Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 28:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 पाहा, प्रभूकडे असा एकजण आहे जो सामर्थ्यवान आणि बलवान आहे. तो गारपीट आणि विध्वंस करणाऱ्या वावटळीसारखा, वेगाने फटकारणारा पाऊस आणि पूरासारखा मुसळधार पाऊस, तो पूर्णशक्तीने त्याला जमिनीवर फेकून देईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 पाहा, प्रभूच्या हाती मजबूत व समर्थ असा कोणी आहे, तो गारांच्या वृष्टीसारखा, नासाडी करणार्‍या वादळासारखा, अतिवृष्टीने झालेल्या महापुराच्या झपाट्यासारखा सर्व बलाने तो त्यांच्या गर्वाचा मुकुट भूमीवर झुगारून देत आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 पाहा! परमेश्वराकडे पराक्रमी आणि बलवान असा एक आहे. तो गारपिटीप्रमाणे आहे. नष्ट करणाऱ्या वादळाप्रमाणे, आणि प्रचंड ढगफूटी प्रमाणे, तो पृथ्वीला आपल्या हाताने ताडना करेल.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 28:2
21 Iomraidhean Croise  

ते तर त्यांच्या नेमीत वेळेच्‍या आधी उठविले गेले, त्यांच्या जीवनाचा पाया पुराच्या जलात वाहून गेला.


तुम्ही गरिबांसाठी आश्रयस्थान असे आहात, गरजवंतासाठी त्यांच्या संकटातील आश्रयस्थान आहात, वादळामध्ये निवारा आहात आणि उष्णतेमध्ये सावली आहात. कारण निर्दयी लोकांचा श्वास हा भिंतीवर चालून येणाऱ्या वादळासारखा आहे,


त्या दिवशी, याहवेह त्यांच्या तलवारीने शिक्षा करतील— त्यांची हिंसक, मोठी आणि शक्तिशाली तलवार— लिव्याथान सरपटणारा सर्प, गुंडाळून घेणारा सर्प लिव्हियाथान; ते समुद्रातील या राक्षसाचा वध करतील.


सर्वसमर्थ याहवेह येतील मेघगर्जना आणि भूकंप आणि प्रचंड गर्जनेसह, सोसाट्याच्या वाऱ्याची वावटळ, वादळ आणि गिळंकृत करणाऱ्या अग्निज्वालांसह येतील.


त्यांचा श्वास जलदगतीने येणाऱ्या पाण्याच्या लोंढ्यासारखा आहे, तो गळ्यापर्यंत वर येतो. ते नाशाच्या चाळणीने राष्ट्रांना हादरवितात; ते लोकांच्या जबड्यात लगामाचा भाग ठेवतात जो त्यांना चुकीच्या मार्गाने घेऊन जातो.


याहवेह त्यांची उदात्त वाणी लोकांना ऐकवतील आणि घोर संतापाने आणि भस्मसात करणाऱ्या अग्नीने, ढगफुटी, वादळ आणि गारा यांच्याबरोबर त्यांची भुजा खाली येत असताना लोक पहातील.


जरी गारांनी अरण्याचा नाश होईल आणि सर्व शहरे जमीनदोस्त होतील.


पाहा, सार्वभौम याहवेह सामर्थ्याने येत आहेत, आणि ते बलाढ्य हाताने राज्य करतात. पाहा, त्यांचे बक्षीस त्यांच्याबरोबर आहे, आणि ते देत असलेला मोबदला त्यांच्याबरोबर आहे.


“कारण या लोकांनी हळूवारपणे वाहणारे शिलोहचे पाणी नाकारले आहे आणि रसीन आणि रमाल्याहच्या पुत्राबद्दल आनंद व्यक्त केला आहे.


म्हणून जे पडणारच आहे त्याला चुन्याचा लेप जे लावतात त्यांना सांग, मुसळधार पाऊस येईल आणि मी मोठ्या गारा खाली पाठवेन आणि तुफानी वारा सुटेल.


तू आणि तुझे सर्व सैन्य व तुझ्याबरोबर अनेक राष्ट्रे वादळाप्रमाणे पुढे जातील; तुम्ही मेघांप्रमाणे देश झाकून टाकाल.


बासष्ट ‘सप्तके’ हा काळ संपल्यावर अभिषिक्ताचा वध करण्यात येईल आणि त्याला काही उरणार नाही. मग अधिपतीचे लोक शहराचा आणि पवित्रस्थानाचा विध्वंस करतील. शेवट महापुराप्रमाणे येईल: शेवट होईपर्यंत युद्ध चालू राहील आणि सर्वकाही ओसाड व्हावे असे ठरले आहे.


परंतु भयंकर महापुराने ते निनवेहचा अंत करतील; त्यांच्या शत्रूचा ते अंधकाराच्या साम्राज्यातही पाठलाग करतात.


ते इस्राएल पुढून बेथ-होरोन पासून अजेकाहच्या वाटेवरून पळून जात असताना, याहवेहने त्यांच्यावर गारांच्या प्रचंड वर्षाव केला आणि इस्राएली लोकांच्या तलवारीपेक्षा गारांनीच अधिक लोक मारले गेले.


म्हणूनच तिला मरण, शोक व दुष्काळ या सर्वांच्या पीडा एकाच दिवशी भोगाव्या लागतील. अग्नीने तिला जाळून टाकण्यात येईल. सर्वसमर्थ प्रभू परमेश्वर तिचा न्यायनिवाडा करणार आहेत.


पहिल्या देवदूताने आपला कर्णा वाजविला, तेव्हा पृथ्वीवर रक्तमिश्रित गारा व अग्नीचा वर्षाव झाला. पृथ्वीच्या एकतृतीयांश भागाला आग लागली आणि त्यामुळे एकतृतीयांश वृक्ष व सर्व हिरवे गवत जळून गेले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan