Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 16:12 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

12 जेव्हा मोआब तिच्या उच्चस्थानी दर्शनास जाते, तेव्हा ती फक्त स्वतःला थकविते; जेव्हा ती तिच्या दैवतांची प्रार्थना करावयाला जाते, तेव्हा त्याचा काही उपयोग होत नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

12 मवाब देवदर्शन घेईल आणि उंच स्थानी रडून-रडून थकेल; तो देवघरात प्रार्थना करण्यास जाईल तरी त्याचे काही चालणार नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 जेव्हा मवाब स्वतः उंचस्थानावर जाताना थकेल आणि प्रार्थना करायला त्याच्या मंदिरात प्रवेश करील, तरी त्याची प्रार्थना काहीच सिद्धीस नेणार नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 16:12
24 Iomraidhean Croise  

शलोमोनाने यरुशलेमच्या पूर्वेकडील डोंगरावर मोआबाचे अमंगळ दैवत कमोश व अम्मोनी लोकांचे अमंगळ दैवत मोलख यांच्यासाठी पूजास्थाने बांधली.


दुपार सरून गेली आणि संध्याकाळच्या यज्ञाच्या वेळेपर्यंत ते अजूनही वेड्यासारखे भविष्यवाणी करीत होते. परंतु काहीही प्रत्युत्तर आले नाही, कोणी काही बोलले नाही, कोणी लक्ष दिले नाही.


माझ्या पूर्वीच्या राजांनी ज्या राष्ट्रांचा; म्हणजे गोजान, हारान, रेसफ तलास्सारतील एदेन यांचा नाश केला, त्यांना त्यांच्या दैवतांनी वाचविले होते काय?


म्हणून त्याने आपला ज्येष्ठपुत्र, जो त्याच्यानंतर राजा होणार होता, त्याला धरून ठार मारले व शहराच्या तटावरच त्याचे होमार्पण केले. ही घटना पाहून इस्राएली सैन्यास जबरदस्त धक्का बसला; किळस येऊन ते माघारी आपल्या देशाला परतले.


“तेव्हा तुम्ही मला हाक माराल, परंतु मी उत्तर देणार नाही; ते माझा शोध करतील, परंतु मी सापडणार नाही,


दिबोन येथील लोक त्यांच्या उच्च स्थानावरील, मंदिरात विलाप करण्यासाठी जात आहेत; नबो आणि मेदबासाठी मोआब आक्रोश करीत आहे. प्रत्येकाच्या डोक्यावरील केस आणि दाढी काढलेली आहे.


याहवेह यांनी मोआबविरुद्ध आधीच हे वचन सांगितले आहे.


हे याहवेह, ते त्यांच्या संकटात असताना तुमच्याकडे आले; जेव्हा तुम्ही त्यांना शिस्त लावली, तेव्हा ते कुजबुजत थोडीफार प्रार्थना करू शकत होते.


एके दिवशी, तो निस्रोख या त्याच्या दैवताच्या मंदिरात पूजा करीत असताना, त्याचे पुत्र अद्राम्मेलेक व शरेसर यांनी तलवारीने त्याचा वध केला व ते अरारात देशात पळून गेले. नंतर त्याचा वारस, त्याचा पुत्र एसरहद्दोन राजा झाला.


तुला मिळालेल्या सर्व सल्ल्यांनी तू थकली आहेस! तुझे ज्योतिषी पुढे येवोत, नक्षत्र पाहून महिन्याच्या महिने भविष्यकथन करणारे, तुझ्यावर पुढे येणाऱ्या संकटापासून तुझे रक्षण करो.


ते जणू काही काकडीच्या मळ्यातील बुजगावणेच, या मूर्तीला बोलता येत नाही; तिला तर उचलून न्यावे लागते कारण तिला चालता येत नाही. त्यांना घाबरू नकोस; त्या काहीही इजा करू शकत नाही तुमचे काही भले सुद्धा करत नाही.”


इस्राएलने बेथेल येथे भरवसा ठेवला, व मग त्यांना जशी आपल्या वासराच्या मूर्तीची लाज वाटली. तशीच मोआबाला आपल्या कमोशाची लाज वाटेल,


जे उच्चस्थळी जाऊन अर्पणे वाहतात, आणि त्यांच्या खोट्या दैवतांना धूप जाळतात त्या मोआबभूमीत या गोष्टी मी आता बंद पाडेन,” याहवेह असे जाहीर करतात.


हे मोआबा, तुला धिक्कार असो! कमोश दैवताचे उपासक नष्ट झाले आहेत; आणि तुझ्या पुत्रांना बंदिवासात नेण्यात येत आहे व कन्यांना गुलाम करून नेण्यात येत आहे.


कारण तुम्ही आपल्या कार्यावर व धनसंपत्तीवर भरवसा ठेवला होता, तुम्हालादेखील बंदिवान म्हणून नेण्यात येईल. तुमचे दैवत कमोश बंदिवासात जाईल, त्याचे याजक आणि सरदार हे सर्वजण नेले जातील.


“हेशबोनमधून अग्नी निघाला, सीहोनाच्या शहरातून ज्वाला निघाली. त्याने मोआबचे आर या आर्णोनाच्या उंच प्रदेशातील नागरिकांना भस्म केले आहे.


मग बलाम बालाकाबरोबर किर्याथ-हुसोथ येथे गेला.


सकाळी बालाकाने बलामास वर बामोथ-बआल या ठिकाणी नेले आणि तिथून तो इस्राएली लोकांच्या छावणीचा शेवटचा भाग पाहू शकत होता.


त्याने बलामाला सोफिमाच्या मैदानाच्या पिसगाच्या डोंगरावर नेले, तिथे त्याने सात वेद्या बांधल्या आणि प्रत्येक वेदीवर एक गोर्‍हा व एक मेंढा अर्पण केला.


आणि बालाकाने बलामाला पेओर डोंगराच्या शिखराकडे ओसाड जागेसमोर नेले.


“मी त्याला पाहतो, पण आता नाही; मी त्याला न्याहाळतो, पण जवळ नाही. याकोबातून एक तारा उदयास येईल; इस्राएलातून एक राजदंड निघेल. तो मोआबाचे डोके व शेथाच्या सर्व लोकांच्या कवट्या चिरडून टाकेल.


Lean sinn:

Sanasan


Sanasan