Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 16:5 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 प्रीतीने सिंहासन स्थापित केले जाईल; दावीदाच्या घराण्यातील एकजण, विश्वासूपणाने त्यावर बसेल— जो न्यायनिवाडा करताना न्यायाची बाजू घेतो आणि धार्मिकतेची कामे जलदगतीने करतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 वात्सल्याचे सिंहासन स्थापले आहे; त्यावर दाविदाच्या डेर्‍यात कोणीएक सत्यनिष्ठ विराजमान होईल; तो न्याय करणारा, न्यायप्रिय, नीतिमत्तेत निपुण असा असेल.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 विश्वासाच्या कराराने सिंहासन स्थापित होईल; आणि दावीदाच्या तंबूतून कोणीएक निष्ठावान तेथे बसेल. तो धार्मिकतेने न्याय शोधील आणि त्याप्रमाणे न्याय देईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 16:5
31 Iomraidhean Croise  

इस्राएलचे परमेश्वर बोलले, इस्राएलच्या खडकाने मला म्हटले: ‘जेव्हा एखादा मनुष्य न्यायाने लोकांवर राज्य करतो, जेव्हा तो परमेश्वराचे भय बाळगून राज्य करतो,


दावीदाने त्या गडामध्ये आपला निवास केला आणि त्याला दावीदाचे शहर असे म्हटले. त्याने बुरुजापासून आतील भागापर्यंत तट बांधले.


तुझे घराणे आणि तुझे राज्य माझ्यासमोर सर्वकाळ टिकून राहेल; तुझे राजासन सर्वकाळासाठी स्थापित केले जाईल.’ ”


याहवेह तुमचे परमेश्वर धन्य असो, ज्यांना तुमच्या ठायी संतोष वाटला व तुम्हाला इस्राएलच्या राजासनावर ठेवले. इस्राएल प्रीत्यर्थ याहवेहच्या सर्वकाळच्या प्रीतिकरिता न्याय व नीतिमत्व राखून ठेवण्यासाठी त्यांनी तुम्हाला राजा केले आहे.”


हिज्कीयाहने संपूर्ण यहूदीयामध्ये जे चांगले आणि योग्य होते तेच केले आणि त्याचे परमेश्वर याहवेहसमोर तो विश्वासू राहिला.


प्रीती आणि विश्वसनीयता एकमेकांना भेटले आहेत; नीतिमत्व आणि शांती यांनी एकमेकांचे चुंबन घेतले आहे.


तुमच्या राजासनाचा पाया नीती व न्याय आहे; करुणामय प्रीती व विश्वसनीयता सतत तुमच्यापुढे चालतात.


सर्व सृष्टी याहवेहच्या सानिध्यात उल्हासित होवो, कारण ते येत आहेत, पृथ्वीचा न्याय करण्यास ते येत आहेत; ते धार्मिकतेने राष्ट्रांचा व विश्वासूपणाने लोकांचा न्यायनिवाडा करतील.


ते सर्व याहवेहच्या उपस्थितीमध्ये गावोत; कारण पृथ्वीचा रास्त न्याय करण्यासाठी ते येत आहेत. ते जगाचा आणि सर्व मनुष्यप्राण्यांचा न्याय त्यांच्या धार्मिकतेने व समानतेने करतील.


राजा सामर्थ्यशाली आहेत, त्यांना न्याय प्रिय आहे— तुम्ही याकोबात निष्पक्षपात प्रस्थापित केला; जो न्यायसंगत व रास्त आहे.


प्रीती आणि विश्वासूपणा राजाला सुरक्षित ठेवते; तर प्रीतीद्वारे त्याचे सिंहासन सुरक्षित केले जाते.


जर राजा गरिबांना योग्य न्याय देतो, तर त्याचे सिंहासन दीर्घकाल टिकेल.


कारण याहवेह आमचे न्यायाधीश आहेत, याहवेह आम्हाला कायदा प्रदान करणारे आहेत, याहवेह आमचे राजा आहेत; तेच आम्हाला वाचविणार आहेत.


पाहा, मी त्याला लोकांसमोर साक्षीदार, एक शासनकर्ता व लोकांचा अधिकारी बनविले.


त्याला अधिकार, गौरव व सार्वभौम सामर्थ्य देण्यात आले; सर्व राष्ट्रांनी आणि प्रत्येक सर्व भाषा बोलणार्‍यांनी त्याची उपासना केली. त्याचे सामर्थ्य शाश्वतचे आहे, जे कधीही ढळणार नाही आणि त्याचा कधी अंत होत नाही आणि म्हणून त्याचे राज्य हे असे राज्य आहे, ज्याचा कधीही नाश होणार नाही.


मग परमोच्च परमेश्वराच्या पवित्र लोकांना आकाशाखाली असलेल्या राज्यांचे सार्वभौमत्व, सामर्थ्य आणि महानता देण्यात येईल. त्यांचे राज्य सनातन राज्य आहे आणि सर्व शासक त्यांची सेवा करतील व त्यांच्या आज्ञा पाळतील.’


“त्या दिवशी “दावीदाचा पतन झालेला आश्रय मी पुनर्स्थापित करेन; मी तिची तुटलेली तटबंदी दुरुस्त करेन, आणि तिचे अवशेष दुरुस्त करेन— आणि पूर्वीसारखीच तिची पुनर्बांधणी करेन,


मी लंगड्यांना माझे अवशेष करेन, आणि बहिष्कृत लोकांना एक बलाढ्य राष्ट्र करेन. त्या दिवसापासून याहवेह सीयोन पर्वतावरून सदासर्वदा राज्य करतील.


सीयोनकन्ये, फार आनंद कर! यरुशलेमकन्ये, गर्जना कर! पाहा, तुझा राजा तुझ्याकडे येत आहे, तो नीतिमान व विजयी आहे, तरी तो लीन आहे व गाढवीवर बसून तो येत आहे होय, एका गाढवीच्या शिंगरावर बसून तो येत आहे!


Lean sinn:

Sanasan


Sanasan