Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 27:6 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

6 येणाऱ्या दिवसात याकोब मूळ धरेल, इस्राएलला अंकुर फुटेल आणि ती बहरेल आणि सर्व जगास फळांनी भरेल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

6 येणार्‍या दिवसांत याकोब मूळ धरील; इस्राएल फुलेल व त्याला फळे येतील; ते फळांनी भूपृष्ठ भरतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 येणाऱ्या दिवसात याकोब मुळावेल, इस्राएल उमलेले व त्यास नवीन पालवी फुटेल, आणि ते जगाची पाठ फळांनी भरतील.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 27:6
21 Iomraidhean Croise  

परमेश्वर जे काही त्यांना मार्गदर्शन करून सांगतात ते संपूर्ण पृथ्वीवर करण्यासाठी त्यांच्या दिशेने ते चोहीकडे फिरतात.


वाळवंट आणि शुष्क भूमी आनंदित होईल; अरण्य हर्षोल्हास करेल आणि बहरून येईल. केशराच्या फुलाप्रमाणे,


त्याच्या फुलोऱ्याचा स्फोट होईल; तो मोठा आनंद करेल आणि उल्हासाने ओरडेल. लबानोनचे गौरव, कर्मेल आणि शारोन यांचे वैभव त्याला दिले जाईल; ते याहवेहचे गौरव, आमच्या परमेश्वराची भव्यता पाहतील.


पुन्हा एकदा यहूदीया राज्यातील अवशिष्ट लोक जमिनीत रुजाल आणि फलद्रृप व्हाल.


त्या दिवसात, याहवेहची शाखा सुंदर आणि गौरवशाली असेल, त्या भूमीतील पिकांचा इस्राएलातील अवशिष्टांना अभिमान व गौरव वाटेल.


आणि भूमीवर एक दशांश जरी राहिला तरी, तो पुन्हा उद्ध्वस्त होईल. परंतु जसे एला आणि अल्लोन जेव्हा कापून टाकल्यावर बुंधा उरतो, त्याचप्रमाणे पवित्र बियाणे हे भूमीमध्ये बुंध्याप्रमाणे होईल.”


तुमच्यातील सर्वात कनिष्ठ, हजारोंच्या संख्येत बहुगुणित होतील, सर्वात लहान एक बलाढ्य राष्ट्र होईल, मी याहवेह आहे; योग्य त्या समयी, मी हे सर्व वेगाने घडवेन.”


तिथून उपकारस्तुतिगान गाईले जातील आणि आनंदगीतांचे ध्वनी येतील. मी त्यांची लोकसंख्या वाढवेन, पण त्यात घट होऊ देणार नाही; मी त्यांना प्रतिष्ठित करेन, पण ते तुच्छ मानले जाणार नाहीत.


आणि तुझ्यात, होय, सर्व इस्राएलात पुष्कळ लोक वसतील असे मी करेन. नगरे वसतील आणि भग्नावशेष पुन्हा बांधले जातील.


“ ‘पण इस्राएलच्या पर्वतांनो, तुम्हावर माझ्या इस्राएली लोकांसाठी फांद्या फुटून फळे येतील, म्हणजे माझे लोक लवकर घरी येतील.


मी तिची माझ्यासाठी देशात पेरणी करेन; ‘माझी प्रिया नाही’ असे मी ज्यांना म्हटले त्याला मी माझी प्रीती दाखवेन. जे ‘माझे लोक नाहीत,’ असे म्हटले त्यांना ‘तुम्ही माझे लोक आहात’ असे म्हणेन; आणि ते म्हणतील, ‘तुम्ही आमचे परमेश्वर आहात.’ ”


“त्या दिवसात अनेक राष्ट्रे याहवेहकडे वळतील. मी तुम्हामध्ये वस्ती करेन मग तुम्हाला कळेल की सर्वसमर्थ याहवेहने मला पाठविले आहे.


जर आपण ख्रिस्ताचे आहोत तर अब्राहामाचे खरे संतान व परमेश्वराने दिलेल्या अभिवचनांचे वारस आहोत.


कारण वास्तविक सुंता झालेले आपणच आहोत आणि जे आपणही आत्म्याद्वारे परमेश्वराची सेवा करतो व ख्रिस्त येशूंमध्ये अभिमान बाळगतो आणि देहावर भरवसा ठेवत नाही.


कारण त्याचवेळी सातव्या देवदूताने आपला रणशिंग वाजविला, त्याबरोबर स्वर्गातून अनेक प्रचंड ध्वनी झाले, त्या वाण्या म्हणत होत्या: “जगाचे राज्य आमच्या प्रभूचे आणि त्यांच्या ख्रिस्ताचे झाले आहे, ते युगानुयुग राज्य करतील.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan