Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 2:21 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

21 जेव्हा याहवेह पृथ्वीला हलविण्यासाठी उभे राहतील तेव्हा त्यांच्या भयावह सान्निध्यापासून आणि गौरवी प्रतापापासून वाचण्यास लोक खडकांच्या गुहांकडे धाव घेतील डोंगराच्या लटकत्या कडांमध्ये लपतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

21 परमेश्वर पृथ्वीस भयकंपित करण्यास उठेल तेव्हा त्याच्या भयप्रद दृष्टीपुढून व त्याच्या ऐश्वर्याच्या प्रतापापुढून ते खडकांतल्या गुहांत व दगडांतल्या कपारींत शिरतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

21 जेव्हा परमेश्वर पृथ्वीला घाबरून सोडण्यास उठेल, तेव्हा परमेश्वराच्या भयावह कृतीमुळे व त्याच्या तेजामुळे लोक खडकाच्या गुहेत व जीर्ण होऊन फुटलेल्या खडकाच्या कपारीत शिरतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 2:21
12 Iomraidhean Croise  

त्या सर्वांचे धैर्य खचून गेले, ते त्यांच्या गडातून थरथर कापत बाहेर येतात.


त्यांना कोरड्या पडलेल्या ओढ्याच्या पात्रामध्ये, खडकात आणि भूमीतील बिळांमध्ये राहावे लागले.


ते पृथ्वीला तिच्या जागेवरून हालवितात, आणि तिचे स्तंभ डळमळीत करतात.


माझे गौरव जवळून जात असता, मी तुला खडकाच्या कपारीत ठेवेन आणि मी पार होईपर्यंत मी तुला माझ्या हाताने झाकीन.


डोंगराच्या कपारीत, कड्यांच्या गुप्त जागी राहणारी माझी कबुतरीण, मला तुझे मुख पाहू दे, मला तुझा स्वर ऐकू दे; कारण तुझा स्वर गोड आणि तुझा चेहरा मनोहर आहे.


याहवेहच्या भयावह सान्निध्यापासून आणि गौरवी प्रतापापासून वाचण्यास कड्याकपारीत जा, जमिनीत लपून बसा!


जेव्हा याहवेह पृथ्वीला हलविण्यासाठी उभे राहतील तेव्हा त्यांच्या भयावह सान्निध्यापासून आणि गौरवी प्रतापापासून वाचण्यास लोक खडकांच्या गुहांकडे धाव घेतील आणि जमिनीतील खाचात लपतील.


भीतीने तुम्ही पळ काढण्याचा प्रयत्न कराल, तर खड्ड्यात पडाल; खड्ड्यातून कसेबसे बाहेर पडाल, तर तुम्ही सापळ्यात अडकाल, कारण आकाशाचे धरणद्वार उघडण्यात आले आहे, पृथ्वीचा पाया हादरला आहे.


याहवेह म्हणतात, “मी आता उठेन, मी आता उच्च केल्या जाईन; आता मला उंच केले जाईल.


ते सर्व येतील आणि उतरत्या खोल दऱ्यांमध्ये, खडकांच्या कपाऱ्यांमध्ये, सर्व काटेरी झुडूपांवर आणि पाण्याच्या सर्व झऱ्यांवर वस्ती करतील.


“परंतु आता मी अनेक मासे पकडणारे पाठवेन,” याहवेह अशी घोषणा करतात, “व ते त्यांना पकडतील. त्यानंतर मी शिकार्‍यांना पाठवेन, आणि ते प्रत्येक पर्वतातून, डोंगरातून आणि खडकाच्या कपारीतून त्यांचा शोध घेऊन त्यांची शिकार करतील.


दुष्टता असलेल्या उच्च स्थानांचा नाश केला जाईल— हे इस्राएलचे पाप आहे. काटेरी झाडे आणि कुसळे उगवतील आणि त्यांच्या वेद्या झाकून घेतील. मग ते पर्वतांना म्हणतील, “आम्हाला झाकून टाका!” आणि टेकड्यांना म्हणतील, “आमच्यावर येऊन पडा!”


Lean sinn:

Sanasan


Sanasan