Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 23:12 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

12 ते म्हणाले, “कुमारिके सीदोन, यापुढे तुझी चैनबाजी चालणार नाही. आता तू चिरडली जावी! “वर कित्तीम पलीकडे गेलात; तर तिथेही तुम्हाला विश्रांती मिळणार नाही.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

12 तो म्हणाला, “हे कलंक लागलेल्या सीदोनाच्या कुमारिके, तू इतःपर उल्लासणार नाहीस; ऊठ, कित्ती लोकांच्या देशात निघून जा; तेथेही तुला थारा मिळणार नाही.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 तो म्हणतो, “हे कलंकीत भ्रष्ट झालेली सीदोन कन्ये तू येथून पुढे आनंदीत होणार नाहीस, उठ, सायप्रस पार कर, पण तेथेही तुला आराम मिळणार नाही.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 23:12
21 Iomraidhean Croise  

यावानाचे पुत्र: एलिशाह, तार्शीश, कित्तीम व दोदानीम.


“जबुलून समुद्रकिनारी राहील आणि तो जहाजांचे बंदर होईल. त्याची सीमा सीदोनपर्यंत पसरेल.


ही तुमची रंगेलपणाची नगरी आहे काय, फार जुने, पुरातन नगर, जिच्या पायांनी तिला फार दूर असलेल्या प्रदेशात स्थायिक होण्यासाठी नेले आहे?


त्याच्याविरुद्ध बोललेले याहवेहचे वचन हे आहे: “सीयोनाची कुमारी कन्या तुझा उपहास आणि तिरस्कार करते. यरुशलेम कन्या तुझे पलायन बघून आपले डोके हालविते.


“हे कुमारी खाल्डियन कन्ये, सिंहासनावरून खाली उतर व धुळीत बस; हे बाबेल्यांच्या नगराची महाराणी, सिंहासन सोडून जमिनीवर बस. तू यापुढे कोमल व नाजूक म्हणविली जाणार नाहीस.


“स्तब्ध बस, अंधारात जा, खास्द्यांच्या नगराची राणी. तू यापुढे राज्याची महाराणी म्हणविली जाणार नाहीस.


“हे वचन तू त्यांना सांग: “ ‘रात्रंदिवस माझ्या नेत्रातून अश्रू वाहू दे मी माझे रडणे थांबविणार नाही; माझे लोक, कुमारी कन्या, तिच्यासाठी, कारण ती जखमांनी घायाळ होऊन तुडविली गेली आहे.


समुद्राचा किनारा ओलांडून कित्तीम बेटाच्या तटावर जा आणि पाहा, केदारच्या वाळवंटात पाठवा व जवळून चौकशी करा; अशा प्रकारे कधी काही घडले का ते पहा:


“हे इजिप्तच्या कुमारिके, वर गिलआदामध्ये जाऊन औषध आण. तुझे घाव बरे व्हावे म्हणून तू अनेक औषधे वापरलीस, पण तुझे घाव बरे करेल असे औषधच नाही.


“माझ्यामध्ये असलेल्या सर्व योद्ध्यांना प्रभूने नाकारले आहे; माझ्या तरुणांना चिरडून टाकण्यासाठी प्रभूंनी एका मोठ्या सैन्यास हजर राहण्यास फर्माविले आहे. त्यांच्या द्राक्षकुंडात प्रभूंनी कुमारी कन्या यहूदीयास तुडविले आहे.


पीडा व कठोर परिश्रम केल्यानंतर यहूदाह बंदिवासात गेली आहे. ती अन्य राष्ट्रांमध्ये राहते; आता तिला कुठेही आराम मिळत नाही. जे तिचा पाठलाग करीत असत, त्यांनी तिच्या पीडित परिस्थितीत तिला मागे टाकून दिले आहे.


लोक त्यांच्यावर खेकसतात: “चालते व्हा! तुम्ही अशुद्ध आहात! दूर! दूर! आम्हाला स्पर्श करू नका!” जेव्हा ते पलायन करतात आणि तिथे भटकतात, त्या देशातील लोक म्हणतात, “ते आता इथे राहू शकत नाहीत.”


त्यांनी तुझी वल्ही बाशानच्या एला झाडाची बनविली; त्यांनी तुझ्या बैठकी कित्तीम द्वीपातील सुरूच्या लाकडाच्या बनविल्या आणि त्यांना हस्तिदंताने सजविले.


पश्चिमेकडील कित्तीम बेटांतील जहाजे त्याला विरोध करतील आणि त्याचे धैर्य तुटेल. मग तो पवित्र करारावर आपला रोष काढण्यासाठी परत येईल. तो परत येईल आणि पवित्र कराराचा त्याग करणार्‍यांवर कृपा दाखवेल.


कित्तीमाच्या किनार्‍यावरून जहाजे येतील; ते अश्शूर व एबर यांच्यावर जुलूम करतील, परंतु त्यांचाही नाश होईल.”


याहवेहने त्यांना इस्राएली लोकांच्या हाती दिले व त्यांनी शत्रूंचा सीदोन महानगरीपर्यंत व मिसरेफोत-मयिम या ठिकाणापर्यंत आणि पूर्वेस मिस्पेह खोर्‍यापर्यंत पाठलाग केला; अशा रीतीने या लढाईत शत्रूंचा एकही व्यक्ती जिवंत राहिला नाही.


त्या नगरीत आता कर्णे, वीणा, बासरी, यांचा सूरही कधी ऐकू येणार नाही. तिथे कसल्याच प्रकारचे उद्योगधंदे पुन्हा आढळणार नाहीत. तिथे गिरणीचा आवाज पुन्हा ऐकू येणार नाही.


Lean sinn:

Sanasan


Sanasan