Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 17:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 तटबंदी केलेले शहर एफ्राईमपासून नाहीसे होईल, आणि दिमिष्कमधून शाही सामर्थ्य नाहीसे होईल; अराम नगरातील अवशिष्ट इस्राएली लोकांच्या वैभवासारखे असतील,” असे सर्वसमर्थ याहवेह घोषित करतात.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 एफ्राइमाची तटबंदी, दिमिष्काचे राज्य व अरामाचा अवशेष ही नाहीतशी होतील; इस्राएलाच्या वैभवाची गत झाली तशी त्यांची होईल, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 एफ्राइमापासून तटबंदीची नगरे नाहीशी होतील. दिमिष्कापासून त्याचे राज्य आणि अरामाचा अवशेष ही नाहीसे होतील, ही इस्राएल लोकांच्या गौरवासारखी होतील, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 17:3
27 Iomraidhean Croise  

अश्शूरच्या राजाने त्याची मागणी ऐकली. त्याने दिमिष्कावर हल्ला केला आणि त्याला ताब्यात घेतले. तेथील लोकांना धरून कीर येथे नेले आणि रसीनलाही ठार मारले.


होशेच्या कारकिर्दीच्या नवव्या वर्षी अश्शूरच्या राजाने शोमरोन ताब्यात घेतले आणि इस्राएली लोकांना बंदिवान करून अश्शूरला नेले आणि तिथे हलह आणि हाबोर नदीच्या काठावर वसलेल्या गोजान भागात तसेच मेदिया प्रदेशातील नगरांमध्ये वसविले.


‘कालनो कर्कमीश सारखे नाही काय? हमाथ अर्पादसारखा आणि शोमरोन दिमिष्कसारखा नाही काय?


परंतु आता याहवेह असे म्हणतात: “तीन वर्षात, कराराने बांधलेला सेवक त्यांची मोजणी करेल, मोआबचे वैभव आणि तिच्या सर्व लोकांचा तिरस्कार केला जाईल आणि तिचे अवशिष्ट लोक फारच कमी आणि दुर्बल असतील.”


“त्या दिवशी याकोबाचे वैभव कमी होईल; त्याच्या शरीरातील चरबी व्यर्थ जाईल.


तुम्ही शहराला दगडविटांच्या तुकड्यांचा ढीग बनविले, तटबंदी असलेले नगर उद्ध्वस्त केले, परकियांचे किल्ले आता नगर म्हणून अस्तित्वात नाहीत. ते परत कधीही बांधले जाणार नाही.


कारण त्या मुलाला अयोग्य नाकारणे आणि योग्य निवडणे हे पुरेसे माहीत होण्याआधीच, ज्या दोन देशाच्या राजांची तुम्हाला भीती वाटत आहे ते नष्ट केले जातील.


कारण दिमिष्क हे अरामाचे मस्तक आहे, आणि दिमिष्क हे केवळ रसीनचे मस्तक. पासष्ट वर्षांच्या आतच एफ्राईम असे हादरून जाईल की ते सर्व एककूळ म्हणून राहू शकणार नाहीत.


कारण त्या मुलाला ‘माझे वडील’ किंवा ‘माझी आई’ कसे म्हणायचे हे समजून येण्याआधीच दिमिष्कची संपत्ती आणि शोमरोनची लूट अश्शूरच्या राजाकडून नेली जाईल.”


तेव्हा याहवेह होशेयला म्हणाले, “त्याचे नाव येज्रील ठेव, कारण मी लवकरच येहूच्या घराण्याला येज्रीलच्या रक्ताबद्दल शिक्षा देईन आणि मी इस्राएल राज्याचा शेवट करेन.


गोमेर पुन्हा गर्भवती झाली आणि तिने कन्येला जन्म दिला. तेव्हा याहवेह होशेयला म्हणाले, “हिचे नाव लो-रुहामा असे ठेव, कारण येथून पुढे त्यांना क्षमा करावी अशी प्रीती मी इस्राएलवर दाखविणार नाही.


तुझ्या लोकांच्या विरुद्ध युद्धाची गर्जना होईल, जेणेकरून तुझ्या सर्व गडांचा नाश होईल; जसे शलमनाने युद्धाच्या दिवशी बेथ-आर्बेलाचा नाश केला, जेव्हा मातेला तिच्या मुलांसहित आपटून ठार मारण्यात आले.


कारण दीर्घकाळापर्यंत इस्राएली लोक राजा अथवा राजपुत्र, यज्ञ अथवा पवित्र दगड, एफोद अथवा कुलदैवतांशिवाय राहतील.


इस्राएलास गिळून टाकण्यात आले आहे; राष्ट्रांमध्ये ती कोणासही आवडत नाही.


एफ्राईमचे वैभव पक्ष्याप्रमाणे उडून जाईल— जन्म नाही, गर्भधारणा नाही, गर्भसंभव नाही.


जे शोमरोनच्या पापाची शपथ घेतात; जे म्हणतात, ‘हे दान, तुझ्या दैवतेची शपथ’ किंवा ‘बेअर-शेबाच्या दैवतेची शपथ,’— ते असे पडतील की पुन्हा कधीही उठणार नाहीत.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan