Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 21:16 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

16 प्रभू मला असे म्हणतात: “एका वर्षाच्या आत, कराराने बांधलेला सेवक जसे एकएक दिवस मोजत असतो, तसे केदारचे सर्व वैभव नाहीसे होईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

16 कारण प्रभूने मला असे सांगितले आहे की, “सालदाराच्या मुदतीप्रमाणे एका वर्षाच्या मुदतीत केदाराचे सर्व वैभव लयास जाईल;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

16 कारण परमेश्वराने मला सांगितले, एका वर्षाच्या आत, जसा मोलकरी एका वर्षासाठी नियूक्त केला जातो, त्याच प्रकारे केदारचे वैभव तुम्ही संपलेले पाहाल.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 21:16
11 Iomraidhean Croise  

ही इश्माएलाच्या पुत्रांची त्यांच्या जन्मानुसार यादी: इश्माएलाचा प्रथमपुत्र नबायोथ, नंतर केदार, अदबील, मिबसाम,


हे त्यांचे वंशज होते: इश्माएलाचा प्रथमपुत्र नबायोथ, नंतर केदार, अदबील, मिबसाम,


“या पृथ्वीवर मानवाला कठीण श्रम करावे लागत नाहीत का? त्यांचे दिवस हे मोलकर्‍यासारखे नाहीत काय?


धिक्कार असो माझा, जर मी मेशेख हे माझे निवासस्थान केले, वा केदार येथे माझा डेरा घातला!


अहो यरुशलेमच्या कन्यांनो, मी सावळी असूनही सुंदर आहे, केदारच्या काळ्या तंबूसारखी, शलोमोनच्या डेर्‍याच्या पडद्यासारखी.


परंतु आता याहवेह असे म्हणतात: “तीन वर्षात, कराराने बांधलेला सेवक त्यांची मोजणी करेल, मोआबचे वैभव आणि तिच्या सर्व लोकांचा तिरस्कार केला जाईल आणि तिचे अवशिष्ट लोक फारच कमी आणि दुर्बल असतील.”


अरण्यात व त्याभोवती असणाऱ्या नगरांचे आवाज उंचावू दे; जिथे केदारचा रहिवास आहे, त्या वस्त्या आनंद करोत. सेलाच्या लोकांनो हर्षगीते गा; त्यांना पर्वतशिखरावरून गर्जना करू दे.


केदारचे सर्व कळप तुला दिले जातील व नबायोथचे मेंढे तुला सेवेसाठी देण्यात येतील; ते माझ्या वेद्यांवर अर्पण म्हणून मान्य केले जातील, आणि मी माझे गौरवशाली मंदिर सुशोभित करेन.


समुद्राचा किनारा ओलांडून कित्तीम बेटाच्या तटावर जा आणि पाहा, केदारच्या वाळवंटात पाठवा व जवळून चौकशी करा; अशा प्रकारे कधी काही घडले का ते पहा:


केदार व हासोरची राज्ये ज्यांच्यावर बाबेलचा राजा नबुखद्नेस्सरने हल्ला केला त्याविषयी: याहवेह असे म्हणतात: “सज्ज व्हा, व केदारवर हल्ला करा आणि पूर्वेच्या लोकांना नष्ट करा.


“ ‘अरबी लोक व केदारचे सर्व राजपुत्र तुझे ग्राहक होते; त्यांनी तुला कोकरे, एडके व बोकडे देऊन तुझ्याबरोबर व्यापार केला.


Lean sinn:

Sanasan


Sanasan