Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 23:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 प्रचंड जलाशयावरून शिहोरचे धान्य आले; नाईल नदीकाठापासून कापणी केलेले पीक हे सोरचे उत्पन्न होते, आणि ती राष्ट्रांची बाजारपेठ झाली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 महासागरावरून आलेले शीहोर थडीचे उत्पन्न, नील नदीचे पीक ही त्याची मिळकत होती; ते शहर राष्ट्रांची पेठ झाले होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 आणि महान जलांवरून नाईल नदीकाठी पिकलेले सर्व पीक, समुद्रा पलीकडून आणलेले सीहोर या भागातले धान्य ते सोर याकरीता आणले; ती राष्ट्रांची बाजारपेठ होती.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 23:3
12 Iomraidhean Croise  

मग दावीदाने परमेश्वराचा कोश किर्याथ-यआरीमहून आणण्याच्या वेळी इजिप्तच्या शिहोर नदीपासून ते लबो हमाथपर्यंत सर्वत्र विखुरलेल्या इस्राएली लोकांना एकत्र केले.


तसेच नाईल नदीच्या काठावरील, नदिमुखावरील झाडेसुद्धा, नाईल नदीच्या काठावर पेरणी केलेले प्रत्येक शेत कोरडे होईल व उडून नाहीसे होईल.


सोरच्या विरोधात अशी योजना कोणी केली आहे, मुकुटाचा बहुमान प्रदान करणारे, ज्यांचे व्यापारी राजकुमार आहेत, ज्यांचे व्यापारी पृथ्वीवरील प्रसिद्ध लोक आहेत?


तरी तुम्ही किती आशीर्वादित व्हाल, प्रत्येक झऱ्याजवळ तुमचे बीज पेराल, आणि तुमची गुरे आणि गाढवे मुक्तपणे चरतील.


आता इजिप्तकडे कशाला जाता नील नदीचे पाणी पिण्यासाठी काय? आणि अश्शूराकडे का जावे फरात नदीचे पाणी पिण्यासाठी काय?


जेव्हा तुझा माल समुद्रावरून जात असे, तेव्हा तू पुष्कळ राष्ट्रांना संतुष्ट केले; तुझ्या महान संपत्ती व मालाने पृथ्वीवरील राजांना तू समृद्ध केलेस.


तुझी सुज्ञता व समज याद्वारे तू आपल्यासाठी संपत्ती मिळविली आणि आपल्या खजिन्यात सोने आणि चांदीचा साठा केलास.


तुम्ही माझे रूप आणि सोने हरण केले आहे आणि माझी सर्व मोलवान भांडारे घेऊन ती तुमच्या मंदिरात ठेवली आहेत.


कारण ज्या देशात तुम्ही प्रवेश करणार आहात व तो ताब्यात घेणार आहात, तो देश तुम्ही सोडून आलेल्या इजिप्त देशातील भूमीसारखा नाही. तिथे तुम्ही पेरणी केली व भाज्यांचे मळे लावण्यासाठी जलसिंचन केले.


पूर्व इजिप्तच्या शिहोर नदीपासून उत्तरेकडे असलेल्या एक्रोनच्या सीमेपर्यंत सर्व मिळून कनानी लोकांचा प्रदेश समजला जात असे, जरी इथे गाझा, अश्दोद, अष्कलोन, गथ आणि एक्रोन असे पाच पलिष्टी शासक होते; अव्वी लोकांचा प्रदेश:


Lean sinn:

Sanasan


Sanasan