Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 26:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 वेशी उघडा जेणेकरून नीतिमान राष्ट्र, जे राष्ट्र कायम विश्वास ठेवते, ते प्रवेश करेल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 वेशी उघडा म्हणजे सत्याचे पालन करणारे नीतिमान राष्ट्र आत येईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 वेशी उघडा म्हणजे नितीमान राष्ट्र जो विश्वास पाळतो, ते आत येतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 26:2
25 Iomraidhean Croise  

म्हणजे तुम्ही निवडलेल्यांच्या समृद्धीत मलाही वाटा मिळेल, आणि तुमच्या राष्ट्रांच्या सर्व आनंदामध्ये मीही सहभागी होईन, आणि तुमच्या वारसांसह मी देखील तुमचे स्तुतिगान करेन.


माझ्यासाठी नीतिमत्वाची दारे उघडू द्या; मी आत प्रवेश करून याहवेहचे उपकारस्मरण करेन.


याहवेहची दारे हीच आहेत; याच दारातून नीतिमान प्रवेश करतात.


अहो वेशींनो, आपले मस्तक उंच करा; प्राचीन द्वारांनो, उच्च व्हा; गौरवाच्या राजाला आत प्रवेश करू द्या.


तरी तुम्हीच मला याजकीय राज्य; पवित्र राष्ट्र असे व्हाल.’ तू इस्राएली लोकांना सांगावयाच्या याच गोष्टी आहेत.”


इस्राएलचे सर्व वंशज याहवेहमध्ये सुटका पावतील आणि त्यांच्याबद्दल अभिमान बाळगतील.


तुम्ही नीतिमत्तेने प्रस्थापित व्हाल: जुलूमशाही तुमच्यापासून दूर राहील; तुम्हाला काहीही भयभीत करू शकणार नाही. दहशत तुमच्यापासून दूर करण्यात येईल; ती तुमच्याजवळ येणार नाही.


तुमच्याविरुद्ध घडविलेले कोणतेही शस्त्र कधीच सफल होणार नाही आणि तुमच्यावर आरोप करणारी प्रत्येक जीभ खोटी ठरविली जाईल. याहवेहच्या सेवकांचा हा वारसा आहे, हाच न्याय मी तुम्हाला दिला आहे,” अशी याहवेह घोषणा करतात.


मग तुमचा प्रकाश सूर्योदयाप्रमाणे उजाडेल, आणि तुमचे आरोग्य लगेच तुम्हाला प्राप्त होईल; तुमची धार्मिकता तुमच्यापुढे चालेल, आणि याहवेहचे गौरव तुमची पाठराखण करेल.


तुझ्या वेशी सतत उघड्या राहतील, त्या रात्री वा दिवसा, बंद केल्या जाणार नाहीत, जेणेकरून अनेक देशातून लोक तुझ्याकडे संपत्ती आणू शकतील— त्यांचे राजे विजयोत्सवाने मिरवणूक चालवितील.


यापुढे तुझ्या देशातून हिंसाचार, किंवा अधोगती व विध्वंस तुझ्या सीमेत ऐकिवात येणार नाही, परंतु तुझ्या तटबंदीस तू तारण व तुझ्या वेशींना स्तुती असे म्हणशील.


मग तुझे सर्व लोक नीतिमान होतील आणि ते त्यांच्या भूमीचे सर्वकाळचे मालक बनतील. कारण ते मी रोपलेली फांदी आहेत, माझा गौरव प्रकट करण्यासाठी माझी हस्तकृती आहेत.


सीयोनातील जे सर्व शोक करतात त्यांना— राखेऐवजी सौंदर्याचा मुकुट, विलापाऐवजी आनंदाचे तेल, निराशेच्या आत्म्याऐवजी स्तुतीचे वस्त्र बहाल करण्यासाठी. कारण त्यांचे गौरव प्रकट करण्यासाठी ते नीतिमत्तेचे एला वृक्ष याहवेहने स्वतः रोपलेले असे संबोधले जातील.


सीयोनचा निर्दोषपणा सूर्योदयासारखा उजळून, मी निःशब्द राहणार नाही, व यरुशलेमचे तारण जळत्या मशालीसारखे सिद्ध होईपर्यंत, मी शांत राहणार नाही.


बाहेर पडा! वेशींच्या बाहेर पडा! माझ्या लोकांसाठी मार्ग तयार करा. बांधा, महामार्ग बांधा! दगडधोंडे काढून टाका. राष्ट्रांकरिता ध्वज उंच फडकवा.


राष्ट्रे तुझा निर्दोषपणा, आणि सर्व राजे तुझे वैभव बघतील; याहवेहच्या मुखाने बहाल केलेल्या नवीन नावाने तुला संबोधण्यात येईल.


सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात: “जगभरचे लोक व अनेक नगरांमधील रहिवासी येतील,


परमेश्वराची स्तुती करीत होते आणि सर्व लोकांकडून त्यांना चांगली वागणूक मिळाल्याचा आनंद ते करीत होते आणि प्रभूने त्यांच्या संख्येत प्रत्येक दिवशी तारण पावलेल्यांची भर घातली.


परंतु तुम्ही निवडलेले लोक, राजकीय याजकगण, पवित्र राष्ट्र, परमेश्वराचे विशेष धन आहात, यासाठी की ज्यांनी तुम्हाला अंधारातून काढून त्यांच्या अद्भुत प्रकाशात आणले त्यांच्या स्तुतीची घोषणा करावी.


परंतु परमेश्वराच्या वचनाप्रमाणे ज्यामध्ये नीतिमत्त्व वास करते, असे नवे आकाश व नव्या पृथ्वीची आपण वाट पाहत आहोत.


प्रिय बंधूंनो, आपणा सर्वास मिळालेल्या सामाईक तारणाबद्दल मी तुम्हाला लिहिण्यास उत्सुक होतो, परंतु मला तुम्हाला लिहिण्याचे आणि विनंती करण्याचे अगत्य वाटले की जो विश्वास परमेश्वराच्या पवित्र लोकांना एकदाचाच सोपवून दिला होता, तो राखण्याविषयी तुम्ही झटावे.


राष्ट्रे त्यांच्या प्रकाशाने चालतील आणि पृथ्वीवरील राजे त्यांचे वैभव तिथे आणतील.


ते नवे गीत गाऊ लागले. गीताचे शब्द असे: “ती गुंडाळी घ्यावयास व त्याचे शिक्के फोडून तो उघडण्यास तुम्ही पात्र आहात, कारण तुमचा वध करण्यात आला होता आणि तुम्ही आपल्या रक्ताने परमेश्वरासाठी प्रत्येक वंश, भाषा, लोक व राष्ट्रे विकत घेतले आहे,


Lean sinn:

Sanasan


Sanasan