Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 3:8 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 यरुशलेम डगमगत आहे, यहूदीया कोसळत आहे; त्यांचे बोलणे आणि कृत्ये याहवेहच्या विरोधात आहेत, त्यांच्या गौरवशाली उपस्थितीला त्यांनी विरोध केला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 यरुशलेम कोसळली आहे, यहूदा पतन पावला आहे; कारण त्यांची जिव्हा व त्यांची कृत्ये परमेश्वराविरुद्ध असून ते त्याच्या तेजोमय नेत्रांना तुच्छ लेखतात.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 कारण यरूशलेमेचा नाश झाला आहे, व यहूदा पतन पावला आहे, कारण त्यांचे बोलणे व कृती परमेश्वराच्या विरोधात आहे, त्याच्या उच्च अधिकाराचा अपमान करत आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 3:8
35 Iomraidhean Croise  

त्यावेळेस पलिष्ट्यांनी डोंगर पायथ्याशी असलेल्या नगरांवर आणि यहूदीयाच्या नेगेवमधील गावांवर हल्ला केला. त्यांनी बेथ-शेमेश, अय्यालोन आणि गदेरोथ, तसेच सोकोह, तिम्नाह आणि गिम्झो आणि त्यांच्या आजूबाजूची गावे काबीज केली.


तेव्हा याहवेहनी अश्शूर राजाच्या सेनापतींना त्यांच्याविरुद्ध केले, त्यांनी मनश्शेहला कैद केले, त्याच्या नाकात आकडा घातला, त्याला कास्य धातूच्या बेड्यांनी बांधले आणि बाबेलला नेले.


जो कोणी खड्डा करतो, तोच त्याच्यात पडेल; जर कोणी दगड ढकलून टाकतो, तो परत त्यांच्यावरच ढकलून दिला जाईल.


तुमचा देश उद्ध्वस्त झाला आहे, तुमची शहरे अग्नीमध्ये जळाली आहेत; पाडाव केल्यानंतर करावे तसे, तुमच्यादेखत तुमची शेते परदेशीयांनी ओरबाडून घेतली आहेत.


“जरी तुम्ही उद्ध्वस्त झाले व ओसाड करण्यात आले होते आणि जी तुमची भूमी उजाड झाली, ती तुमच्या लोकांना फारच कमी पडेल, आणि तुम्हाला गिळंकृत करणारे खूप दूर गेलेले असतील.


तुम्ही कोणाची चेष्टा करता? कोणाकडे पाहून नाके मुरडता व आपल्या जिभा दाखविता? तुम्ही बंडखोरांची पिल्ले व लबाडांची संतती नाही काय?


कारण तुमचे हात रक्ताने माखलेले आहेत, तुमची बोटे दोषीपणाने बरबटलेली आहेत. तुमच्या ओठांनी असत्य बोललेले आहे, आणि तुमची जीभ दुष्टतेच्या गोष्टी पुटपुटते.


नंतर मी म्हणालो, “हे प्रभू, आणखी किती वेळ?” आणि त्यांनी उत्तर दिले: “शहरे जोपर्यंत उद्ध्वस्त होत नाहीत आणि तिथे कोणी लोक राहिले नाहीत, घरे ओसाड पडत नाहीत आणि शेतांची नासाडी होत नाही आणि ती उद्ध्वस्त होत नाहीत तोपर्यंत.


म्हणूनच प्रभू त्यांच्या तरुण पुरुषांना पाहून प्रसन्न होणार नाहीत; त्यांना विधवांचा आणि अनाथांचा कळवळा येणार नाही; कारण हे सर्वच अधर्मी व दुष्ट असून, प्रत्येक मुख असत्य बोलणारे आहे. हे सर्व करूनही त्यांचा संताप अजून शमला नाही, त्यांचा हात अजूनही उगारलेलाच आहे.


परंतु ‘परमेश्वराचा संदेश’ हा शब्दप्रयोग तुम्ही पुन्हा करू नये, कारण तुम्हा प्रत्येकाचे वचन तुमचा व्यक्तिगत संदेश होतो. म्हणून तुम्ही जिवंत परमेश्वर, सर्वसमर्थ याहवेह, आपले परमेश्वर यांच्या वचनाचा विपर्यास करता.


“यहूदीयाचा राजा हिज्कीयाह, याच्या कारकिर्दीत मोरेशेथ येथील संदेष्टा मीखाहने संदेश दिला, ‘सर्वसमर्थ याहवेह म्हणतात: “ ‘सीयोन शेताप्रमाणे नांगरला जाईल, यरुशलेम दगडांचा ढिगारा होईल, मंदिराच्या टेकडीवर दाटीने झाडेझुडपे वाढतील.’


तर या मंदिरास मी शिलोह आणि या नगरासारखे पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांमध्ये शाप असे करेन.’ ”


पाहा! तो ढगांसारखा पुढे येत आहे, चक्रीवादळाप्रमाणे त्याचे रथ आहेत, त्यांच्या घोड्यांचा वेग गरुडांहून जास्त आहे. हाय! हाय! आमचा नायनाट झाला आहे!


त्यांनी केलेल्या दुष्टाईमुळेच असे झाले. त्यांनी इतर दैवतांना धूप जाळला व त्यांची आराधना केली म्हणून माझा क्रोध त्यांच्यावर भडकला. अशी दैवते जी त्यांना किंवा तुम्हाला किंवा तुमच्या पूर्वजांनाही माहीत नव्हती.


तिची अशुद्धता तिच्या वस्त्राला चिकटली आहे; तिने तिच्या भविष्याचा विचार केला नाही. तिचे पतन अचंबित करून सोडणारे होते; तिचे सांत्वन करणारा कोणी नाही. “हे याहवेह, माझी दुर्दशा पाहा, शत्रू विजयी झाला आहे.”


तो मला म्हणाला, “मानवपुत्रा, इस्राएलचे वडीलजन आपआपल्या मूर्तिघराच्या अंधारात काय करीत आहेत ते तू पाहिलेस काय? ते म्हणतात, ‘याहवेह आम्हाला पाहत नाही; याहवेहने आम्हाला टाकले आहे.’ ”


याहवेहने मला म्हटले, “इस्राएल व यहूदीयाच्या लोकांचे अपराध फारच घोर आहेत; देश रक्तपाताने व शहर अन्यायाने भरले आहे. ते म्हणतात, ‘याहवेहने देशाला सोडून टाकले आहे; आणि याहवेह पाहत नाही.’


इस्राएलचा उन्मत्तपणाच त्यांच्याविरुद्ध साक्ष देतो; इस्राएल आणि एफ्राईम सुद्धा आपल्या पापात अडखळतात; यहूदीया देखील त्यांच्यासोबत अडखळतो.


ते परमोच्च परमेश्वराकडे फिरत नाहीत; तर ते सदोष धनुष्यांसारखे आहेत. उर्मट शब्दांमुळे त्यांचे पुढारी तलवारीला बळी पडतील. यामुळे इजिप्त देशात त्यांची थट्टा करण्यात येईल.


म्हणून तुमच्यामुळे, सीयोन शेताप्रमाणे नांगरला जाईल, यरुशलेम दगडांचा ढिगारा होईल, मंदिराच्या टेकडीवर दाटीने झाडेझुडपे वाढतील.


तुमचे श्रीमंत लोक हिंसा करतात; तुमचे रहिवासी लबाड आहेत आणि त्यांची जीभ कपटी गोष्ट बोलते.


तुमची दृष्टी इतकी पवित्र आहे की ती कोणतीही दुष्टता पाहू शकत नाही; तुम्ही कोणत्याही स्वरुपातील पातक सहन करू शकत नाही. मग या विश्वासघातकी लोकांना तुम्ही कसे सहन करता? जेव्हा दुष्ट लोक त्यांच्याहून नीतिमान लोकांना गिळंकृत करतात, तेव्हा तुम्ही स्तब्ध कसे राहता?


प्रभूला ईर्षेस पेटवावे असा प्रयत्न आपण करतो काय? आपण त्यांच्यापेक्षा शक्तिमान आहोत काय?


सर्वांचा न्याय करण्यासाठी आणि जे सर्व अनीतिमान कृत्ये त्यांनी अनीतीमध्ये केली आणि अनीतिमान पाप्यांनी त्यांच्याविरुद्ध जे सर्व विद्रोही शब्द बोलले त्या सर्वांना तो दोषी ठरवेल.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan