Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 21:11 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 दूमाह विरुद्ध एक भविष्यवाणी: सेईरमधून कोणीतरी मला हाक मारत आहे, “रखवालदार, रात्र संपण्यास किती वेळ उरला आहे? रखवालदार, रात्र संपण्यास किती वेळ उरला आहे?”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 दुमाविषयीची देववाणी : सेईराहून मला शब्द ऐकू येतो की, “जागल्या, रात्र किती राहिली? जागल्या, रात्र किती राहिली?”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 दूमाविषयीचा घोषणा, सेईर येथून मला कोणी मला हाक मारतो, पहारेकऱ्या, रात्री काय राहिल? पहारेकऱ्या, रात्री काय राहिल?

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 21:11
24 Iomraidhean Croise  

मिश्मा, दूमाह, मस्सा,


याकोबाने आता एदोम प्रांतातील सेईर प्रदेशात राहणारा आपला भाऊ एसाव, याच्याकडे आपले दूत पाठविले;


आणि त्याने दूतांना आज्ञा दिली की, तुम्ही माझा धनी एसाव याला जाऊन सांगा: “तुमचा सेवक याकोब म्हणतो, मी आतापर्यंत आपले मामा लाबान यांच्याकडे राहत होतो.


मिश्मा, दूमाह, मस्सा, हदद, तेमा,


हे याहवेह, माझ्या देवा, यरुशलेमचा पाडाव झाला त्या दिवशी एदोमाच्या वंशजांनी काय केले याचे स्मरण करा. ते आरोळ्या मारत होते, “तिला जमीनदोस्त करा, तिचा पाया देखील ढासळून टाका.”


जे पहारेकरी नगरात गस्त घालतात त्यांना मी आढळले तेव्हा मी त्यांनाच विचारले, मी त्यांना विचारले, “माझे हृदय ज्याच्यावर प्रेम करते, तो तुम्हाला दिसला काय?”


पहारेकरी उत्तर देतो, “सकाळ होत आहे, पण रात्रही आली आहे. जर तुम्हाला विचारणा करावयाची आहे, तर मला विचारा; आणि मग पुन्हा या.”


प्रभू मला असे म्हणत आहेत: “जा, टेहळणी करणारा उभा कर, आणि त्याला जे काही दिसते ते त्याने कळवावे.


मग राजा सिद्कीयाहने यिर्मयाहला मुक्त केले व राजवाड्यात आणले, आणि खाजगीरित्या विचारले, “याहवेहकडून काही वचन आले आहे काय?” यिर्मयाह उत्तरला, “होय, तुम्हाला बाबेलच्या राजाच्या हातात सोपविण्यात येणार.”


मी तुमच्यावर पहारेकरी नेमले आणि म्हटले, ‘रणशिंगाच्या आवाजाकडे लक्ष द्या!’ परंतु तुम्ही म्हटले, ‘आम्ही ऐकणार नाही.’


“सार्वभौम याहवेह असे म्हणतात: ‘एदोमने यहूदाहचा सूड घेतला आणि त्यामुळे तो अतिशय दोषी ठरला,


“मानवपुत्रा, मी तुला इस्राएली लोकांचा पहारेकरी केले आहे; तर जे वचन मी सांगतो ते ऐक आणि माझ्यावतीने त्यांना सावध कर.


इजिप्त देश उजाड होईल आणि एदोम देश ओसाड होईल, कारण त्यांनी यहूदीयाच्या लोकांवर अत्याचार केला त्यांच्या देशात त्यांनी निर्दोष रक्त पाडले आहे.


याहवेह असे म्हणतात: “गाझाच्या तीन नव्हे तर चार अपराधांसाठी शासन करण्यापासून मी अनुताप करणार नाही. कारण तिने सर्व लोकांना बंदिवासात घेतले आणि त्यांना एदोमला विकले,


एदोम जिंकला जाईल; इस्राएलचा शत्रू सेईर सुद्धा जिंकला जाईल, पण इस्राएल बलवान होईल.


त्यांना लढाईला प्रवृत्त करू नका, कारण त्यांची भूमी मी तुम्हाला देणार नाही, मी तुम्हाला तिथे पाऊल ठेवण्यासही जागा देणार नाही. मी सेईर पर्वताचा मुलूख एसावाला दिला आहे.


अरब, दूमाह, एशआन,


Lean sinn:

Sanasan


Sanasan