Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 22:1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 दृष्टान्ताच्या खोऱ्याविरुद्ध एक भविष्यवाणी: आता तुम्हाला काय त्रास होत आहे, ज्यामुळे तुम्ही सर्वजण छप्परावर गेलेले आहात?

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 दृष्टान्ताचे खोरे ह्याविषयीची देववाणी : तुम्ही सर्व धाब्यावर चढला त्या तुम्हांला काय झाले?

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 दृष्टांताच्या खोऱ्याविषयी ही देववाणी; तुम्ही सर्व घरच्या माळीवर जात आहा, त्याचे काय कारण आहे?

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 22:1
26 Iomraidhean Croise  

मग परमेश्वराने त्या मुलाच्या रडणे ऐकले आणि परमेश्वराचा दूत आकाशातून हागारेला हाक मारून म्हणाला, “हागारे, तुला काय झाले आहे? भिऊ नकोस; कारण परमेश्वराने मुलाचे रडणे ऐकले आहे.


राजाने तिला विचारले, “तुला काय त्रास आहे?” ती म्हणाली, “मी विधवा आहे; माझा पती मरण पावला आहे.


मग राजाने तिला विचारले, “तुला काय झाले आहे?” स्त्रीने उत्तर दिले, “या स्त्रीने मला म्हटले, ‘तू आपला मुलगा दे म्हणजे आज आपण त्याला खाऊ आणि उद्या आपण माझ्या मुलाला खाऊ.’


हे समुद्रा, तू पलायन का केले? अगे यार्देने, तू मागे का फिरलीस?


यरुशलेमला वेष्टण करणारे पर्वत जसे तिचे रक्षण करतात, तसेच आता आणि सदासर्वकाळ, याहवेह आपल्या लोकांना वेष्टून त्यांचे रक्षण करतात.


जिथे लोकांना दर्शन नाही, तिथे लोक बेबंद असतात. परंतु तो धन्य आहे जो ज्ञानाच्या शिक्षणाकडे लक्ष लावतो.


आमोजाचा पुत्र यशायाहने बाबेलच्या विरोधात पाहिलेला दृष्टान्त:


रस्त्यांवर ते गोणपाट घालतात; छतावर आणि सार्वजनिक चौकांमध्ये ते सर्व आक्रोश करतात, विलाप करीत पालथे पडतात.


प्रभू, सर्वसमर्थ याहवेह, यांचा एक दिवस आहे दृष्टान्ताच्या खोऱ्यामध्ये गोंधळाचा, तुडविण्याचा आणि दहशतीचा, भिंती तोडून पाडण्याचा दिवस आणि पर्वतातून ओरडण्याचा दिवस आहे.


यरुशलेममधील घरे व यहूदीयांच्या राजांचे राजवाडे तोफेतासारखे भ्रष्ट करेन—ज्या घरांच्या धाब्यांवर त्यांनी आकाशातील शक्तींना धूप जाळला व इतर दैवतांस पेयार्पणे वाहिली.’ ”


हे यरुशलेमा, मी तुझ्याविरुद्ध आहे, तुम्ही जे या खोर्‍यावर राहता खडकाळ पठारावरील रहिवासी, याहवेह असे म्हणतात; तुम्ही म्हणता, “आमच्याविरुद्ध कोण येईल? आमच्या वस्ती मध्ये कोण प्रवेश करेल?”


हल्ला करणारे बाबिलोनचे सैनिक आत शिरतील, आणि शहराला आग लावतील. माझा संताप चेतविण्यासाठी ज्या घरांच्या धाब्यावरून बआलमूर्तीस धूप जाळण्यात आला आणि दैवतांना पेयार्पणे वाहण्यात आली, ती सर्व घरे जाळून टाकण्यात येतील.


इस्राएली व यहूदीयाच्या लोकांनी—ते, त्यांचे राजे व अधिकारी, त्यांचे याजक व संदेष्टे, यरुशलेम नगरात व यहूदीयात राहणाऱ्या लोकांनी त्यांच्या दुष्कर्माने मला अत्यंत संताप आणला आहे.


मोआबभूमीतील प्रत्येक घराच्या छतावर आणि प्रत्येक चौरस्त्यावर केवळ आकांतच आढळत आहे, कारण जुन्या निकामी पात्रांचा चक्काचूर करावा त्याप्रमाणे मोआब भूमीचा मी चुराडा केला आहे,” याहवेह असे जाहीर करतात.


“राष्ट्रे जागृत व्हावी; त्यांनी यहोशाफाटाच्या खोर्‍यात यावे, कारण तिथे मी न्यायासनावर बसून चारही बाजूंच्या सर्व राष्ट्रांचा न्याय करणार आहे.


निर्णयाच्या खोर्‍यात लोकांची गर्दीच गर्दी आहे! कारण निर्णयाच्या खोऱ्यात याहवेहचा दिवस येऊन ठेपला आहे.


म्हणूनच तुझ्यावर रात्र येईल, दृष्टान्त दिसणार नाही, आणि अंधार येईल, तुम्ही दैवप्रश्न पाहिल्याशिवाय! या संदेष्ट्यांसाठी सूर्यास्त होईल आणि दिवस असता त्यांच्यावर अंधार पडेल.


जे त्यांच्या घरांच्या धाब्यांवर जातात आणि आकाशातील नक्षत्रांना नमन करतात. जे याहवेहला नमन करून त्यांची शपथ घेतात, आणि मोलेख दैवताचीही शपथ घेतात,


आता मी तुम्हाला अंधारात सांगत आहे, ते दिवसाच्या प्रकाशात सांगा; जे मी तुमच्या कानात सांगत आहे, ते घराच्या धाब्यावरून जाहीर करा.


सर्व बाबतीत आहे! सर्वात प्रथम यहूदीयांना परमेश्वराने आपले वचन सोपवून दिले होते.


जेव्हा तुम्ही नवीन घर बांधाल तेव्हा धाब्याला कठडा बांधवा, म्हणजे कोणीही धाब्यावरून पडल्यास मनुष्य हत्येचा दोष तुमच्या घरावर येऊ नये.


जेव्हा त्यांनी दानच्या लोकांना हाक मारली तेव्हा ते वळले आणि मीखाहला विचारले, “तुला काय झाले आहे की तू आपल्या लोकांना युद्ध करण्यास घेऊन आला आहेस?”


त्याचवेळेस शौल त्याच्या बैलांमागून शेतातून परत येत होता, त्याने विचारले, “प्रत्येकाला काय झाले आहे? ते का रडत आहेत?” तेव्हा याबेशाच्या लोकांनी जे काही सांगितले होते ते त्यांनी त्याला सांगितले.


शमुवेल बाळ एलीच्या हाताखाली याहवेहची सेवा करीत होता. त्या दिवसात याहवेहचे वचन दुर्मिळ होते; दृष्टान्तही फारसे मिळत नसत.


Lean sinn:

Sanasan


Sanasan