Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 30:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 परंतु फारोहचे रक्षण तुम्हाला लज्जित करेल, इजिप्तच्या सावलीने तुमची अप्रतिष्ठा होईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 म्हणून फारोचा आश्रय तुम्हांला लज्जेस कारण होईल, व मिसराच्या छायेत लपणे तुम्हांला फजितीस कारण होईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 यास्तव फारोचे संरक्षण हे तुम्हास लाज आणि मिसरमधील आश्रय हे तुमच्या साठी मानखंडणा असे होईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 30:3
18 Iomraidhean Croise  

पाहा, मला माहीत आहे की तू इजिप्तवर अवलंबून आहेस, पाहा, जी एक तुटलेली वेळूची काठी आहे, जो कोणी त्यावर टिकेल ती त्याच्या हाताला टोचणार! इजिप्तचा राजा फारोह, त्याच्यावर भरवसा ठेवणाऱ्या सर्वांसाठी असेच असल्याचे सिद्ध होते.


शत्रूविरुद्ध तुम्ही आमचा पुरवठा करा, कारण मानवाचे साहाय्य व्यर्थ आहे.


संकटसमयी बेभरवशाच्या माणसावर विश्वास ठेवणे म्हणजे तुटक्या दातांनी चावणे किंवा मोडक्या पायांनी पळण्यासारखे आहे.


ज्यांनी कूशवर विश्वास ठेवला आणि इजिप्तबद्दल बढाई मारली ते निराश होतील आणि लज्जित होतील.


त्या दिवशी या किनार्‍यावर राहणारे लोक असे म्हणतील की, ‘ज्यांच्यावर आम्ही विसंबून होतो, पहा हे त्यांचे काय झाले आहे. ज्यांच्याकडे आम्ही मदतीसाठी आणि अश्शूरच्या राजापासून आमची सुटका व्हावी यासाठी धाव घेतली होती, तर आता आमची सुटका कशी होईल?’ ”


पाहा, मला माहीत आहे की तू इजिप्तवर अवलंबून आहेस. पाहा, जी एक तुटलेली वेळूची काठी आहे, जो कोणी त्यावर टिकेल ती त्याच्या हाताला टोचणार! इजिप्तचा राजा फारोह, त्याच्यावर भरवसा ठेवणाऱ्या सर्वांसाठी असेच असल्याचे सिद्ध होते.


तुम्ही आपले मार्ग सोडून पथभ्रष्ट का होता? अश्शूरने तुमचा आशाभंग केला तसाच इजिप्तही करेल.


कारण इस्राएलचे परमेश्वर, सर्वसमर्थ याहवेह म्हणतात: ‘यरुशलेमच्या लोकांवर माझ्या रागाचा व क्रोधाचा वर्षाव झाला, तसाच तुम्ही इजिप्तमध्ये प्रवेश कराल तेव्हा तुमच्यावर होईल. तिथे तुम्ही घृणा, शाप व उपहासाचा विषय व्हाल; तुम्हाला हा देश परत कधी दिसणार नाही.’


म्हणून आता तुम्ही हे निश्चित समजा: जिथे जाऊन वसती करण्याची तुमची इच्छा आहे, तिथे तुम्ही तलवार, दुष्काळ व मरी यांना बळी पडाल.”


सर्वसमर्थ याहवेह, इस्राएलचे परमेश्वर म्हणतात: मी थेबेस येथील दैवत आमोनला, फारोहला, इजिप्तला व तिच्या दैवतांना, तिच्या राजाला आणि तिची सर्व दैवते व तिच्यावर भरवसा ठेवणार्‍यांनाही शिक्षा करणार आहे.


जेव्हा त्यांनी त्यांच्या हातांनी तुला पकडले, तू त्यांना खरडले व त्यांचे खांदे मोडले; जेव्हा ते तुझ्यावर टेकले, तेव्हा तू मोडलास व त्यांच्या कंबरा खचविल्या.


महान राजाला भेट म्हणून सादर करण्यासाठी ते अश्शूरला नेले जातील. एफ्राईमला लज्जित केले जाईल; बाहेरील लोकांशी संबंध ठेवल्यामुळे इस्राएलही आपल्या मसलतीविषयी लज्जित होईल.


शास्त्रलेख म्हणते, “जो कोणी प्रभू येशूंवर विश्वास ठेवितो तो कधीही लज्जित होणार नाही.”


आशेमुळे आपण लज्जित होणार नाही, कारण आपणाला दिलेल्या पवित्र आत्म्याद्वारे परमेश्वराची प्रीती आपल्या अंतःकरणात ओतली गेली आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan