Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 16:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 घरट्यातून ढकलून दिलेल्या फडफडणाऱ्या पक्ष्यांप्रमाणे, मोआबच्या स्त्रिया आर्णोनच्या घाटावर आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 कारण कोट्यांतून उडवलेल्या भटकणार्‍या पाखरांप्रमाणे मवाबाच्या कन्या आर्णोनच्या उतारांजवळ भटकतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 कारण विखरलेल्या घरट्याप्रमाणे, भटकणाऱ्या पक्ष्याप्रमाणे, मवाबाच्या स्त्रिया आर्णोन नदीच्या उताराजवळ भटकतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 16:2
14 Iomraidhean Croise  

मोआबाचा राजा मेशा हा मेंढरांचे कळप बाळगून होता आणि तो इस्राएली राजास कर म्हणून दरवर्षी एक लाख मेंढरे आणि एक लाख मेंढ्याची लोकर देत असे.


जशी फडफडणारी चिमणी निसटून जाते किंवा निळवी उडून जाते, तसाच गैरवाजवीपणे दिलेल्या शापाचा प्रभाव होत नाही.


घर सोडून भटकणारा मनुष्य घरटे सोडून भटकणार्‍या पक्ष्यासारखा आहे.


शिकार केलेल्या छोट्या हरिणीप्रमाणे, जसे मेंढपाळ नसलेले मेंढरू, सर्व त्यांच्या त्यांच्या लोकांकडे परत जातील, ते त्यांच्या मातृभूमीत पळून जातील.


मोआब लज्जित झाली आहे, ती भंग पावली आहे. रडा व आकांत करा! आर्णोनच्या काठी घोषणा करा मोआब नष्ट झाले आहे.


हे मोआबा, तुला धिक्कार असो! कमोश दैवताचे उपासक नष्ट झाले आहेत; आणि तुझ्या पुत्रांना बंदिवासात नेण्यात येत आहे व कन्यांना गुलाम करून नेण्यात येत आहे.


मोआबावर मीठ टाका कारण तिचा उकिरडा बनेल; तिची नगरे उजाड़ होतील, तिथे कोणीही वसती करणार नाही.


हे मोआबा, तुझा धिक्कार असो! कमोशाच्या लोकांनो, तुम्ही नष्ट झाला आहात! त्याने आपल्या मुलांना निर्वासित केले व अमोर्‍यांचा राजा सीहोनच्या हाती आपल्या मुलींना बंदी म्हणून दिले.


आर्णोन खोर्‍याच्या कडेला असलेल्या अरोएर शहरापासून खोर्‍यातील शहरापर्यंत व त्या शहरापासून गिलआदापर्यंत एकही दुर्गम शहर राहिले नाही. याहवेह आमच्या परमेश्वराने हे सर्व आमच्या अधीन करून दिले.


त्यावेळी आपण काबीज केलेला प्रदेश मी रऊबेन व गाद यांच्या वंशास दिला. रऊबेन व गादच्या वंशांना मी आर्णोन नदीवरील अरोएरापासून गिलआद पर्वताचा अर्धा भाग त्यातील शहरांसह दिला.


म्हणून आपल्या ताब्यात दोन्हीही राजांचे सर्व प्रदेश, म्हणजे यार्देनेच्या पूर्वेकडे आर्णोन खिंडीपर्यंत असलेला हर्मोन पर्वतापर्यंतचा अमोर्‍यांचा सर्व प्रदेश आपल्या ताब्यात आला.


आर्णोन खोर्‍यांच्या सीमेवर असलेले अरोएर शहर व खोर्‍यांच्या मध्यभागी असलेल्या नगरापासून मेदबा पलीकडील पठार,


“नंतर त्यांनी एदोम आणि मोआब या देशांना वेढा घालून रानातून आणि पूर्वेकडील सीमेने प्रवास करीत मोआबाच्या सीमेच्या पलीकडे आर्णोन नदीजवळ तळ दिला. परंतु त्यांनी मोआबाच्या सीमेत प्रवेश केला नाही, कारण आर्णोन ही मोआबाची सीमा होती.


Lean sinn:

Sanasan


Sanasan