Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 3:13 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

13 याहवेह त्यांच्या न्यायसभेत स्थानापन्न होतात; ते लोकांचा न्याय करण्यासाठी उभे राहतात.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

13 परमेश्वर वाद चालवण्यास उभा आहे; राष्ट्रांचा न्याय करण्यास उभा आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

13 परमेश्वर न्याय करण्याकरिता न्यायसभेत उभा राहिला आहे, त्याच्या लोकांचा न्याय करण्याकरिता तो उभा राहिला आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 3:13
12 Iomraidhean Croise  

याहवेह म्हणतात, “कारण गरिबांना लुटले आहे व गरजवंत कण्हत आहेत. म्हणून मी आता उठेन आणि त्यांची िनंदा करणाऱ्यापासून त्यांना संरक्षण देईन.”


परमेश्वरा, उठा आणि आपला दावा स्वतःच चालवा; मूर्ख तुमची दिवसभर अवहेलना करीत असतात, याची आठवण ठेवा.


परमेश्वराने महासभेत आपले स्थान ग्रहण केले आहे; त्यांनी “दैवतांसमोर” आपला न्याय जाहीर केला आहे:


“या आता, आपण वाद मिटवू या,” असे याहवेह म्हणतात. “जरी तुमची पापे लाखेसारखी असली, तरी ती बर्फासारखी पांढरी होतील; जरी ती किरमिजाप्रमाणे लाल असली, तरी ती लोकरीसारखी होतील.


तुमचे सार्वभौम याहवेह, तुमचे परमेश्वर, जे त्यांच्या लोकांना सुरक्षित ठेवतात, ते असे म्हणतात: “पाहा, जो प्याला तुम्हाला धुंद करून अडखळवितो तो मी तुमच्या हातातून काढून घेतला आहे; त्या प्याल्यातून, माझ्या क्रोधाच्या प्याल्यातून तुम्ही यापुढे कधीही पिणार नाही.


कारण अग्नीने व आपल्या तलवारीने याहवेह सर्व लोकांवरील त्यांचा न्याय अंमलात आणतील, आणि अनेकजण याहवेहद्वारे वधल्या जातील.


“राष्ट्रे जागृत व्हावी; त्यांनी यहोशाफाटाच्या खोर्‍यात यावे, कारण तिथे मी न्यायासनावर बसून चारही बाजूंच्या सर्व राष्ट्रांचा न्याय करणार आहे.


याहवेह काय म्हणतात ते ऐका: “उभे राहा, पर्वतांसमोर माझ्या दावा मांडा; आणि तुला काय बोलायचे आहे ते टेकड्या ऐको.


“हे पर्वतांनो, याहवेहने केलेल्या आरोपाकडे लक्ष द्या; हे पृथ्वीच्या अढळ पाया, तूही ऐक. कारण याहवेहचा त्यांच्या लोकांविरुद्ध एक दावा आहे. ते इस्राएली लोकांविरुद्ध वाद दाखल करीत आहेत.


Lean sinn:

Sanasan


Sanasan