Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 17:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 “त्या दिवशी याकोबाचे वैभव कमी होईल; त्याच्या शरीरातील चरबी व्यर्थ जाईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 त्या दिवशी असे होईल की याकोबाचे वैभव क्षय पावेल, त्याचा पुष्ट देह रोड होईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 त्या दिवसात असे होईल की, याकोबाचे वैभव विरळ होईल आणि त्याचा पुष्ट देह सडपातळ होईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 17:4
15 Iomraidhean Croise  

नंतर नाईलमधून दुसर्‍या सात गाई आल्या; त्या अगदी कुरूप व दुबळ्या होत्या आणि नदीकाठी असलेल्या गाईंच्या शेजारी येऊन उभ्या राहिल्या.


अश्शूरचा राजा शल्मनेसरने होशेवर हल्ला करून, त्याला जहागीरदार केले आणि त्याला कर द्यावा लागला.


होशेच्या कारकिर्दीच्या नवव्या वर्षी अश्शूरच्या राजाने शोमरोन ताब्यात घेतले आणि इस्राएली लोकांना बंदिवान करून अश्शूरला नेले आणि तिथे हलह आणि हाबोर नदीच्या काठावर वसलेल्या गोजान भागात तसेच मेदिया प्रदेशातील नगरांमध्ये वसविले.


म्हणून, प्रभू, सर्वसमर्थ याहवेह, त्याच्या दणकट योद्ध्यांवर विनाशकारी रोग पाठवतील; त्यांच्या ऐश्वर्यात धगधगत्या ज्योतीसारखा अग्नी प्रज्वलित केला जाईल अग्नी प्रज्वलित केला जाईल.


दंड मिळण्याच्या दिवशी तुम्ही काय कराल, जेव्हा फार दुरून संकट येईल? तुम्ही कोणाकडे मदतीसाठी धावणार आहात? तुम्ही तुमची संपत्ती कुठे सोडून देणार?


बंदिवानांमध्‍ये लपून बसणे, किंवा मेलेल्यांमध्ये पडून राहाणे या वाचून काहीही उरणार नाही. हे सर्व करूनही त्यांचा संताप अजून शमला नाही, त्यांचा हात अजूनही उगारलेलाच आहे.


तटबंदी केलेले शहर एफ्राईमपासून नाहीसे होईल, आणि दिमिष्कमधून शाही सामर्थ्य नाहीसे होईल; अराम नगरातील अवशिष्ट इस्राएली लोकांच्या वैभवासारखे असतील,” असे सर्वसमर्थ याहवेह घोषित करतात.


जसे जैतून वृक्ष झाडल्यानंतर किंवा द्राक्ष गोळा करून द्राक्षाचा हंगाम संपल्यानंतर उरलले राहतात, तशी देशांची अवस्था होईल, तशी या पृथ्वीची अवस्था होईल.


पृथ्वीच्या दिगंतापासून आपण हे गाणे ऐकतो: “नीतिमान परमेश्वराचा गौरव असो.” पण मी म्हणालो, “माझा नाश होत आहे, माझा नाश होत आहे! माझा धिक्कार असो! फसवणूक करणारा विश्वासघात करतो! फसवणूक करून तो विश्वासघात करतो!”


मनश्शेह एफ्राईमला आणि एफ्राईम मनश्शेहला खाऊन टाकेल; ते एकत्र मिळून यहूदीयाच्या विरोधात जातील. हे सर्व करूनही त्यांचा संताप अजून शमला नाही, त्यांचा हात अजूनही उगारलेलाच आहे.


प्रभूंनी याकोबाविरुद्ध संदेश पाठवला आहे; तो इस्राएलवर पडेल.


“ ‘यास्तव सार्वभौम याहवेह त्यांना म्हणतात: मी स्वतः पुष्ट मेंढरे आणि दुबळी मेंढरे यांच्यात न्याय करेन.


याहवेह असे म्हणतात: “जसा मेंढपाळ सिंहाच्या तोंडातून केवळ दोन तंगड्या आणि कानाचा एक तुकडा सोडवितो, तसे शोमरोनातील इस्राएल लोक जे पलंगाच्या शीरपट्टीने आणि बिछान्यावरील रेशमी कापडाच्या तुकड्याने सोडविले जातील.”


जेव्हा याहवेह पृथ्वीवरील सर्व दैवतांचा नाश करतील, तेव्हा याहवेह त्यांना भयावह वाटतील. दूरदेशातील सर्व राष्ट्रे आपआपल्या भूमीवर त्यांच्यापुढे नतमस्तक होतील.


Lean sinn:

Sanasan


Sanasan