Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 20:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 तेव्हा याहवेह म्हणाले, “जसा माझा सेवक यशायाह तीन वर्षे विवस्त्र आणि अनवाणी चालला, त्याचप्रमाणे इजिप्त व कूश यांच्याविरुद्ध हे चिन्ह आणि अरिष्टसूचक गोष्ट असेल,

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 तेव्हा परमेश्वर म्हणाला, “तीन वर्षेपर्यंत मिसर व कूश ह्यांना चिन्ह व विस्मय व्हावा म्हणून माझा सेवक यशया उघडा व अनवाणी चालला;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 परमेश्वर म्हणाला, “माझा सेवक यशया ज्याप्रमाणे मिसराविषयी आणि कूशाविषयी चिन्ह व शकुन असा तीन वर्षे नग्न व अनवाणी चालला आहे,

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 20:3
16 Iomraidhean Croise  

मी इजिप्तच्या लोकांना क्रूर धन्याच्या सत्तेच्या स्वाधीन करेन, आणि एक भयंकर राजा त्यांच्यावर राज्य करेल,” असे प्रभू, सर्वसमर्थ याहवेह घोषित करतात.


आता सन्हेरीबला बातमी मिळाली की कूशाचा राजा तिर्‍हाकाह त्याच्याशी युद्ध करण्यास निघाला आहे. जेव्हा त्याने हे ऐकले तेव्हा त्याने पुन्हा हिज्कीयाहकडे असे सांगत दूत पाठवले:


कारण मी याहवेह, तुझा परमेश्वर आहे, इस्राएलचा पवित्र परमेश्वर, तुझा तारणकर्ता; तुझ्या खंडणीसाठी मी इजिप्तला दिले, तुझा मोबदला म्हणून कूश आणि सबा दिले,


मी आणि याहवेहने मला दिलेली लेकरेही येथे आहेत. आम्ही, सीयोन पर्वतावर राहणारे सर्वसमर्थ याहवेहकडून इस्राएलला मिळालेले चिन्ह व प्रतीक आहोत.


याहवेहने मला म्हटले, “जा आणि तागाचा एक कमरबंद विकत घे. तो कमरेस गुंडाळ, पण त्याला पाणी लागू देऊ नकोस.”


ते पाहत असताच ते सामान आपल्या खांद्यावर घे आणि अंधार पडायला लागताच नीघ. तुला भूमी दिसू नये म्हणून आपला चेहरा झाक, कारण मी तुला इस्राएलसाठी एक चिन्ह केले आहे.”


इजिप्तविरुद्ध एक तलवार येईल आणि कूशवर वेदना येतील. जेव्हा वधलेले इजिप्तमध्ये पडतील, तिची संपत्ती काढून घेतली जाईल आणि तिचे पाये मोडून टाकले जातील.


“ ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: “ ‘इजिप्तचे मित्रगण पडतील तिचे अहंकारी बळ सुद्धा पडेल. मिग्दोलपासून असवानपर्यंत सर्व तिच्यामध्ये तलवारीने पडतील, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.


“आता हे मानवपुत्रा, ओल्या मातीची एक वीट घे आणि ती तुझ्यापुढे ठेव व तिच्यावर यरुशलेम शहराचे चित्र काढ.


नंतर एक लोखंडी कढई घे; ती तुझ्यामध्ये व शहरामध्ये लोखंडी भिंतीप्रमाणे ठेव आणि आपले तोंड त्याकडे कर. ती वेढ्यात आहे आणि तू तिला वेढा देशील. हे इस्राएली लोकांस एक चिन्ह म्हणून असेल.


“अहो कूशी लोकांनो, तुमचाही माझ्या तलवारीने वध होईल.”


“ ‘ऐक, हे प्रमुख याजका यहोशुआ, तू आणि तुझ्याबरोबर बसलेले तुझे सहकारी, जे भावी काळाची चिन्हे आहेत: मी माझा सेवक, शाखा आणणार आहे.


चाळीस दिवस तुम्ही देश हेरला त्याप्रमाणे प्रत्येक दिवसाला एक वर्ष अशी चाळीस वर्षे तुम्ही आपल्या पापाचे परिणाम भोगाल आणि माझ्या विरोधात जाणे कसे असते हे तुम्ही जाणाल.


Lean sinn:

Sanasan


Sanasan