Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 26:5 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 जे उच्चस्थळी राहतात, त्यांना ते नम्र करतात वैभवशाली असलेले शहर ते खाली पाडतात; ते त्याला भुईसपाट करतात आणि त्याला धुळीत टाकून देतात.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 उच्च स्थळी राहणार्‍यांना त्याने खाली आणले आहे; त्याने उच्च नगर पाडून टाकले आहे, जमीनदोस्त केले आहे; धुळीस मिळवले आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 कारण जे अभिमानाने राहतात त्यांना तो खाली आणील, तो उंच गढांना, खाली आणणार, तो तिला भूमीपर्यंत खाली नीच करणार, तो तिला धुळीस मिळवणार.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 26:5
18 Iomraidhean Croise  

आमच्या पूर्वजांच्या पातकांबद्दल आम्हाला दोषी धरू नका; तुमची कृपा लगेचच आमच्या वाट्याला येऊ द्या, कारण आमची स्थिती अत्यंत गंभीर झाली आहे.


मी जगाला त्याच्या दुष्टाईबद्दल दुष्टांना त्यांच्या पापांबद्दल शिक्षा करेन. मी गर्विष्ठांचा अहंकार नाहीसा करेन आणि निर्दयी अभिमानींना मी लीन करेन.


तू तुझ्या अंतःकरणात म्हणाला, “मी स्वर्गात चढून जाईन; मी माझे सिंहासन परमेश्वराच्या ताऱ्यांपेक्षा उंच करेन; मी लोकसभेच्या पर्वतावरील सिंहासनावर बसेन, झाफोनच्या सर्वात उंच पर्वतावर मी स्थानापन्न होईन.


गर्विष्ठ आणि उद्धट लोकांना, जे सर्वकाही उच्च करण्यात आले आहे त्यांना नम्र करण्यासाठी, सर्वसमर्थ याहवेहने एक दिवस निर्धारित केला आहे—


उद्ध्वस्त नगरी निर्जन झाली आहे; प्रत्येक घराचे प्रवेशद्वार बंद करण्यात आले आहे.


तुम्ही शहराला दगडविटांच्या तुकड्यांचा ढीग बनविले, तटबंदी असलेले नगर उद्ध्वस्त केले, परकियांचे किल्ले आता नगर म्हणून अस्तित्वात नाहीत. ते परत कधीही बांधले जाणार नाही.


जरी गारांनी अरण्याचा नाश होईल आणि सर्व शहरे जमीनदोस्त होतील.


“हे कुमारी खाल्डियन कन्ये, सिंहासनावरून खाली उतर व धुळीत बस; हे बाबेल्यांच्या नगराची महाराणी, सिंहासन सोडून जमिनीवर बस. तू यापुढे कोमल व नाजूक म्हणविली जाणार नाहीस.


बाबिलोन भग्नावशेषाचा ढिगारा होईल, तिथे कोल्ह्यांचा संचार होईल, ते भयानकतेचा व तिरस्काराचा विषय होतील, जिथे कोणीही राहत नाही असे ठिकाण.


आणि म्हण, ‘बाबेलही अशीच बुडेल व पुन्हा कधीही वर येणार नाही, कारण मी तिच्यावर अरिष्ट आणणार आहे, आणि तिच्यामधील लोक पडतील.’ ” इथे यिर्मयाहच्या संदेशाचा शेवट होतो.


प्रभूने कसलीच दयामाया न दाखविता याकोबाच्या सर्व आवासांना गिळंकृत केले आहे; त्यांच्या क्रोधाग्नीने यहूदाह कन्येच्या तटबंदीची प्रत्येक भिंत पाडून टाकली आहे. तिचे राज्य व तिचे अधिपती या सर्वांना अपमानित करून त्यांनी जमीनदोस्त केले आहे.


त्यांच्या घोड्यांच्या खुरांनी तुझे सर्व रस्ते तुडविले जातील; तो तुझ्या लोकांना तलवारीने मारेल आणि तुझे मजबूत स्तंभ जमिनीवर पडतील.


तुझे हृदय तुझ्या सौंदर्यामुळे अहंकारी झाले, आणि तुझ्या वैभवामुळे तू तुझ्या ज्ञानाला भ्रष्ट केले. म्हणून मी तुला भूमीवर टाकून दिले; आणि राजांसमोर मी तुला तमाशा असे केले.


तो देवदूत मोठ्याने ओरडून म्हणाला: “ ‘पडले! महान बाबिलोन शहर पडले!’ ती भुतांची वस्ती व सर्वप्रकारच्या अशुद्ध आत्म्यांचा आश्रय, व सर्वप्रकारच्या गलिच्छ, ओंगळ पक्ष्यांचा आश्रय अशी झाली आहे!


Lean sinn:

Sanasan


Sanasan