Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 23:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 सीदोन आणि समुद्रातील किल्ल्यांनो, लज्जित व्हा, कारण समुद्र म्हणाला: “मला कधीही बाळंतपणाच्या वेदना झाल्या नाहीत आणि मी कधीही प्रसवलो नाही; मी कधीही मुलांचे संगोपन केले नाही किंवा मुलींचा सांभाळ केला नाही.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 हे सीदोना, फजीत हो; समुद्र, समुद्रदुर्ग म्हणत आहे : “मी वेणा दिल्या नाहीत, प्रसवलो नाही, तरुणांना वाढवले नाही, कुमारी लहानाच्या मोठ्या केल्या नाहीत.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 हे सीदोना लज्जीत हो, कारण समुद्र, समुद्रातील पराक्रमी, बोलला आहे, तो म्हणतो, “मी प्रसुती वेदना दिल्या नाहीत व मी प्रसवलेहि नाही, मी तरूण पुरूष वाढवले नाहीत व तरूणींना लहाण्याच्या मोठ्या केल्या नाहीत.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 23:4
12 Iomraidhean Croise  

कनान यांचा पिता होता: प्रथमपुत्र सीदोन आणि हेथ,


आणि सीदोनापासून गरारपासून गाझाच्या पट्ट्‍यातील, सदोम, गमोरा, अदमाह व लेशाजवळील सबोईम येथवर कनानाची सीमा पसरली.)


तसेच सोर व सीदोन येथील सर्व राजे; समुद्रापलीकडच्या तटवर्तीप्रदेशातील सर्व राजे;


मग एदोम, मोआब, अम्मोन, सोर व सीदोन यांच्या राजांना, यरुशलेममध्ये यहूदीयाचा राजा सिद्कीयाहकडे आलेल्या दूतांसह हा संदेश पाठव,


“मानवपुत्रा, सीदोनेकडे आपले मुख कर; आणि तिच्याविषयी भविष्यवाणी कर


आणि म्हण: ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: “ ‘हे सीदोन नगरी, मी तुझ्याविरुद्ध आहे, आणि तुझ्यामध्ये मी माझे गौरव प्रकट करेन. जेव्हा मी तुला शिक्षेने पिडेन, आणि तुझ्यात मी पवित्र मानला जाईन तेव्हा तू जाणशील की मीच याहवेह आहे.


याहवेहने त्यांना इस्राएली लोकांच्या हाती दिले व त्यांनी शत्रूंचा सीदोन महानगरीपर्यंत व मिसरेफोत-मयिम या ठिकाणापर्यंत आणि पूर्वेस मिस्पेह खोर्‍यापर्यंत पाठलाग केला; अशा रीतीने या लढाईत शत्रूंचा एकही व्यक्ती जिवंत राहिला नाही.


दिव्यांचा प्रकाश यापुढे तुझ्यावर उजळणार नाही आणि वधूवरांची वाणी पुन्हा ऐकू येणार नाही. तुझे व्यापारी पृथ्वीवरील थोर लोक होते. सर्व राष्ट्रे तुझ्या चेटकाने ठकविली गेली होती.


इस्राएली लोकांनी याहवेहच्या दृष्टीने पुन्हा वाईट कृत्य केले. ते बआल व अष्टारोथ या दैवतांच्या मूर्तीची आणि अरामाचे दैवत, सीदोनाचे दैवत, मोआबाचे दैवत, अम्मोनाचे दैवत व पलिष्टीच्या दैवतांची उपासना व सेवा करू लागले. इस्राएली लोक याहवेहला विसरले आणि त्यांची सेवा करणे सोडले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan