Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 17:12 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

12 पुष्कळ राष्ट्रे जी संतापतात त्यांना धिक्कार असो— ते उफाळणाऱ्या समुद्राप्रमाणे रागावतात! गर्जना करणाऱ्या लोकांचा धिक्कार असो— पाण्याच्या प्रचंड लोंढ्याप्रमाणे ते गर्जना करतात!

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

12 अरेरे, बहुत राष्ट्रांचा केवढा हा गलबला! समुद्राच्या गर्जनेसारखा ते गलबला करतात; केवढी ही राष्ट्रांची खळबळ! ती महापुराच्या खळखळीसारखी खळबळ करतात!

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 समुद्राच्या गर्जनेप्रमाणे गर्जना करणारा पुष्कळ लोकांचा समुदाय आणि महापुराच्या जलांच्या गोंगाटासारखी गोंगाट करणारी राष्ट्रांची गर्दी यांना हायहाय!

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 17:12
21 Iomraidhean Croise  

मृत्यूच्या साखळदंडानी मला जखडले, नाशाच्या प्रवाहांनी मला बुडवून टाकले.


याहवेहची वाणी जलांवर आहे; गौरवशाली याहवेहची वाणी महा जलाशयांवर गर्जत आहे.


पाहा तुमचे शत्रू कसे गुरगुरतात, तुमच्या विरोधकांनी आपले डोके वर काढले आहे.


ऐका, डोंगरावरील एक आवाज, मोठ्या लोकसमुदायासारखा आवाज! ऐका, राज्यांमध्ये चालू असलेला गोंधळ, राष्ट्रे एकत्र जमत असल्यासारखा आवाज! सर्वसमर्थ याहवेह, युद्धासाठी सैन्य जमा करीत आहेत.


मी न्यायाला मापनदोरी आणि नीतिमत्वाला ओळंबा असे करेन. गारांनी तुमचा खोटेपणा, तुमचे आश्रयस्थान झाडून काढला जाईल, आणि पाणी तुमच्या लपण्याच्या जागेवर भरून वाहील.


तुमच्याविरुद्ध घडविलेले कोणतेही शस्त्र कधीच सफल होणार नाही आणि तुमच्यावर आरोप करणारी प्रत्येक जीभ खोटी ठरविली जाईल. याहवेहच्या सेवकांचा हा वारसा आहे, हाच न्याय मी तुम्हाला दिला आहे,” अशी याहवेह घोषणा करतात.


युद्धाची रणगर्जना करा, हे देशांनो, तुम्ही मोडून जाल! दूर राहणाऱ्या लोकांनो ऐका, युद्धासाठी सज्ज व्हा आणि विखरून जा! युद्धासाठी सज्ज व्हा आणि विखरून जा!


लढाईत वापरलेले प्रत्येक योद्ध्याची पायतणे आणि रक्ताने माखलेले प्रत्येक वस्त्र जळण्यासाठी पूर्वनियोजित केले जाईल, जाळण्यासाठी इंधन असे होईल.


त्यांचे सैनिक धनुष्य व भाल्यासहित सज्ज आहेत. ते अत्यंत क्रूर असून दया दाखवित नाही. ते घोड्यांवर स्वार झाले असता त्यांचा आवाज गर्जणाऱ्या समुद्राप्रमाणे आहे. हे सीयोनकन्ये तुझ्यावर हल्ला करण्यासाठी युद्धासाठी सुसज्जित असलेल्यांप्रमाणे ते येत आहेत.”


आणि मी इस्राएलच्या परमेश्वराचे वैभव पूर्वेकडून येताना पाहिले. जोरदार पाण्याच्या गर्जनेप्रमाणे त्याचा आवाज होता आणि परमेश्वराच्या वैभवाने पृथ्वी प्रकाशमय झाली.


दानीएल म्हणाला: रात्री मी आपल्या दृष्टान्तात पाहिले, माझ्यापुढे स्वर्गातील चार वाऱ्यांनी मोठ्या समुद्राला घुसळले.


पण आता पुष्कळ राष्ट्रे तुमच्याविरुद्ध एकत्र झाली आहेत. ते म्हणतात, “तिला अशुद्ध होऊ द्या, आपण सीयोनेवर दुष्ट नजर टाकून आनंद करू!”


जेव्हा कोश पुढे जात असे तेव्हा मोशे म्हणे, “हे याहवेह, सक्रिय व्हा! तुमच्या शत्रूंची पांगापांग होवो; तुमचे वैरी तुमच्यापुढून पळून जावोत.”


“तेव्हा सूर्य, चंद्र व तारे यामध्ये चिन्हे घडतील. पृथ्वीवर राष्ट्रे समुद्राच्या गर्जणार्‍या लाटांनी हैराण होतील आणि गोंधळून जातील.


पीडांची वाटी ओतणार्‍या त्या सात देवदूतांपैकी एक देवदूत माझ्याकडे आला व मला म्हणाला, “माझ्याबरोबर ये, म्हणजे मी तुला अनेक जलप्रवाहांवर बसलेल्या त्या मोठ्या वेश्येचा न्याय कसा होणार आहे ते दाखवेन.


तेव्हा देवदूत मला म्हणाला, “ती वेश्या ज्यांच्यावर बसली आहे, ते जलप्रवाह म्हणजे प्रत्येक लोक, समुदाय, राष्ट्र व भाषा आहेत.


Lean sinn:

Sanasan


Sanasan