुडेल, आणि फळांचा हंगाम येणार नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 अहो निश्‍चिंत स्त्रियांनो, एका वर्षाहून काही दिवस अधिक तुम्ही बेचैन व्हाल; कारण द्राक्षांचा हंगाम बुडेल, फळे हाती लागणार नाहीत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 अहो निश्चिंत स्त्रियांनो, एक वर्षाहून अधिक काळ तुमचा आत्मविश्वास तुटेल, कारण द्राक्षाचे हंगाम बुडेल, फळे गोळा करता येणार नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 32:10
14 Iomraidhean Croise  

फळबागेतून आनंद आणि हर्ष काढून घेतला आहे; द्राक्षमळ्यात कोणीही गाणे गात नाही किंवा हर्षनाद करत नाही; कोणीही द्राक्षकुंडातून द्राक्षारस काढीत नाही, कारण मी हर्षनाद करणे संपवून टाकले आहे.


त्या दिवशी, ज्या प्रत्येक ठिकाणी एक हजार द्राक्षवेली होत्या ज्याची किंमत एक हजार चांदीचे शेकेल होते त्या ठिकाणी तिथे फक्त काटेरी झुडपे आणि कुसळे असतील.


“ ‘मी त्यांचे पीक काढून घेईन, याहवेह घोषित करतात द्राक्षलतेला द्राक्ष नसतील, झाडांवर अंजीर फळ दिसणार नाही, त्यांची पाने सुद्धा वाळून जातील. मी त्यांना जे काही दिले आहे त्यांच्यापासून परत घेतले जाईल.’ ”


मी तिच्या द्राक्षमळ्यांचा व अंजिराच्या झाडांचा नाश करेन, जो तिच्या प्रियकरांनी तिला वेतन म्हणून दिला होता, असे तिचे म्हणणे आहे; मी त्यांचे गर्द झाडी करेन व वनपशू ते खाऊन टाकतील.


कारण दीर्घकाळापर्यंत इस्राएली लोक राजा अथवा राजपुत्र, यज्ञ अथवा पवित्र दगड, एफोद अथवा कुलदैवतांशिवाय राहतील.


द्राक्षवेल वाळून गेली आहे अंजिराचे झाड कोमेजले आहे; डाळिंब, खजुराचे आणि सफरचंदाचे झाड; शेतातील सर्व झाडे सुकून गेली आहेत. खचितच लोकांचा आनंद विरून गेला आहे.


अहो मद्यप्यांनो, जागे व्हा आणि रडा! हे सर्व द्राक्षारस पिणार्‍यांनो विलाप करा; नवीन द्राक्षारसाकरिता विलाप करा कारण तो तुमच्या ओठातून काढून घेतला आहे.


त्या राष्ट्रांनी माझ्या द्राक्षवेलींची नासधूस केली आहेत आणि अंजिराच्या झाडांचा नाश केला आहे. त्यांनी त्याचे खोड सोलून साल दूर फेकली आहे, त्यांच्या फांद्या पांढर्‍या केल्या आहेत.


अंजिरांची झाडे ना बहरली आणि द्राक्षलतांवर फळे राहिली नाहीत, जैतुनाचे सर्व पीक बुडाले आणि शेते नापीक झाली, जरी मेंढवाड्यात मेंढरे राहिली नाहीत, गोठ्यात गुरे नाहीत,


या लोकांची मालमत्ता लुटली जाईल, यांचीच घरे ढासाळून टाकली जातील, जरी त्यांनी घरे बांधली असतील, त्या घरात ते राहू शकणार नाहीत; जरी त्यांनी द्राक्षमळा लावला असेल, द्राक्षांचा रस ते पिणार नाहीत.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan