Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 16:6 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

6 मोआबाच्या अभिमानाबद्दल आम्ही ऐकले आहे— तिचा अहंकार किती मोठा आहे! तिची घमेंड, तिचा अभिमान आणि तिचा उर्मटपणा; परंतु तिच्या सर्व फुशारक्या पोकळ आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

6 मवाबाच्या गर्वाविषयी आम्ही ऐकून आहोत; तो मोठा अभिमानी आहे; त्याचा उन्मत्तपणा, त्याचा गर्व व त्याचा क्रोध ह्यांविषयी आम्ही ऐकून आहोत; त्याची बढाई निरर्थक आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 आम्ही मवाबाच्या गर्वाविषयी, त्यांच्या उद्धटपणाविषयी, त्याची फुशारकी व संतापाविषयी ऐकले आहे. पण त्यांची फुशारकी निरर्थक आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 16:6
17 Iomraidhean Croise  

गर्विष्ठ, उद्धट ज्याचे नाव “टवाळखोर” आहे, तो तीव्र संतापाने वागतो.


मोआब देशाविरुद्ध भविष्यवाणी: मोआब येथील आर शहर उद्ध्वस्त झाले आहे, एका रात्रीत ते नष्ट झाले आहे! मोआबातील कीर शहर उद्ध्वस्त झाले आहे, एका रात्रीत ते नष्ट झाले आहे!


उन्मताची नजर नमविली जाईल, आणि मनुष्याचा गर्व उतरविला जाईल; त्या दिवशी याहवेह एकटेच गौरविले जातील.


याहवेहचा हात या पर्वतावर राहील; परंतु जसे कडबा खतामध्ये तुडविला जातो, तसे मोआबी त्यांच्या भूमीत तुडविले जातील.


जसे पोहणारे पोहण्यासाठी त्यांचे हात लांब करतात तसे ते त्यांचे हात त्यांच्यावर लांब करतील. त्यांच्या हातात चतुराई असतानाही परमेश्वर त्यांचा अभिमान उतरवून टाकतील.


तुम्ही बढाई मारता, “आम्ही मृत्यूबरोबर करार केला आहे, अधोलोकाशी आम्ही करार केला आहे. जेव्हा दुःखदायक अरिष्टांचा फटकारा येतो, तो आम्हाला स्पर्श करू शकत नाही, कारण आम्ही खोट्या गोष्टींना आमचे आश्रयस्थान केले आहे आणि असत्यपणाच्या आड स्वतःला लपविले आहे.”


मृत्यूबरोबर केलेला तुमचा करार रद्द केला जाईल; अधोलोकाशी केलेला तुमचा करार टिकणार नाही. जेव्हा दुःखदायक अरिष्ट झाडून काढते, तेव्हा तुम्हाला त्याच्याकडून तुडविले जाईल.


खोट्या संदेष्ट्यांची चिन्हे जे व्यर्थ करतात आणि दैवप्रश्न करणाऱ्यांना मूर्ख ठरवितात, जो सुज्ञ माणसांचे ज्ञान उलथून टाकतो आणि ते निरर्थक बनवितो.


“ ‘आम्ही वीरपुरुष, पराक्रमी योद्धे आहोत!’ असे तुम्ही कसे बोलू शकता?


“तिला एखाद्या दारुड्यागत होऊ दे, कारण तिने याहवेहविरुद्ध बंड केले आहे. मोआबभूमी आपल्याच वांतीत लोळू दे; तिला उपहासाचा विषय होऊ दे.


मोआब एक राष्ट्र म्हणून न राहता तिचा नाश होईल. कारण तिने याहवेहविरुद्ध उर्मटपणा केला आहे.


तिच्या खोट्या संदेष्ट्यांवर तलवारीचा प्रहार होईल ते सल्लागार मूर्ख बनतील! तिच्या योद्ध्यांवर तलवारीचा प्रहार होईल! ते अत्यंत भयभीत होतील.


याहवेह असे म्हणतात, “मोआबच्या तीन नव्हे तर चार अपराधांसाठी शासन करण्यापासून मी अनुताप करणार नाही. कारण त्याने एदोम राजाची हाडे जाळून त्याची राख केली आहे.


त्याच प्रकारे तुम्ही जे तरुण आहात, तुमच्या वडीलधार्‍यांच्या अधीन राहा. तुम्ही सर्वजण एकमेकांबरोबर नम्रता परिधान करून राहा, कारण, “परमेश्वर गर्विष्ठांचा विरोध करतात परंतु नम्रजनावर कृपा करतात.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan