Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 20:5 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 ज्यांनी कूशवर विश्वास ठेवला आणि इजिप्तबद्दल बढाई मारली ते निराश होतील आणि लज्जित होतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 ज्या कूशाची त्यांनी अपेक्षा केली व ज्या मिसर देशाची त्यांना घमेंड वाटली त्याच्यामुळे ते घाबरे व लज्जित होतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 जो कूश त्यांची आशा आणि जो मिसर देशाचे वैभव त्यामुळे ते हताश व लज्जित होतील.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 20:5
17 Iomraidhean Croise  

पाहा, मला माहीत आहे की तू इजिप्तवर अवलंबून आहेस, पाहा, जी एक तुटलेली वेळूची काठी आहे, जो कोणी त्यावर टिकेल ती त्याच्या हाताला टोचणार! इजिप्तचा राजा फारोह, त्याच्यावर भरवसा ठेवणाऱ्या सर्वांसाठी असेच असल्याचे सिद्ध होते.


मर्त्य मनुष्यांवर भरवसा करणे बंद कर ज्यांच्या नाकामध्ये केवळ एक श्वासच आहे. त्यांना इतका बहुमान का द्यावा?


परंतु फारोहचे रक्षण तुम्हाला लज्जित करेल, इजिप्तच्या सावलीने तुमची अप्रतिष्ठा होईल.


तरी प्रत्येकाला लज्जित करण्यात येईल कारण त्यांच्यासाठी ते निरुपयोगी लोक आहेत, जे काहीही मदत किंवा लाभ आणत नाहीत. परंतु केवळ लज्जा आणि अपमान.”


इजिप्तकडे, ज्यांनी दिलेली अभिवचने निरुपयोगी आहेत. म्हणून मी इजिप्तला निरुपयोगी राहाब म्हणतो.


जे इजिप्तकडे मदतीसाठी जातात, जे घोड्यांवर अवलंबून असतात, त्यांचा धिक्कार असो, जे त्यांच्याकडील पुष्कळ रथांच्या संख्येवर आणि घोडेस्वारांच्या मोठ्या सामर्थ्यावर विश्वास ठेवतात, परंतु इस्राएलचे जे पवित्र परमेश्वराकडे पाहात नाहीत, किंवा याहवेहकडून मदत घेत नाहीत.


पाहा, मला माहीत आहे की तू इजिप्तवर अवलंबून आहेस. पाहा, जी एक तुटलेली वेळूची काठी आहे, जो कोणी त्यावर टिकेल ती त्याच्या हाताला टोचणार! इजिप्तचा राजा फारोह, त्याच्यावर भरवसा ठेवणाऱ्या सर्वांसाठी असेच असल्याचे सिद्ध होते.


रथ आणि घोडेस्वारांसाठी तुम्ही इजिप्तवर अवलंबून असताना माझ्या स्वामीच्या सर्वात कनिष्ठ अधिकार्‍यांपैकी एका अधिकाऱ्याचा तुम्ही कसा पराभव करणार?


आता सन्हेरीबला बातमी मिळाली की कूशाचा राजा तिर्‍हाकाह त्याच्याशी युद्ध करण्यास निघाला आहे. जेव्हा त्याने हे ऐकले तेव्हा त्याने पुन्हा हिज्कीयाहकडे असे सांगत दूत पाठवले:


याहवेह असे म्हणतात: “जो मनुष्यावर विश्वास ठेवतो, जो मर्त्य मनुष्यापासून सामर्थ्य मिळवितो आणि ज्याचे अंतःकरण याहवेहपासून दूर गेले आहे, तो शापित असो.


सर्वसमर्थ याहवेह, इस्राएलचे परमेश्वर म्हणतात: मी थेबेस येथील दैवत आमोनला, फारोहला, इजिप्तला व तिच्या दैवतांना, तिच्या राजाला आणि तिची सर्व दैवते व तिच्यावर भरवसा ठेवणार्‍यांनाही शिक्षा करणार आहे.


इजिप्त यापुढे इस्राएल लोकांसाठी आणखी आधार नसतील परंतु त्यांच्या पापाची आठवण म्हणून ते त्यांच्याकडे मदतीसाठी जातील. तेव्हा ते जाणतील की मीच सार्वभौम याहवेह आहे.’ ”


कूश आणि इजिप्त तिचे अपरिमित सामर्थ्य होते; पूट व लिबिया तिच्या मित्रराष्ट्रांपैकी होते.


“अहो कूशी लोकांनो, तुमचाही माझ्या तलवारीने वध होईल.”


तेव्हा मानवी नेत्यांची बढाई मारू नका! कारण सर्वकाही तुमचे आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan