Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 24:1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 पाहा, याहवेह पृथ्वीचा नाश करणार आहेत आणि ती उद्ध्वस्त करणार आहेत; ते तिचा चेहरा बिघडवून टाकतील आणि तेथील रहिवाशांची पांगापांग करतील—

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 पाहा, परमेश्वर पृथ्वी रिक्त करीत आहे, तिला ओसाड करीत आहे, तिला विरूप करीत आहे व तिच्या रहिवाशांची दाणादाण करीत आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 पाहा परमेश्वर पृथ्वीला ओसाड व रिकामी करीत आहे, तो त्यातील राहणाऱ्यांची पागांपांग करीत आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 24:1
45 Iomraidhean Croise  

मी यरुशलेमावर शोमरोनचे मापनसूत्र आणि अहाबाच्या घराण्याला लावलेला ओळंबा ताणीन. जसा कोणी भांडे पुसून पालथे करून ठेवतो तसेच मी यरुशलेमाचे करेन.


“तुम्ही मोशेला काय सांगितले होते याची कृपा करून आठवण करा. तुम्ही म्हटले होते, ‘जर तुम्ही अविश्वासू व्हाल, तर मी तुम्हाला राष्ट्रांमध्ये विखरून टाकीन;


याहवेह निर्वासितांचे रक्षण करतात, आणि अनाथ व विधवा यांची काळजी घेतात, परंतु दुष्टांच्या योजना ते नष्ट करतात.


म्हणून सर्वसमर्थ याहवेह यांच्या क्रोधाने आणि त्यांच्या क्रोधाग्नीच्या दिवशी मी आकाशे थरथर कापतील असे करेन; पृथ्वी तिच्या जागेवर हादरेल.


ते फार दूर देशातून येतात, आकाशाच्या शेवटच्या टोकापासून— याहवेह आणि त्यांच्या क्रोधाची शस्त्रे संपूर्ण देशाचा नाश करण्यासाठी येतात.


जेव्हा याहवेह पृथ्वीला हलविण्यासाठी उभे राहतील तेव्हा त्यांच्या भयावह सान्निध्यापासून आणि गौरवी प्रतापापासून वाचण्यास लोक खडकांच्या गुहांकडे धाव घेतील आणि जमिनीतील खाचात लपतील.


पृथ्वीचे तुकडे झाले आहेत, पृथ्वी पूर्ण फाटून गेली आहे, पृथ्वीला जबरदस्त हादरा मिळाला आहे.


पृथ्वी मद्यपीसारखी झोकांड्या खात आहे. वादळात झोपडी हेलकावे खाते, तशी ती हेलकावे खात आहे; कारण तिच्या बंडखोरपणाचे ओझे अत्यंत जड झाले आहे, ती अशी कोसळेल—कि पुन्हा उठणार नाही.


तटबंदीचे शहर उजाड झाले आहे, टाकून दिलेले आवास, टाकून दिलेल्या अरण्यासारखी आहे; तिथे वासरे चरतात, तिथे ती झोपतात, ते त्याच्या फांद्या खाऊन निष्पर्ण करतात.


तुम्ही गोष्टी उलटवून टाकता, जणू कुंभार हा मातीसारखा असेल! ज्याला आकार दिला, तो आकार देणाऱ्याला असे म्हणेल का, “तू माझी रचना केली नाहीस?” मडके कुंभाराला म्हणू शकते का, “तुला काहीच माहीत नाही?”


तरीसुद्धा मी अरीएलला वेढा घालेन; ती शोक करेल आणि विलाप करेल, ती माझ्यासाठी वेदीच्या अरीएलसारखे होईल.


याहवेह त्यांच्याकडील शिक्षेच्या दांड्याने त्यांच्यावर दिलेला प्रत्येक प्रहार डफ आणि वीणा यांच्या संगीतावर असेल, जसे ते त्यांच्या हाताच्या तडाख्याने युद्धामध्ये त्यांच्याशी लढतात.


तुमचे ऊर बडवा, प्रसन्न करणार्‍या तुमच्या शेतांसाठी, फलवंत द्राक्षवेलीसाठी


भूमी शुष्क होत आहे आणि ओसाड झाली आहे, लबानोन शरमिंदा झाला आहे आणि कोमेजला आहे; शारोनची कुरणे अरबी वाळवंटसारखी झाली आहेत, आणि बाशान व कर्मेल त्यांची पाने गळून पडत आहेत.


रात्री किंवा दिवसा ते विझविले जाणार नाही. त्याचा धूर कायमचा उठत राहील. पिढ्यान् पिढ्या ते ओसाड पडून राहील. यामधून पुन्हा कोणीही प्रवास करणार नाही.


याहवेह सर्व राष्ट्रांवर रागावले आहेत; त्यांचा क्रोध सर्व सैन्यांवर आला आहे. ते त्यांचा संपूर्णपणे नाश करतील, ते त्यांना वध करणाऱ्यांकडे सोपवून देतील.


मी पर्वत व टेकड्या उजाड करेन. त्यांची सर्व हिरवळ वाळवून टाकेन; मी नद्यांना बेटांमध्ये रूपांतरित करेन, आणि जलाशय वाळवून टाकेन.


मी ती जमीन उजाड करेन, तिथे छाटणी किंवा नांगरणी करणार नाही, आणि तिथे कुसळे व काटेरी झुडपे वाढतील. मी ढगांना आज्ञा देईन की, त्यांच्यावर पाऊस पाडू नका.”


सिंह आपल्या गुहेतून बाहेर पडला आहे; राष्ट्रांचा विनाशक आलेला आहे. त्याने आपले निवास सोडले आहे. तुमच्या भूमीला उद्ध्वस्त करण्यासाठी. तुमची नगरे उजाड होतील आणि निर्जन होतील.


नंतर कारेहाचा पुत्र योहानानने मिस्पाह येथे गदल्याहशी गुप्तपणे चर्चा केली व त्याला म्हटले, “मी नथन्याहचा पुत्र इश्माएलचा वध करतो, कोणालाही कळणार नाही. त्याला तुमचा वध का करू द्यावा, जे यहूदी गोळा होऊन तुझ्याकडे परतले आहेत, त्यांची पांगापांग होऊन उरलेल्या यहूदीयाचा नाश का होऊ द्यावा?”


“इस्राएली लोकांची मेंढराप्रमाणे पांगापांग झाली आहे, सिंहाने पाठलाग करून त्यांना पळविले आहे. प्रथम ज्याने त्यांना गिळंकृत केले तो अश्शूरचा राजा होता; नंतर त्यांच्या हाडांचा चुराडा केला तो बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर होता.”


“बाबेलच्या नबुखद्नेस्सर राजाने आम्हाला गिळंकृत केले आहे, त्याने आम्हाला निराशेत ढकलले आहे, त्याने आम्हाला रिक्त भांड्यासारखे केले आहे. सर्पासारखे त्याने आम्हाला गिळले आहे. आणि आमच्या मिष्टान्नाने स्वतःचे पोट भरले आहे, आणि मग आम्हाला बाहेर थुंकून दिले आहे.


जे त्यांच्या पूर्वजांना माहीत नाही, अशा देशात मी त्यांची पांगापांग करेन, तिथे सुद्धा त्यांचा पूर्ण नायनाट करेपर्यंत माझी तलवार त्यांची पाठ सोडणार नाही.”


वसलेली नगरे ओसाड होतील आणि भूमी उजाड होईल. तेव्हा तुम्ही जाणाल की मीच याहवेह आहे.’ ”


मग रिकामी कढई निखार्‍यावर ठेवा ती गरम होऊन तिचे तांबे चमकू द्या, म्हणजे तिची अशुद्धता वितळून जाईल आणि त्याचा थर पूर्णपणे जळून जाईल.


सार्वभौम याहवेह असे म्हणतात: सर्व पृथ्वी हर्ष करीत असताना मी तुम्हाला उजाड करेन.


“तुझ्या सभोवतालच्या सर्व राष्ट्रांमध्ये आणि जे तुझ्याजवळून जातील त्यांच्या समक्ष मी तुझा नाश व तुला निंदा असे करेन.


जेव्हा तुझे वेढ्याचे दिवस संपतील, तेव्हा केसांचा तिसरा भाग शहरामध्ये जाळ. मग केसांचा तिसरा भाग शहराभोवती तलवारीने कापत जा. आणि तिसरा भाग वार्‍यावर उडव, कारण मी आपली तलवार उपसून त्यांचा पाठलाग करेन.


मी आपला हात त्यांच्याविरुद्ध उगारेन आणि दिबलाहच्या वाळवंटापासून ते जिथे कुठे राहतील मी त्यांचा देश ओसाड करेन; तेव्हा ते जाणतील की मीच याहवेह आहे.’ ”


तुम्ही जिथे वस्ती कराल, ती नगरे ओसाड होतील आणि तेथील उच्च स्थाने उद्ध्वस्त होतील, यासाठी की तुमच्या वेद्या ओसाड होऊन नष्ट होतील, तुमच्या मूर्तींचा चुराडा होऊन भुगा होतील, तुमच्या धुपांच्या वेद्या पाडल्या जातील आणि तुम्ही जे काही बनविले ते सर्व पुसून टाकल्या जातील.


समय आला आहे! दिवस येऊन ठेपला आहे! विकत घेणार्‍याने आनंद करू नये किंवा विकत देणार्‍याने दुःखी होऊ नये, कारण माझा क्रोध संपूर्ण समुहावर आहे.


“ ‘त्यांनी कर्णे वाजविली आहे, त्यांनी सर्वकाही सज्ज केले आहे, परंतु कोणी युद्धात जाणार नाही, कारण संपूर्ण समुहावर माझा क्रोध आहे.


त्यांच्यासमोर पर्वत कंपित होतात व टेकड्या विरघळतात. पृथ्वी आणि जग व त्यात राहणारे सर्वजण त्यांच्या समक्षतेत थरकापतात.


ती लुटल्या गेली, लुबाडल्या गेली व विवस्त्र करण्यात आली आहे! तिच्या लोकांची अंतःकरणे वितळून गेली आहेत व गुडघे निकामी झाले आहेत, त्यांची शरीरे थरथर कापत आहेत व त्यांचे चेहरे फिके पडले आहेत.


काही तलवारीमुळे पडतील आणि काहींना सर्व राष्ट्रांमध्ये कैद करून नेण्यात येईल आणि गैरयहूदीयांचा काळ पूर्ण होईपर्यंत यरुशलेम शहरास गैरयहूदी पायाखाली तुडवतील.


पण ते तिथे नाहीत, असे पाहून त्यांनी यासोन व इतर काही विश्वासणार्‍यांना ओढून काढले व त्यांना शहर न्यायाधीशांपुढे नेऊन आरडाओरड करून म्हणाले, “या माणसांनी सर्व जगात उलथापालथ केली आहे आणि आता ते येथेही आलेले आहेत;


पृथ्वीच्या एका टोकापासून दुसर्‍या टोकापर्यंत असलेल्या निरनिराळ्या राष्ट्रांमध्ये याहवेह तुमची पांगापांग करतील. तिथे तुम्ही किंवा तुमच्या पूर्वजांनी ज्यांची कधीही उपासना केली नाही—अशा लाकडाच्या आणि दगडाच्या दैवतांची तुम्ही उपासना कराल.


मी असे म्हटले असते, मी त्यांना दूरच्या देशात पांगविणार आणि त्यांची आठवणसुद्धा मानवी स्मरणातून पुसली जाईल,


याहवेह, तुमची इतर राष्ट्रांमध्ये पांगापांग करतील आणि ज्या राष्ट्रांमध्ये याहवेह तुम्हाला घेऊन जातील त्यांच्यापैकी फक्त काही लोकच मागे उरतील.


परमेश्वराचा आणि प्रभू येशू ख्रिस्ताचा दास याकोब याजकडून, राष्ट्रांमध्ये पांगलेल्या बारा वंशाना, शुभेच्छा.


Lean sinn:

Sanasan


Sanasan