Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 27:5 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 नाहीतर त्यांना माझ्याकडे आश्रय घेण्यासाठी येऊ द्या; त्यांनी माझ्याबरोबर सलोखा करावा, होय, त्यांनी माझ्याबरोबर सलोखा करावा.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 पण त्याने माझा आश्रय धरावा; त्याने माझ्याबरोबर दोस्ती करावी, माझ्याबरोबर दोस्ती करावी.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 अथवा त्याने माझ्याशी समेट करावा म्हणून त्याने माझ्या संरक्षणाला धरावे, त्याने माझ्याशी शांती प्रस्थापीत करावी.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 27:5
22 Iomraidhean Croise  

“परमेश्वराला समर्पित होऊन त्यांच्याशी समेट कर; म्हणजे तुझे वैपुल्य तुला परत मिळेल.


निश्चितच परमेश्वर माझे तारण आहेत; मी भरवसा ठेवेन आणि घाबरणार नाही. याहवेह, याहवेह स्वतः माझे सामर्थ्य आणि माझे संरक्षण आहेत; ते माझे तारण झाले आहेत.”


तुम्ही गरिबांसाठी आश्रयस्थान असे आहात, गरजवंतासाठी त्यांच्या संकटातील आश्रयस्थान आहात, वादळामध्ये निवारा आहात आणि उष्णतेमध्ये सावली आहात. कारण निर्दयी लोकांचा श्वास हा भिंतीवर चालून येणाऱ्या वादळासारखा आहे,


याहवेह, तुम्ही आमच्यासाठी शांती प्रस्थापित करता; जे सर्वकाही आम्ही साध्य केले, ते तुम्ही आमच्यासाठी केले आहे.


आंधळे कोण आहेत, केवळ माझे सेवक, आणि बहिरे कोण आहेत, मी पाठविलेले संदेशवाहक? आंधळे कोण आहेत, ज्यांनी माझ्याशी करार केला आहे, याहवेहच्या सेवकासारखे आंधळे?


ते माझ्याबद्दल म्हणतील, ‘केवळ याहवेहमध्येच आमची सुटका व सामर्थ्य आहे.’ ” जेव्हा त्यांच्यावर संतापलेले सर्वजण त्यांच्याकडे येतील, तेव्हा ते लज्जित होतील.


जो शब्बाथाच्या दिवसास अपवित्र न करता त्याचे पालन करतो, अयोग्य गोष्ट करण्यापासून स्वतःला आवरतो, या सर्व गोष्टींवर अढळ राहतो, जो असे वागतो, तो मनुष्य धन्य होय.”


त्यांच्या ओठांवर प्रशंसा निर्माण करेन. शांती, शांती, दूरच्या व जवळच्या सर्वांना शांतीचा लाभ होवो, आणि मी त्या सर्वांना बरे करेन.” असे याहवेह म्हणतात.


तरीही कोणी तुमच्या नावाचा धावा करीत नाही किंवा तुमचा ध्यास घेत नाही; कारण तुम्ही आमच्यापासून आपले मुख लपविले आहे आणि आम्हाला आमच्या पापांच्या स्वाधीन केले आहे.


“हे यरुशलेम, यरुशलेम! संदेष्ट्यांना ठार मारणारे आणि तुझ्याकडे पाठविलेल्यांना धोंडमार करणारे! जशी कोंबडी आपल्या पिलांना पंखाखाली एकवटते, तसे तुझ्या लेकरांना एकवटण्याची माझी कितीतरी इच्छा होती. पण तुमची नव्हती.


जर त्याला हे शक्य नसेल, तर शत्रू दूर आहे तेव्हाच शांतीच्या प्रस्तावाचे बोलणे करण्यासाठी प्रतिनिधीमंडळ पाठवेल.


“जर तू, हो तू सुद्धा, आज या दिवशी फक्त शांतीच्या गोष्टी जाणून घेतल्या असत्या तर! पण आता त्या तुझ्या दृष्टिआड झाल्या आहेत.


परमेश्वराने हे यासाठी केले की ज्या दोन न बदलणार्‍या गोष्टी ज्याविषयी खोटे बोलणे परमेश्वराला अशक्य आहे व आम्ही स्वतःपुढे ठेवण्यात आलेली आशा प्राप्त करण्याकरिता धावलो, त्या आम्हास मोठे उत्तेजन मिळावे.


तेव्हा यहोशुआ जो गिलगालच्या छावणीत होता, त्याच्याकडे गिबोनाच्या लोकांनी निरोप पाठवून म्हटले: “आमचा त्याग करू नका. आमच्याकडे लवकर येऊन आम्हाला वाचवा! आमची मदत करा, कारण डोंगरवटीच्या सर्व अमोरी राजांनी आमच्याविरुद्ध आपले सैन्य उभारले आहे.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan