Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 27:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 मी रागावलेलो नाही. परंतु जर माझ्यासमोर काटेरी झुडपे आणि काटे आले तर! मी त्यांच्यावर हल्ला करून युद्ध केले असते; मी त्या सर्वांना आग लावली असती.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 माझ्या ठायी राग कसला तो नाहीच; माझ्यापुढे युद्धात काटे व काटेरी झुडपे असती तर ती मी पायाखाली तुडवून सर्व जाळून टाकली असती;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 मी रागवलेलो नाही, लढाईत माझ्यापुढे काट्यांची झाडे व काटेरी झाडे कोण ठेवील! पण युध्दात मी त्याच्या विरूद्ध चाल करून जाईल आणि मी त्यास जाळून नष्ट करून टाकीन.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 27:4
17 Iomraidhean Croise  

परंतु सर्व दुष्ट लोक काट्यांसारखे फेकले जातील, जे हाताने गोळा करता येत नाहीत.


जे कोणी काट्यांना गोळा करतात ते लोखंडी साधन किंवा भाल्याचा दांडा वापरतात; ते जागीच भस्म केले जातात.”


ते सर्वदाच दोष देत राहणार नाहीत, व त्यांचा क्रोध सर्वकाळ टिकून ठेवत नाहीत.


म्हणजेच तुमचा सर्व क्रोध शांत झाला आहे, तुमचा भडकलेला संताप आता शमला आहे.


इस्राएलचा प्रकाश अग्नी होईल, त्यांचे पवित्र परमेश्वर एक ज्वाला होतील; त्याचे काटे आणि काटेरी झुडपे ते एकाच दिवसात जळतील व भस्म करतील.


त्या दिवशी तुम्ही म्हणाल: “याहवेह, मी तुमची स्तुती करेन, जरी तुम्ही माझ्यावर रागावला होता, तरी तुमचा राग दूर झाला आहे आणि तुम्ही माझे सांत्वन केले आहे.


लोक जळून राख होतील; कापलेल्या काटेरी झुडूपांप्रमाणे ते जाळले जातील.”


दुष्टता निश्चितच अग्नीप्रमाणे जळते. ती काटेरी झुडपे आणि काटेरी झाडे यांना भस्म करते, ती झाडेझुडपांचे रान पेटवून टाकते, त्यामुळे तो धुराचा एक स्तंभ होऊन गरगर फिरत वर जातो.


याहवेह असे जाहीर करतात, “कारण मी तुमच्यासाठी केलेल्या योजना मला माहीत आहेत, त्या योजना तुमच्या भल्यासाठी आहेत, वाईटासाठी नाहीत, तुम्हाला आशा व उज्वल भविष्यकाळ देण्याच्या त्या योजना आहेत.


तुझ्यासाठी व जे सर्व तू केले त्यासाठी मी जेव्हा प्रायश्चित करेन, तेव्हा तुला आठवण होईल व लाज वाटेल आणि अवमानामुळे पुन्हा कधी आपले मुख उघडणार नाहीस, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.’ ”


जेव्हा मी कार्य करेन, त्या दिवशी तुम्ही दुष्ट लोकांना तुडवाल, ते तुमच्या पायाखालच्या राखेप्रमाणे होतील,” असे सर्वसमर्थ याहवेह म्हणतात.


खळे स्वच्छ करण्यास त्यांच्या हातात धान्य पाखडण्याचे सूप आहे, ते गहू कोठारात साठवतील आणि न विझणार्‍या अग्नीमध्ये भुसा जाळून टाकतील.”


परंतु जी भूमी काटे आणि कुसळे उपजविते, ती कुचकामी व शापित होण्याच्या बेतात आहे; तिचा अंत जळण्याने होईल.


नीतिमान लोकांना परीक्षेतून कसे सोडवावे व अनीतिमान लोकांना शिक्षा भोगीत न्यायाच्या दिवसासाठी कसे राखून ठेवावे हे प्रभूला कळते.


Lean sinn:

Sanasan


Sanasan