Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 2:7 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 त्यांची भूमी चांदी आणि सोन्याने भरून गेली आहे; त्यांची संपत्ती अमाप आहे. चांदी व सोने यांचे अमाप खजिने आहेत. त्यांच्या भूमीत असंख्य घोडे आहेत; त्यांच्याकडे असंख्य रथही आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 त्यांचा देश सोन्यारुप्याने भरला आहे; त्यांच्या निधींना अंत नाही. त्यांचा देश घोड्यांनी भरून गेला आहे, त्यांच्या रथांना अंत नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 त्यांची भूमी चांदी व सोन्याने भरगच्च झाली आहे; त्यांच्या श्रीमंतीला सीमा राहिलेली नाही, त्यांची भूमी घोडे व रथ यांनी भरलेली असून त्यासही सीमा उरलेली नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 2:7
15 Iomraidhean Croise  

शलोमोनकडे रथाच्या घोड्यांसाठी चार हजार तबेले आणि बारा हजार घोडे होते.


ज्या राजपुत्रांच्या जवळ सोने होते, ज्यांनी आपली घरे रुप्यांनी भरली.


कोणी रथांवर आणि कोणी घोड्यांवर भरवसा ठेवतात, परंतु आम्ही याहवेह आमच्या परमेश्वराच्या नावावर भरवसा ठेऊ.


तुम्ही असे म्हणाला की, ‘नाही, आम्ही घोड्यांवर स्वार होऊन पळून जाऊ.’ म्हणून तुम्ही पळून जाल! तुम्ही असे म्हणाला, ‘आम्ही वेगवान घोड्यांवर स्वार होऊ.’ म्हणून तुमचे पाठलाग करणारे चपळ होतील!


जे इजिप्तकडे मदतीसाठी जातात, जे घोड्यांवर अवलंबून असतात, त्यांचा धिक्कार असो, जे त्यांच्याकडील पुष्कळ रथांच्या संख्येवर आणि घोडेस्वारांच्या मोठ्या सामर्थ्यावर विश्वास ठेवतात, परंतु इस्राएलचे जे पवित्र परमेश्वराकडे पाहात नाहीत, किंवा याहवेहकडून मदत घेत नाहीत.


मी त्यांच्या पापमय लोभामुळे संतापलो; आणि त्यांना ताडण केले व माझे मुख रागाने लपविले, तरी त्यांनी स्वेच्छेने करण्याचे सोडले नाही.


अश्शूर आमचे तारण करू शकणार नाही; आम्ही युद्धाच्या घोड्यावर स्वार होणार नाही. हातांनी बनविलेल्या मूर्तीना आम्ही ‘आमची दैवते’ असे इतःपर म्हणणार नाही. कारण अनाथांना तुमच्याठायीच दया मिळते.”


“त्या दिवशी,” याहवेह ही घोषणा करतात, “मी तुमच्या घोड्यांचा तुमच्यामध्ये नाश करेन आणि तुमच्या रथांनाही नष्ट करेन.


तिच्या व्यभिचाराचे वेड लावणारे द्राक्षमद्य सर्व राष्ट्रांनी प्राशन केले आहे. पृथ्वीवरील राजांनी तिच्याशी जारकर्म केले आहे, आणि जगातील व्यापारी तिच्या भोग विलासी धनामुळे श्रीमंत झाले आहेत.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan