Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 21:12 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

12 पहारेकरी उत्तर देतो, “सकाळ होत आहे, पण रात्रही आली आहे. जर तुम्हाला विचारणा करावयाची आहे, तर मला विचारा; आणि मग पुन्हा या.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

12 जागल्या म्हणाला, “पहाट होत आहे, रात्रही होणार; तुम्हांला काही विचारायचे असेल तर विचारा; परत या.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 पाहारेकरी म्हणाला, सकाळ येते व रात्रही येते, जर तुम्ही विचाराल तर विचारा आणि परत या.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 21:12
16 Iomraidhean Croise  

संध्याकाळी अचानक दहशत! सकाळ होण्याआधीच ते गेले असतात! जे आम्हाला लुटतात त्यांच्या वाट्याला हे येते, जे आमची लूटमार करतात त्यांचा हा वाटा आहे.


दूमाह विरुद्ध एक भविष्यवाणी: सेईरमधून कोणीतरी मला हाक मारत आहे, “रखवालदार, रात्र संपण्यास किती वेळ उरला आहे? रखवालदार, रात्र संपण्यास किती वेळ उरला आहे?”


अरेबियाविरुद्ध भविष्यवाणी: ददानी काफिल्यांनो, तुम्ही जे अरेबियाच्या अरण्यात वसती करता,


दुष्टांनी आपले दुष्टमार्ग सोडून द्यावे अनीतिमानांनी त्यांचे विचार मनातून काढावे. त्यांनी याहवेहकडे वळावे, म्हणजे ते त्यांच्यावर दया करतील, आपल्या परमेश्वराकडे धाव घ्यावी, म्हणजे ते त्यांना मुक्तपणे क्षमा करतील.


तिच्या सर्व तरुण बैलांची कत्तल करा; त्यांना वध होण्यासाठी जाऊ द्या! त्यांचा धिक्कार असो! कारण त्यांचा समय आला आहे, त्यांना शिक्षा करण्याची वेळ आली आहे.


त्यांना सांग, ‘सार्वभौम याहवेह जाहीर करतात, माझ्या जीविताची शपथ, दुष्टाच्या मरणात मला संतोष नाही, परंतु त्यांनी आपल्या मार्गापासून वळावे व जगावे. वळा! आपल्या दुष्ट मार्गापासून वळा! मग अहो इस्राएली लोकहो तुम्ही का मरावे?’


“ ‘पाहा, तो दिवस! पाहा, तो येत आहे! विनाशाचा भडका उठला आहे, काठीला अंकुर फुटला आहे, अहंकार फुलला आहे!


समय आला आहे! दिवस येऊन ठेपला आहे! विकत घेणार्‍याने आनंद करू नये किंवा विकत देणार्‍याने दुःखी होऊ नये, कारण माझा क्रोध संपूर्ण समुहावर आहे.


ओबद्याहचा दृष्टान्त हा. एदोमाबद्दल सार्वभौम याहवेह असे म्हणतात; आम्ही याहवेहकडून हा संदेश ऐकला: राष्ट्रांना सांगण्यासाठी एक दूत पाठविण्यात आला होता, “उठा, आपण तिच्याविरुद्ध युद्ध करण्यास जाऊ.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan