Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 2:22 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

22 मर्त्य मनुष्यांवर भरवसा करणे बंद कर ज्यांच्या नाकामध्ये केवळ एक श्वासच आहे. त्यांना इतका बहुमान का द्यावा?

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

22 मनुष्याचे नावच घेऊ नका; त्याचा श्वास त्याच्या नाकपुड्यांत आहे; त्याला काय जमेस धरायचे आहे?

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

22 ज्याचे जीवन नाकपुड्यातील श्वासात आहे, त्या मनुष्यावर विश्वास ठेवण्याचे थांबवा, कारण त्यास काय जमेस धरायचे?

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 2:22
14 Iomraidhean Croise  

मग याहवेह परमेश्वराने जमिनीवरील धूळ घेऊन तिचा मनुष्य घडविला व त्याच्या नाकपुड्यांत त्यांनी जीवन देणारा श्वास फुंकला; तेव्हा मनुष्य सजीव प्राणी झाला.


कोरड्या जमिनीवर राहणारा, श्वास घेणारा प्रत्येक प्राणी मरण पावला.


की जोपर्यंत मी जिवंत आहे, आणि परमेश्वराचा श्वास माझ्या नाकपुड्यांत आहे,


तुम्ही अधिपतींवर भरवसा ठेवू नका; ते केवळ मानव आहेत; तारण करण्याचे सामर्थ्य त्यांच्याजवळ नाही.


साधारण मानव श्वासमात्र आहेत; विशिष्ट मानव फक्त मिथ्या आहेत; तराजूत वजन केले की ते हलकेच भरतील; ते सर्व श्वासमात्र आहेत.


मनुष्य तो काय की तुम्ही त्याची आठवण ठेवावी? मानवप्राणी तो काय की तुम्ही त्याची काळजी करावी?


राष्ट्रे ही निश्चितच बादलीतील थेंबासारखी आहेत; त्यांना तराजूवर असलेली धूळ समजले जाते; बेटांना ते असे तोलतात, जणू ते धूलिकण आहेत.


त्यांच्यापुढे सर्व राष्ट्रे काहीच नसल्यासारखी आहेत; ते त्यांना निरुपयोगी असे समजतात. त्यांच्या दृष्टीने शून्यवत आहेत.


“मी, तो मीच आहे, जो तुमचे सांत्वन करेल. तुम्ही कोण आहात जे मर्त्य मानवांना भिता, मानवप्राणी, जे केवळ गवताप्रमाणे असतात,


याहवेह असे म्हणतात: “जो मनुष्यावर विश्वास ठेवतो, जो मर्त्य मनुष्यापासून सामर्थ्य मिळवितो आणि ज्याचे अंतःकरण याहवेहपासून दूर गेले आहे, तो शापित असो.


पण आता, आपण जे उद्धट ते धन्य असे म्हणू. कारण दुष्टाई करणाऱ्यांची निश्चितच भरभराट होते आणि ते परमेश्वराची परीक्षा पाहतात, तरी ते निर्दोष ठरतात.’ ”


तुम्हाला उद्या काय आणि कसे होणार हे माहीत नाही. तुमचे जीवन ते काय आहे? तुम्ही त्या धुक्यासारखे आहात, जे थोड्या वेळासाठी दिसते आणि नाहीसे होते.


Lean sinn:

Sanasan


Sanasan