यशायाह 16:7 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 म्हणून मोआबी मोठ्याने रडतात, मोआबसाठी ते एकत्र मोठ्याने रडतात. कीर-हरेसेथचा बेदाणा किंवा मनुका मिश्रित पिठाच्या गोड ढेपांसाठी विलाप आणि शोक करतात. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 ह्यास्तव मवाब स्वतःविषयी विलाप करील; सर्व लोक शोक करतील, कीर-हरेसेथाच्या मनुकांच्या ढेपांविषयी1 अगदी निराश होऊन तुम्ही उसासा टाकाल. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 यामुळे मवाब मवाबाकरता आकांत करील, प्रत्येकजण आकांत करील. कीर-हेरेसेथाच्या मनुकांच्या ढेपांसाठी जे पूर्णपणे उध्वस्त झाले आहे तुम्ही त्यासाठी शोक कराल. Faic an caibideil |
शेजारच्या लोकांनी म्हणजे इस्साखार, जबुलून व नफताली प्रांतांपर्यंत जे राहत होते, त्यांनी भाकरीचे पीठ, अंजिरांच्या ढेपा, खिसमिसांचे घड, द्राक्षारस, तेल इत्यादी खाण्याच्या वस्तू गाढवे, उंट खेचरे व बैल यांच्यावर लादून आणल्या होत्या. त्याचप्रमाणे असंख्य बैल व शेरडेमेंढरे पण आणली होती. कारण इस्राएलात सर्वत्र आनंदोत्सव साजरा होत होता.