Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 2:10 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 याहवेहच्या भयावह सान्निध्यापासून आणि गौरवी प्रतापापासून वाचण्यास कड्याकपारीत जा, जमिनीत लपून बसा!

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 परमेश्वराच्या भयप्रद दृष्टीपुढून, त्याच्या ऐश्वर्याच्या प्रतापांपुढून खडकात दडून जा; आपणाला धुळीत पुरून घे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 खडकाळ जागी जा व परमेश्वराच्या भयापासून व त्याच्या वैभवी गौरवापासून जमिनीत लप.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 2:10
22 Iomraidhean Croise  

कारण परमेश्वरापासून आलेल्या विपत्तीने मला भयभीत केले आहे, आणि त्यांच्या वैभवाच्या भयनिमित्ताने या सर्वगोष्टी मी केल्या नाहीत.


त्या सर्वांना मातीत एकत्रच गाडून टाक; कबरेमध्ये त्यांची तोंडे कफनवस्त्रांनी झाकून टाक.


जेणेकरून तुम्ही केलेली अद्भुत कृत्ये आणि तुमच्या अप्रतिम राजवैभवाबद्दल सर्व मानवजातीस ज्ञान होईल.


तुमच्या संतापाची भयानकता जाणू शकलो असतो, तर बरे झाले असते! तुमचा क्रोध तितकाच व्यापक आहे, जितकी त्याची भीती.


दंड मिळण्याच्या दिवशी तुम्ही काय कराल, जेव्हा फार दुरून संकट येईल? तुम्ही कोणाकडे मदतीसाठी धावणार आहात? तुम्ही तुमची संपत्ती कुठे सोडून देणार?


जसे पोहणारे पोहण्यासाठी त्यांचे हात लांब करतात तसे ते त्यांचे हात त्यांच्यावर लांब करतील. त्यांच्या हातात चतुराई असतानाही परमेश्वर त्यांचा अभिमान उतरवून टाकतील.


पण हेच लोक लुटले व लुबाडले गेले आहेत, ते सर्वजण खड्ड्यात अडकले आहेत किंवा तुरुंगात लपवून ठेवण्यात आले आहेत. तेच लूट बनले आहेत, त्यांना सोडविणारा कोणी नाही; त्यांना लूट बनविण्यात आले आहे, “त्यांना परत पाठवा,” असे म्हणणारे कोणीही नाही.


परंतु याहवेह हेच खरे परमेश्वर आहेत; ते जिवंत परमेश्वर आहेत, ते सनातन राजा आहेत. जेव्हा ते क्रोधित होतात, सर्व पृथ्वी कंपायमान होते; त्याच्या प्रकोपापुढे राष्ट्रांचा टिकाव लागत नाही.


हे राष्ट्रांच्या राजा, तुमचे भय नाही असा कोण आहे? अशा श्रद्धेच्या योग्य केवळ तुम्हीच आहात, सर्व राष्ट्रातील सुज्ञ पुढाऱ्यांमध्ये आणि जगातील सर्व राज्यांमध्ये तुमच्यासारखे दुसरे कोणीच नाही.


“याहवेह असे म्हणतात: अशाच प्रकारे मी यहूदीयाचा गर्व व यरुशलेमचा महागर्व नष्ट करणार आहे.


दुष्टता असलेल्या उच्च स्थानांचा नाश केला जाईल— हे इस्राएलचे पाप आहे. काटेरी झाडे आणि कुसळे उगवतील आणि त्यांच्या वेद्या झाकून घेतील. मग ते पर्वतांना म्हणतील, “आम्हाला झाकून टाका!” आणि टेकड्यांना म्हणतील, “आमच्यावर येऊन पडा!”


तू देखील मद्यपीप्रमाणे धुंद होशील; तू लपून बसशील आणि सुरक्षिततेसाठी तुझ्या शत्रूपासून आश्रय शोधशील.


कोणाचे भय बाळगावे, हे मी तुम्हाला सांगतो: शरीराचा वध केल्यानंतर, नरकात टाकण्याचा ज्याला अधिकार आहे, त्याची भीती बाळगा. होय, मी सांगतो त्याचीच भीती बाळगा.


त्यावेळी, “ ‘ते पर्वतांना म्हणतील, “आमच्यावर येऊन पडा!” आणि टेकड्यांना म्हणतील, आम्हाला “झाकून टाका!” ’


सर्वकाळचा नाश ही त्यांची शिक्षा असेल आणि ते प्रभूच्या समक्षतेतून व परमेश्वराच्या गौरव व सामर्थ्यातून कायमचे विभक्त होतील.


Lean sinn:

Sanasan


Sanasan