यशायाह 16:8 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 हेशबोनची शेते सुकून गेली आहेत, सिबमाहच्या द्राक्षवेलीसुद्धा. ज्या एकवेळी याजेरपर्यंत पोहोचल्या होत्या आणि वाळवंटाकडे पसरत गेल्या होत्या, त्या खास निवडलेल्या द्राक्षवेली इतर देशांच्या राज्यकर्त्यांनी तुडवून टाकल्या आहेत. त्यांची कोंबे बाहेर पसरली आणि ती समुद्रापर्यंत गेली आहेत. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 हेशबोनाचे मळे व सिब्मेच्या द्राक्षलता ही सुकून गेली आहेत; राष्ट्रांच्या अधिपतींनी तिच्या लतांचे अंकुर खुडून टाकले आहेत. ती याजेरापर्यंत विस्तारली होती, ती रानातही पसरली होती; तिच्या फांद्या चोहोकडे पसरून समुद्रापलीकडे गेल्या होत्या. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 हेशबोनाची शेते व त्याचप्रमाणे सिब्मेच्या द्राक्षवेली सुकून गेल्या आहेत. राष्ट्रांच्या अधिपतींनी निवडलेल्या द्राक्षवेली पायदळी तुडवल्या आहेत त्या याजेरास पोहचल्या आणि रानामध्ये पसरून गेल्या होत्या. त्यांचा कोंब चोहोकडे पसरून समुद्राच्या पार गेला होता. Faic an caibideil |