Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 18:1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 कूशच्या नद्यांच्या काठावर असलेल्या देशांचा, जिथून पंखांचा फडफड आवाज येतो त्यास धिक्कार असो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 अरे, कूशातील नद्यांपलीकडल्या फडफडणार्‍या पंखांच्या देशा!

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 कूशातील नद्यांच्या पलीकडील सळसळणाऱ्या पंखाच्या देशा हायहाय;

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 18:1
18 Iomraidhean Croise  

आता सन्हेरीबला बातमी मिळाली की कूशाचा राजा तिर्‍हाकाह त्याच्याशी युद्ध करण्याच्या तयारीत आहे. म्हणून त्याने पुन्हा हिज्कीयाहकडे असे सांगत दूत पाठवले:


तुमच्या पंखांच्या छायेखाली तुमच्या डोळ्याच्या बुबुळाप्रमाणे माझे रक्षण करा;


हे परमेश्वरा, तुमची अक्षय प्रीती किती अमूल्य आहे! सर्व मानवजात तुमच्या पंखांच्या छायेत आश्रय घेते.


माझ्या परमेश्वरा, माझ्यावर दया करा, माझ्यावर दया करा. कारण मी तुमचा आश्रय घेतला आहे; संकटे जाईपर्यंत मी तुमच्या पंखांच्या छायेखाली आश्रय घेईन.


तुमच्या मंडपात सदासर्वकाळ राहण्यास आणि तुमच्या पंखांच्या सावलीखाली आश्रय घेण्यास मी उत्कंठित आहे. सेला


कारण तुम्ही माझे साहाय्य आहात, तुमच्या पंखांच्या सावलीत मी गीत गातो.


ते आपल्या परांनी तुझ्यावर पाखर घालतील, त्यांच्या पंखाखाली तुला आश्रय मिळेल; त्यांचे सत्य तुझी ढाल व गड होईल.


जे इजिप्तकडे मदतीसाठी जातात, जे घोड्यांवर अवलंबून असतात, त्यांचा धिक्कार असो, जे त्यांच्याकडील पुष्कळ रथांच्या संख्येवर आणि घोडेस्वारांच्या मोठ्या सामर्थ्यावर विश्वास ठेवतात, परंतु इस्राएलचे जे पवित्र परमेश्वराकडे पाहात नाहीत, किंवा याहवेहकडून मदत घेत नाहीत.


आता सन्हेरीबला बातमी मिळाली की कूशाचा राजा तिर्‍हाकाह त्याच्याशी युद्ध करण्यास निघाला आहे. जेव्हा त्याने हे ऐकले तेव्हा त्याने पुन्हा हिज्कीयाहकडे असे सांगत दूत पाठवले:


याहवेह असे म्हणतात: “इजिप्तचे उत्पादन आणि कूशचा सर्व व्यापारी माल व शबाईचे ते उंच लोक— ते तुमच्याकडे येतील ते सर्वकाही तुमचेच होईल. बेड्या घातलेल्या बंदिवानाप्रमाणे ते पाय ओढत तुमच्यामागे चालतील ते साखळदंडाने बांधलेले तुमच्याकडे येतील. तुम्हाला नमन करतील व विनंती करून म्हणतील, ‘निश्चितच परमेश्वर तुमच्याबरोबर आहे, दुसरे कोणी नाही; त्यांच्याशिवाय दुसरा देव नाही.’ ”


“ ‘त्या दिवशी त्या कूशी लोकांना घाबरवून त्यांच्या निश्चिंतेतून बाहेर काढावे म्हणून माझ्याकडून जहाजामध्ये संदेष्टे जातील. इजिप्तच्या नाशाच्या दिवशी वेदना त्यांचा ताबा घेईल, कारण तो दिवस खचितच येत आहे.


“अहो कूशी लोकांनो, तुमचाही माझ्या तलवारीने वध होईल.”


कूश देशाच्या नद्यांपलीकडून माझे उपासक, माझे विखुरलेले लोक माझ्यासाठी अर्पणे आणतील.


“हे यरुशलेम, यरुशलेम! संदेष्ट्यांना ठार मारणारे आणि तुझ्याकडे पाठविलेल्यांना धोंडमार करणारे! जशी कोंबडी आपल्या पिलांना पंखाखाली एकवटते, तसे तुझ्या लेकरांना एकवटण्याची माझी कितीतरी इच्छा होती. पण तुमची नव्हती.


तू जे काही केले आहेस त्याचे फळ याहवेह तुला देतील. याहवेह इस्राएलांचे परमेश्वर ज्यांच्या पंखाखाली आश्रय घेण्यास तू आली आहेस, त्यांच्याद्वारे तुला भरपूर मजुरी मिळो.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan