Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 20:6 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

6 त्या दिवशी या किनार्‍यावर राहणारे लोक असे म्हणतील की, ‘ज्यांच्यावर आम्ही विसंबून होतो, पहा हे त्यांचे काय झाले आहे. ज्यांच्याकडे आम्ही मदतीसाठी आणि अश्शूरच्या राजापासून आमची सुटका व्हावी यासाठी धाव घेतली होती, तर आता आमची सुटका कशी होईल?’ ”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

6 त्या दिवशी ह्या समुद्रतीरीचे रहिवासी म्हणतील, ‘पाहा, अश्शूरच्या राजापासून आम्हांला सोडवावे म्हणून आम्ही ज्याची अपेक्षा केली, ज्याच्याकडे आम्ही साहाय्यार्थ धावलो त्याची अशी गत झाली; मग आमचा निभाव कसा लागेल?”’

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 त्या दिवशी या समुद्रकिनाऱ्यावरील राहणारे लोक म्हणतील, “खरोखर, हा आमच्या आशेचा स्त्रोत, ज्याच्याकडे साहाय्यासाठी व अश्शूराच्या राजापासून रक्षण करण्यासाठी आम्ही पळालो तो असा आहे, तर आम्ही कसे सुटून जाऊ?”

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 20:6
16 Iomraidhean Croise  

आणि जे निर्दोष नाहीत त्यांना देखील ते वाचवतील, आणि तुझ्या शुद्ध हातांकरवी ते पातक्यांना साहाय्य करतील.”


ते त्रस्त झाले, कारण त्यांना खात्री झाली होती; केवळ निराश होण्यासाठी ते तिथे आले.


दंड मिळण्याच्या दिवशी तुम्ही काय कराल, जेव्हा फार दुरून संकट येईल? तुम्ही कोणाकडे मदतीसाठी धावणार आहात? तुम्ही तुमची संपत्ती कुठे सोडून देणार?


मी न्यायाला मापनदोरी आणि नीतिमत्वाला ओळंबा असे करेन. गारांनी तुमचा खोटेपणा, तुमचे आश्रयस्थान झाडून काढला जाईल, आणि पाणी तुमच्या लपण्याच्या जागेवर भरून वाहील.


याहवेहकडून यिर्मयाहला हे वचन प्राप्त झाले:


हाय हाय! तो दिवस किती भयंकर असेल! इतर कोणताही दिवस असा नसेल. याकोबासाठी तो संकटकाळ असेल. पण तो यातून वाचून बाहेर पडेल.


याहवेह जाहीर करतात, “त्याकाळी मी इस्राएलमधील सर्व कुळांचा परमेश्वर असेन व ते माझे लोक असतील.”


हे उद्ध्वस्त झालेल्या, तू काय करीत आहे? कशासाठी तू ही गडद वस्त्रे परिधान केली आहेस आणि अंगावर सोन्याचे दागिने चढविले आहेस? आपल्या डोळ्यांत काजळ घालून ते सजविले आहेस? या सर्व शृंगारांचा तुला काही एक उपयोग होणार नाही. तुझे प्रियकर तुझा तिरस्कार करतात; तुला ठार करण्याची त्यांची इच्छा आहे.


कारण सर्व पलिष्टी लोकांचा नाश करण्यास आणि सर्व अवषेशांना बाहेर काढण्याचा, सोर व सीदोन येथील लोकांना मदत करण्याचा समय आला आहे. याहवेह पलिष्टी लोकांचा नाश करणार आहेत, कफतोरहून आलेल्या रहिवाशांचा निःपात करणार आहेत.


“अहो सापांनो! विषारी सापांच्या पिलांनो! नरक-दंडापासून स्वतःची सुटका कशी कराल?


“शांतता आणि सुरक्षितता,” असे लोक म्हणत असतानाच, ज्याप्रमाणे गर्भवती स्त्रीला प्रसूती वेदना होतात, त्याचप्रमाणे त्यांच्यावर अचानक नाश ओढवेल आणि त्यातून ते सुटणार नाहीत.


ज्या तारणाची प्रभूने प्रथम घोषणा केली आणि ऐकणार्‍यांनी आम्हाला पुष्टी दिली, त्या महान तारणाची आपण उपेक्षा केली, तर आपण कसे निभावू?


Lean sinn:

Sanasan


Sanasan