Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 21:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 माझे अंतःकरण अडखळते, भीती मला थरथर कापविते; ज्या संध्याकाळची मी आतुरतेने वाट पाहत असे ती माझ्यासाठी भयप्रद अशी झाली आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 माझे हृदय धडधडते; भीतीने मी त्रस्त झालो आहे; माझी आवडती वेळ संध्याकाळ मला कंपित करणारी झाली आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 माझे हृदय धडधडते, थरकाप माझ्यावर हावी होतो. रात्र मला किती सुखावह वाटे, ती आता मला भेदरून टाकणारी झाली असून.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 21:4
19 Iomraidhean Croise  

त्यावेळी, अदोनियाहचे सर्व पाहुणे घाबरून उठले आणि पांगून गेले.


मग हामान पुढे म्हणाला, “आणि एवढेच नव्हे, एस्तेर राणीने आज राजाबरोबर केवळ मलाच तिने तयार केलेल्या मेजवानीला बोलाविले होते आणि उद्याही पुन्हा आम्हाला तिच्या मेजवानीचे आमंत्रण आहे!”


भीती आणि कंप यांनी मला ग्रस्त केले आहे. अतिभयाने मला ग्रासले आहे.


अहाहा, मला कबुतराचे पंख असते तर किती उत्तम झाले असते! दूर उडत जाऊन मी विश्रांती घेतली असती.


अहो, माझ्या यातना, माझ्या यातना! मला अत्यंत वेदना होत आहेत. अहो, माझ्या ह्रदयाच्या यातना! माझे ह्रदय माझ्यातच धडधडते, मी शांत राहू शकत नाही. कारण मी रणशिंगाचा आवाज ऐकला आहे; मी युद्धाची ललकारी ऐकली आहे.


पण ते जेव्हा जागृत होतील, मी त्यांच्यासाठी मेजवानी सिद्ध करेन त्यांना मद्यधुंद करेन, म्हणजे ते किंकाळ्या मारून हसतील—मग ते कायमचे झोपतील मग ते चिरनिद्रा घेतील व उठणार नाहीत.” असे याहवेह जाहीर करतात.


मी तिचे राज्यपाल, सुज्ञ लोक, अधिपती, सेनापती व योद्धे या सर्वांना मद्यधुंद करेन; ते झोपतील आणि पुन्हा कधीच उठणार नाहीत,” महाराज, सर्वसमर्थ याहवेह असे जाहीर करतात.


बेलशस्सर राजाने त्याच्या एक हजार अधिकार्‍यांना मोठी मेजवानी दिली आणि तो त्यांच्याबरोबर द्राक्षारस प्याला.


त्याच रात्री खाल्डियन लोकांचा राजा बेलशस्सर याचा वध झाला;


एकाएकी मानवी हाताची बोटे प्रकट झाली आणि राजवाड्यातील दिवठणीच्या समोरच्या भिंतीच्या गिलाव्यावर काहीतरी लिहू लागली. ती हाताची बोटे लिहित असतानाच राजाने ती पाहिली.


याहवेहचे शत्रू काटेरी झुडूपात गुंतून पडतील आणि स्वतःचेच मद्य पिऊन ते धुंद होतील; वाळलेल्या गवताप्रमाणे ते अग्नीमध्ये भस्म होतील.


तुमची अंतःकरणे भयग्रस्त झाल्यामुळे सारखी धडधडत राहतील, त्यामुळे सकाळी तुम्ही म्हणाल, “अहा, आता रात्र असती, तर किती बरे झाले असते!” आणि संध्याकाळी तुम्ही म्हणाल, “अहा, आता सकाळ असती तर किती बरे झाले असते!”


गरुडपक्षीण आपले घरटे हालविते आणि पिलांवर घिरट्या घालते, आपले पंख पसरून, आपल्या पिलांना आपल्या पंखावर सुरक्षित वाहून नेते.


Lean sinn:

Sanasan


Sanasan